भ्रष्ट्राचारावर
रामबाण.......!!!
कॉंग्रेस काय आणि भाजप काय,
सगळे राजकारणी सारखेच हाय,
अंगाशी येता भ्रष्टाचाराची प्रकरणं
रिंगणातून काढती तत्काळ पाय.........!!
साऱ्या देशभर आलीय भ्रष्टाचाराची लाट,
कोण कोणाची थोपटणार पाठ,
सगळ्यांच्या शिरावर घोटाळ्यांचे ओझे,
जो तो म्हणे हे नसे माझे..........!!
झटकली जबाबदारी, हे झाले मोकळे,
ह्यांच्यावर कार्यवाही करणारे मात्र
थकले,
कारण ह्यांना सामील, सरकारी यंत्रणा,
कायद्यातील पळवाटा, ही त्यांची मंत्रणा
........!!
करणार कोण ह्यांना कायमचे शासन?
हे तर आहेत २१ व्या शतकातले रावण,
ह्यांना हवा आहे तो पुरुषोत्तम राम,
जो ह्यांना करायला लावील राम,
राम.......!!
राम जर सोडील अपुला धनुष्यबाण,
तोच असेल शेवटचा रामबाण,
त्यासाठी उत्पन्न व्हावा लागेल २१व्या
शतकातला राम,
तरच ह्या भ्रष्टाचारी राजकारण्यांवर
घालता येईल लगाम......!!!
घालता
येईल लगाम......!!!