Wednesday, October 20, 2010

ध्यान


ध्यान म्हणजे ‘आत’ जाण, अंतरमुख होण, अज्ञाताच्या प्रांतात शिरण, याचाच अर्थ या घडीला आपण, ‘बाहेर’ आहोत, बहि:र्मुख आहोत आणि तथाकथीत ज्ञाताच्या प्रांतात आहोत. खर सांगायचं तर ज्ञात आणि अज्ञाताबाबत आपले आकलन आपल्या मर्यादानुसार आहे. पण, प्राथमिक पातळीवर साधकाच्या दृष्टीने ‘आत’ आणि ‘बाहेर’ अशी त्याच्या जगाची विभागणी झाली आहे. आपण जोवर बहि:र्मुखतेणे, आत्मकेंद्रित होवून जीवन जगत असतो तोवर ‘बाहेर’चं जगच आपल्याला खर वाटत असत. आपण दृष्याला, स्थूलाला चिकटलेलो असतो. आपण जसजस अंतरमुख होवू लागतो तसतस आपल्याच अंतरंगाला विराट पण सूक्ष्म चेतनेची ओढ लागते. मग आतल जग आणि बाहेरच जग अशा दोन जगात आपलच मन संघर्ष उत्पन्न करत. साधकाला हळू हळू  अस वाटू लागत कि, आपल जे आतल जग आहे ते अधिक खर आहे. ते आपल्या कह्यातल आहे. आपल्याशी प्रतारणा न करणार आणि आपल्याला आधार देणार आहे. बाहेरच जग मात्र क्षणोक्षणी बदलत राहणार आहे.
काळाच्या कह्यात असल्याने आपली सत्ता न जुमाननारे आहे – ते सम्बधांवर आधारित आहे. प्रत्येकाला हे जग स्वत:च्या मनासारखे असावे आणि व्हावे, असे वाटते आणि त्या दृष्टीनेच तो आपल्या सम्बंधांची उभारणी करीत असतो. अशा हजारो ‘मी’ च्या सापेक्ष भावनानवर हे सम्बंध उत्पन्न होत असल्याने त्या  समबंधातही कायमच्या आधाराची हमी नाहि. त्यामुळे हे बाहेरचे जग साधकाला अनिश्चित – अस्थिर वाटते. पण जन्मापासून याच जगाची त्याला सवय असते. जे सुख मिळवायचे ते याच जगात, अशी त्याची स्वाभाविक भावना असते. अंत:र्यामीचे जग त्याला अपरिचित असते. आपल्या ख-या स्वरूपाबद्दल तो अनभिज्ञ असतो. तेव्हा अज्ञातात शिरणे म्हणजे आपल्या आताच शिरणे ! कारण आपण आपल्याला सर्वाधिक अज्ञात आहोत !!! म्हणून आपल्या अंतर्यामी शिरणे – तेथे स्थिर होत राहणे, हेच ते ध्यान.
पण हे आत शिरणे आणि स्थिर होणे साधत नाही. याच कारण आपल्या मनात सुरु असलेले दोन जगातले द्वंद्व आणि बाहेरच्या दृश्याकडे या मनाची उपजत असलेली धाव.
मुख्य म्हणजे या दोन जगातले सर्वात श्रेष्ठ आणि आपल जग कोणत्, याच मूल्यमापन झालेलं नाही. त्यामुळे उपासना करू तेव्हा पटकन आत जाने साधाव, अशी आपली अपेक्षा असते. पण उपासनेला बसल कि बाहेरच्या जगातले आघात, कल्लोळ, लहरी आतमध्ये आदळू लागतात. बाहेरचे आघात आतून आपल्याला अस्थिर, अशांत, अस्वस्थ करीत राहतात. शांत व्हावयाचा प्रयत्न केला कि भले बुरे विचार,
ब-या-वाइट आठवणी उफाळू पाहतात आणि मनाचा ताबा घेउ पाहतात. मग आत जाणच साधत नाही तर तेथे स्थिर होणे कसे साधावे?
आता भल्याबू-या आठवणी किंवा अवती-भवतीच्या माणसानच बरेवाइट वागणे सोडा हो, उपासनेत लहान-सहान गोष्टीनचाही अडथळा होत असतो. अगदी क्षुल्लक वाटना-या गोष्ठीही मनाचा ताबा घेतात.
घराला ओल आहे., घरात पाली झुरळे किटकानपासून ते उनदरापर्यंतच्या प्रान्यानचा मुक्त संचाराचा त्रास आहे. इतक्या क्षुल्लक गोष्टीही साधकाला अस्वस्थ करू शकतात. त्या क्षणी उपासनेत मनात या गोष्टी मध्येच डोकावतात आणि साधक त्याच दिशेने विचार किंवा चिंता करू लागतो. गोष्टी फार साध्या आहेत खरे. पण जोवर बाहेरच्या या गोष्टी त्रास देत असतात तोवर तुम्ही आतूनही स्थिर होवू शकत नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे. पण यावर उपाय काय ? उपाय एकच – उपासनाच वाढवत राहावी.
उपासानेत खंड पडता काम नये. उपासनाच उपासनेची गोडी निर्माण करील आणि टीकवीलहि. तेव्हा बाहेरच जग आघात करीत असले तरी आत शिरणे थांबवू नये. बाहेरच्या जगात व्यवहारानुसार गरजेच ते कराव. प्रयत्नही चिकाटीने करावेत. ऐहिक सुखही अवश्य मिळवाव पण आत जाने थांबवू नये. ते साधत गेल कि जाणवेल जग एकच आहे. आत आणि बाहेर अस काहीच नाही. जे आहे ते एकच आहे. सर्वव्याप्त आहे. त्याच्या असनेपनात आनंद आहेच आणि त्यात आपणही आहोत. या जानिवेतही आनंद आहे.
चैत्यन्य प्रभू.

अनगडवाणी