वडीलधारा सल्ला
फेसबुक म्हणा, व्हॉट्स अप
म्हणा,
हे माध्यम नसे वयस्कारांचे,
ट्वीटर म्हणा, बीटर म्हणा,
हे माध्यम असे
तरुणाईचे.........!!!
तरुणाईच्या ग्रुपमध्ये,
करा त्यासाठी एकच नियम,
वयस्करांनी जावू नका तेथे,
हेच पाळा संयमन........!!!
ग्रुपच करायचा असेल अपुला,
तर ग्रुपमध्ये असतील
वयस्कर,
हीच काळजी घ्या वयस्करांनो,
विसरा बाकी
सोयीस्कर.........!!!
आपण जेव्हा जाता,
तरुणाईच्या ग्रुपमध्ये,
मुस्कटदाबी होते तरुणाईची,
तरुणाईच्या स्वतःच्या
ग्रुपमध्ये.......!!!
.....................मयुर
तोंडवळकर.........