Showing posts with label Sutti. Show all posts
Showing posts with label Sutti. Show all posts

Thursday, May 3, 2012

सुट्टीतील फेरफटका.......!!!........मयुरटीका ........वास्तविका...!!!




सुट्टीतील फेरफटका.......!!!

शाळा, कॉलेजांचे रीझल्ट
     एव्हाना लागले,
पालकांकडे भटकंतीचे
     मुलांचे हट्ट वाढू लागले,

कोणी म्हणतो, जाऊया पप्पा
     राणीच्या बागेत,
तर कोणी म्हणे, मारुया फेरफटका
     वस्तुसंग्रहालयाच्या जागेत,

मरीन ड्राईव्हला आहे,
     तारापोरवाला मत्स्यालय
तर भायखळ्याला आहे,
     जिजामाता प्राणीसंग्रहालय

फोर्टला जाऊ आणि पाहू,
     रिझर्व बँकेचे नाणे संग्रहालय
तर वडाळ्याला आहे,
     बेस्टचे वाहतूक संग्रहालय

ग्रांट रोडला आहे,
     गांधींचे मणी भवन
तर शिवाजी पार्कला आहे,
     संयुक्त महाराष्ट्र कला दालन


राणीच्या बागे शेजारी आहे,
     भाऊ दाजी लाड म्युझियम
तर गेट वे च्या शेजारी आहे,
     छत्रपती शिवाजी म्युझियम

गेट वे पाहता पाहता ईच्छा झाली
     पक्षांबद्दलची माहिती घेण्याची
तर थोडेच अंतर् पार करा आणि घ्या तसदी
     मुंबई नॅचरल हिस्टरी सोसाईटीत जाण्याची

अशा प्रकारे दिवस घालवा,
     आनंदाने मजेत
मुलांचेही लाड करा,
     हट्ट त्यांचे पुरवीत.

अनगडवाणी