MAYUR TONDWALKAR: भक्तीचे स्वरुप - पुढे चालू ..... जरी स्थूलात व स...: " Normal 0 false false false EN-US X-NONE X-NONE ..."
Friday, November 5, 2010
भक्तीचे स्वरुप - पुढे चालू ..... जरी स्थूलात व स्थुलाने या अघोरांचा नाश केला तरी देखील सुक्ष्माने त्याच अघोरानि मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात कि आजही अशांचे मानव उपासक आहेत कि नाही? अशा त-हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एकाद्याने म्हटले कि मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का?
भक्तीचे स्वरुप - पुढे चालू .....
जरी स्थूलात व स्थुलाने या अघोरांचा नाश केला तरी देखील सुक्ष्माने त्याच अघोरानि मानवी देहावर, मनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केलाच. आपण पाहतच आहात कि आजही अशांचे मानव उपासक आहेत कि नाही? अशा त-हेने अघोर उपासना करीत, तामस उपासना करीत, जर एकाद्याने म्हटले कि मी भक्ती करतो, तर याला काही आधार आहे का? आपल्याला काय पाहायचे आहे, काय मिळवावयाचे आहे, हे प्रत्येकाने विचारपूर्वक पाहिले पाहिजे. आपला राजमार्ग कोणता? तर भक्ती!! आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे आहे? भक्तीने !! आपल्याला काट्या कुटयातून जायचे नाही, गिरिकनदरातून जायचे नाही, दगड खड्ड्यातून जायचे नाही, फक्त राजमार्गाने वाटचाल करायची आहे. जरी अवधी लागला तरी आपण आपले इप्सित ठिकाणी पोहचणार. अघोरांची निर्मिती केली हि सतानेच आणि नाशहि सतच करणार आणि सतानेच तो केला आहे याबद्दल शंका नाही.
एवढी २५ अवतार कार्ये झाली पण ओमकारांचे निमित्त ठेवून त्यांचा नाश सतानीच केला. भक्तीचा नाश झाला नाही, तर अघोरांचा नाश झाला. अघोर भक्ती, अहंकारी भक्ती, दुष्ठ बुद्धीने वागण्याची त-हा, मत्सर,द्वेष, याचा नाश झाला. आपल्याला माहीतच आहे, कोपिस्ठ विश्वामित्र कसा होता? गुरुदेवांचे नाव घेतल्यावर क्रोधायमान होत असे. कुठे आमचे गुरुदेव वशिस्ठ? संयमी, शांत अन ज्ञानयुक्त गतीने जाणारी ज्योत, कधी-कधी आम्ही चिडतो, परंतू ते चिडत नाहीत. आम्ही त्यांना सांगितले, या कलीयुगात आपणासारखे संयमन पाळता येणार नाही अन त्यानीही ते मान्य केले. ते सांगतात सता !! आम्ही त्या युगात पाळले, परंतू आता मीही पाळणार नाही. ते कसे आहेत तर दयाशील, क्षमाशील, शीतल, शांत तत्व आहे. त्यांच्यापुढे सर्वजन लीन असतात. ब्रम्हरशी पद काय आहे याची सेवेक-यानो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात, असे ते पद आहे. त्यांच्यापुढे सर्वजन लीन असतात.
Subscribe to:
Posts (Atom)
-
👏👏👏 *चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली बाबा जेव्हा म्हणतात चारही म...
-
*प. पू. श्री सद्गुरु स्वामी* *भगवान महाराज यांची* *अमृतवाणी* *सदा सर्वदा योग तुझा घडावा ।* *तुझे कारणी देह मा...
-
👏🙏👏 येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे. *अवघाची संसार सुखाचा करीन* *आनंदे भरीन तिन्ही लोक* *जाईन गे मा...