कालची रात्र...........काळरात्रच जणू ती भासली.......तोक्ते वादळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गुरूभगिनी कु.सुवर्णा (सोनू) यांनी पंधराव्या मजल्यावरून टिपलेले हे काळरात्रीचे चित्र सारे कांही सांगून जाते.............
जिकडे तिकडे सोसाट्याचा वारा सुटलेला..........त्याच्या ह्या अक्राळ-विक्राळ रूपाने सारा आसमंत दणाणून सोडलेला......अशा या भयाण राती त्या भयंकर रूप धारण केलेल्या वा-यामुळे झाडांची होणारी सळसळ, सळसळ न राहता, भयंकर रूप धारण करून एकमेकांवर आदळत, आपटत जणू काय रागच प्रगट करीत आहेत की काय असा भास होऊ लागला..........
भयंकर होणा-या आवाजांनी अवघा आसमंत भारून गेला......समोरच दिसणा-या झाडांच्या कलंडण्याने, ते आता पडतयं की काय असे भासमान होऊ लागलेले..........त्यातच विजांचा थयथयाट.......त्यामुळे वातावरणात आणखीनच भितीयुक्त वातावरणाची भर पडल्याने ही रात्र कशी पार पडणार याची चिंता लागून राहिलेली..........आणि त्यातच टपटप बरसणा-या टपो-या थेंबानी आठवण करून दिली, त्या येणा-या अवकाळी पावसाची.........
हा वातावरणामध्ये अचानकपणे येणारा जो बदल आहे, त्या येणा-या बदलामुळे, आजुबाजूला, जगभरात चाललेल्या घडामोडींमुळे जसे, पॅलेस्ताईन-इस्त्रायल यांच्यात छेडलेल्या युध्दामुळे, येणा-या चक्रीवादळांमुळे आणि जागतिक स्तरावरील महाभयंकर अशा "करोना" या साथीच्या रोगामुळे जी उलटा पालट घडताना दिसून आहे, त्यामुळे आपल्या श्री सद्गुरू माऊलींनी दिलेल्या त्या शब्दांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही...........
ते शब्द कोणते? तर मानवांचे शुध्दिकरण..........हा त्या शुध्दिकरणाचाच भाग आहे, हे सांगणे चुकीचे ठरू नये........मग यावर सत मानवांना कोणता उपाय करता येईल?.......यावर उपाय त्यानीच सांगितल्याप्रमाणे एकच एक उपाय, तो म्हणजे "नामस्मरण".........