Tuesday, December 25, 2018

चार मुक्ती

👏👏👏

*चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली

बाबा जेव्हा म्हणतात चारही मुक्ती म्हणजे चारही देहांपासून मुक्ती. ते चार देह कोणते? तर स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देह. या चारही देहांपासून मुक्ती कधी मिळते? 

*तर ती मुक्ती आपणांस मिळते, ज्यावेळेस आपण सद्गुरूमय होऊन त्यांचे दर्शन मिळवितो.*

आपणास कल्पना असेलच की, आपल्या मातेने ही मुक्ती ह्या कलियुगातच मिळविली. दिनांक 24 नोव्हेंबर 2018 च्या *गुह्यत्वाचा साक्षात्कार* यामध्ये याचे विवेचन आलेलेच आहे.  

याचप्रमाणे मुक्तीचे चार प्रकार देखील सांगण्यात आलेले आहेत. हिंदू किंवा भारतातील प्राचीन समजानुसार मानवाला *चार प्रकारच्या मुक्ती* मिळू शकतात, त्या पुढीलप्रमाणे होत--

अ)  *समीपता* - देवाचे सानिध्य प्राप्त होणे. हि मुक्ती *उपासना अथवा पुण्याई* मुळे मिळते.

ह्याच्या समर्थनार्थ तुकाराम महाराजांचा खालील अभंग उद्बोधक ठरेल - *पुण्यकाळ त्यांच्या राहिलासे उभा |* *देवकीच्या गर्भा देव आले ||*

ब)  *सलोकता* - देवाचा लोक प्राप्त होणे. विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ,रामाच्या उपासकांना साकेत धाम, कृष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो. हि मुक्ती *तपामुळे* मिळते.

येथे तुकाराम महाराज म्हणतात, *वैकुंठा जावया तपाचे सायास|* *करणे लागे नाश जीवा बहु ||*

क)  *स्वरूपता* - देवाचे रूप प्राप्त होणे. हि मुक्ती *ध्यानामुळे* प्राप्त होते.

*ध्यानी ध्याता पंढरीराया|* *मनासहित पालटे काया ||* तुकाराम महाराज

ड)  *सायुज्यता* - ब्रम्हरूप होणे. मोक्ष मिळणे. हि मुक्ती *ज्ञानाने* प्राप्त होते.

*जे ज्ञान तयाचे हाती| तोची समर्थ मुक्ती|*

तुका म्हणे *नामापाशी चारी मुक्ती |* *एसे बहुता ग्रंथी बोलियले ||*

No comments:

अनगडवाणी