काळा घोडा कला उत्सव – २०१३ (KALA GHODA ART FESTIVAL – 2013)
हा वार्षिक कला उस्तव असून,
१९९९ ला ह्याची सुरुवात झाली आणि हे ह्याचे १५ वे वर्ष आहे.. ह्या कला उस्तवात देशाच्या
निरनिराळ्या भागातून कलाकार येवून भाग घेत असतात, त्या दृष्टीने हा फक्त काला घोडा
परिसराचा किंवा मुंबई, महाराष्ट्राचा उत्सव न राहता तो खर्र्या अर्थाने राष्ट्रीय
कला उस्तव म्हणून साजरा केला जात आहे. ह्याचा एक फायदा असा झाला की ह्याची कीर्ती देशातच
न राहता देशाबाहेरही गेलेली असून, परदेशी प्रवाशी देखील ह्या कालावधीत ह्या
उस्तावासाठी आवर्जून उपस्थिती लावतात. ह्या उस्तावाची तारीख जरी निश्चित नसली तरी कालावधी
हा साधारणता जानेवारी महिन्याचा शेवट किंवा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत
कधीही निश्चित केली जाते. हा काला घोडा असोसियेशनद्वारे दक्षिण मुंबईत राष्ट्रीय
स्मारके जशी गेट वे ऑफ इंडिया, म्युझियम, मुंबई नेचरल हिस्टरी सोसायटी, जहांगीर
आर्ट गॅलेरी परिसरातील रॅमपार्ट रोडवर मुख्यत्वेकरून आयोजिण्यात येत असतो.
काला घोडा आर्ट फेस्टिवल हा
मुख्य उस्तव असून त्यासोबतच विज्युअल आर्टस, डांस, म्युझिक, थियटर, सिनेमा,
लिटरेचर, लेक्चर्स, सेमिनार्स आणि वर्कशोप्स, हेरीटेज वाॅक्स, मुलांसाठी खास
कार्यक्रम त्याचबरोबर स्ट्रीट फेस्टिवल देखील साजरे करण्यात येत असून ह्या सगळ्या
कार्यक्रमांसाठी कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नसून, ते मोफत असतात. ह्या
सगळ्या कार्यक्रमाचा खर्च हा मोठ मोठ्या संस्था उचलत असतात हे शक्य होते.
ह्या सगळ्या
कार्यक्रमांच्या जागांमध्ये जहांगीर आर्ट गॅलेरी, दि नेशनल गॅलेरी ऑफ मोडर्न आर्ट,
दि देविड ससून लायब्ररी, मेक्स मुल्लर भवन, एल्फिन्स्टोन कॉलेज, दि कामा
इन्स्टीट्यूट, दि एम सी घिया हाल, आणि राम्पार्ट रोडचा समावेश असतो. ह्या संपूर्ण
भागामध्ये एक उस्तावाचे वातावरण ह्या आठ ते दहा दिवसात आपणास पहावयास मिळते. ह्या
सगळ्यांमध्ये एक जत्रेचे स्वरूप आल्याचे जाणवते आणि त्यामुळे जत्रांमधून दिसणारे
वेगवेगळ्या प्रकारचे स्टाल्स (कले संदर्भातील) देखील येथे दिसून येतात.
हल्ली काही वर्षांमध्ये हा
कला उत्सव काला घोडा आणि आजूबाजूच्या परिसरात पसरल्याचे देखील दिसून येत आहे आणि
त्यामध्ये क्रोस मैदान, आझाद मैदान, होर्निमन सर्कल ह्यांचा देखील समावेश करण्यात
येत असतो.
ह्या उस्तवाला मिळालेल्या
उत्तम प्रतिसाद आणि यशामुळे ह्या उस्तवासोबतच इतर कला तथा सांस्कृतिक उत्सव देखील
साजरे करण्यात येत असतात. हा काळ साधारणपणे जानेवारी आणि फेब्रुवारीचा असल्यामुळे
वातावरणात एक सुखद गारवा असतो, त्यामुळे सदर उस्तव जरी मोकळ्या जागेत आणि
वातावरणात असला तरी, इतर वेळी असणार्र्या वातावरणाच्या त्रासाप्रमाणे ह्यावेळी तसा
त्रास होत नाही, जसे, उष्ण किंवा पावसाळी वातावरण. ह्या उस्तवाच्या महिन्यामध्ये
वातावरण अति उष्ण नसते, पाऊस पाण्याचा त्रास नसतो, उलट दिवस अखेर किंवा सूर्यास्त लवकर
होत असल्यामुळे त्या गोष्टीचा फायदाच उस्तवप्रेमी जनतेला होत असतो, आणि त्यामुळेच
येथे दिवसभर प्रचंड गर्दी दिसून येते व हा उस्तव यशस्वी होण्यास हातभार लावते. ह्याला
गालबोट लागले आहे ते येथील रहिवाश्यांना होणार्र्या त्रासाचे. त्यांना ह्या आठ ते
दहा दिवसात आवाजाचे प्रदूषण आणि प्रचंड गर्दीमुळे व त्यानंतर उस्तव संपला की
उस्तावातील उरल्या सुरल्या वस्तूंमुळे अनाहूतपणे होणार्या अस्वच्छतेचा त्रास सहन
करावा लागतो.
२०१३ च्या ह्या उस्तावला
साधारणपणे १,५०,००० लोकं हजेरी लावतील असा अंदाज आहे. ह्यामध्ये ३५० कार्यक्रमांची
रेलचेल असून, हा ९ दिवसांमध्ये विभागाला गेलेला आहे. सर्र्या जगभरातून येणार्र्या
प्रवाशांनी ह्यासाठी अगोदरच ह्या तारखांची काला घोडा उस्तवाला येण्यासाठीची तिकिटे
बुक करून ठेवली आहेत हे दररोज येथे हजेरी लावनार्र्या विदेशी प्रवाशांनी दाखवून
दिले आहे. ह्या काला घोडा उस्तवातून निर्माण होणारा निधी हा ह्या उत्सवाच्या
आजूबाजूच्या परिसराचा उत्कर्ष साधण्यासाठी वापरण्यात येणार आहे, कारण ह्या
परिसरामध्ये बर्र्याच अशा इमारती आहेत की त्यांना हेरिटेजचा दर्जा प्राप्त झालेला
आहे.