खासदारकीची
जबाबदारी.........!!!
(ही नव्हे वात्रटिका......तर
ही आहे मयुरटीका ..........ही आहे वास्तविका)
(समाजाच्या
वास्तवाचे शब्दांकन)
“खास (उघडले) दार” खासदारकीचे
नव्या नवलाईच्या
जबाबदारीचे
लोकं मात्र थकली विचार करून करून
सुरुवात केली सचिनने खासदारकीचा बंगला
नाकारून
खासदारकीच्या
सोयी-सुविधा नम्रपणे नको म्हणाला सचिन
मी आपला आपण
हॉटेलातच राहीन
अनेकांनी दिलेल्या सल्ल्यांवर नाराज झाला
नाही सचिन
राज्यसभेत विचार मांडण्याचे म्हणाला स्वातंत्र्य
मी घेईन
विचार मांडण्याच्या
प्रक्रियेतून सामाजिक विषयांना वाट करून देईन
त्याचबरोबर खेळ क्षेत्रातील
विचारांना देखील राज्यसभेचे व्यासपीठ मिळवून देईन
खासदारकीच्या जबाबदारीचे भान सदा ठेवीन
अशाप्रकारे समाजाचे ऋण फेडीत राहीन..........!!!