Saturday, September 29, 2018

*समर्थ तेच, तेच सद्गुरू*

👏🙏👏

आजच्या प्रवचनातील विशेष बाब म्हणजे - बाबा म्हणतात,
*समर्थ तेच, तेच सद्गुरू*
भुलू नका, चुकू नका. सर्व काही करणारे, तेच समर्थ !
पुढे बाबा असेही म्हणतात," *पण (समर्थ) मी त्यातला नाहीच म्हणणार.*" हे आपण लक्षात घ्यावयास हवे.
पुढे बाबा म्हणतात, *समर्थ कसे असतात? तर स्थिर असतात.*

आता हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, *त्यांच्यात त्रिगुणात्मक नटविले, ते (त्रिगुण) - (समर्थ म्हणा, सद्गुरू म्हणा, किंवा अनंत म्हणा) हुकुमाशिवाय (या जगताचे कार्य) करीत नाही.*

आणि म्हणूनच बाबा म्हणतात, *करून अकर्ते असे ते सत् पद आहे.*

*हे नामस्मरण अत्यंत उच्च व श्रेष्ठ प्रतीचे आहे.* हे साधे आणि सुलभ देखील आहे. दुनियेच्या उचापती म्हणा, उठाठेवी म्हणा करण्यापेक्षा *नामस्मरण* करा.

बरे ते कसे करा, *तर एका तत्वावर दृढभाव ठेवून* म्हणजेच आपण आपल्या सद्गुरूंवर पुर्णत्वाने विश्वास ठेऊन, आपला जो मनामध्ये भाव आहे तो डळमळीत न ठेवता, अढळ भक्तीभावाने ते करा. इतकेच नव्हे तर *नामस्मरण* करताना आपल्या मायावी स्थितीचे विस्मरण होऊ द्या, मग ते घरदार का असेना?

*एका तत्वावर दृढभाव ठेवून, त्या गतीवर नामस्मरण करा.*

बाबा आपणा सर्वांस्वांना आठवण करून देताना म्हणतात, *आपण माया म्हणजे परब्रह्म मानतो.* परंतु हे खरे नाही. बाबा विचारणा करतात, *जर स्थूल आपले नाही,  तर माया आपली कशी म्हणावी?*

पण पुढे बाबा असेही म्हणतात, *माया रहीत तिन्ही जगाचा (स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताळ लोक) स्वामी अर्थात भगवंतही नाही.* हे असे का म्हणतात बाबा? कारण, भगवंत म्हणा किंवा सत् म्हणा यांची जी माया आहे, ती माया कोणती? तर ती *सत माया*

बाबांनीच म्हटल्याप्रमाणे, माया ही दोन प्रकारची असते - एक म्हणजे *सत माया* आणि दुसरी *असत माया.* म्हणून सद्गुरूंची म्हणा, भगवंताची म्हणा जी माया असते, ती सत माया.

*माया* मग ती कोणतीही असो. ती सताच्या चरणांची दास आहे.

संत म्हणतात, *एक तत्व नाम, दृढ: धरी मना ।*

*नामस्मरण कोठेही करा* नामस्मरणाला स्थळकाळाचे बंधन नाही.

👏💐🙏👏💐🙏👏💐🙏

वृत्ती शुद्ध असेल तर

💐👏💐

वृत्ती शुद्ध असेल तर
मन स्थिर राहिल
वृत्ती निर्भीड असेल तर
मनावर ताबा राहिल
वृत्ती शुद्ध असेल तर
कानानेही शुद्ध ऐकाल
वृत्ती शुद्ध असेल तर
मन शुद्ध राहिल.

वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो.

मन सूक्ष्माला सोडून नाही आणि सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही.

*वृत्ती त्रिकुटाच्या अधिन असते. वृत्ती शुद्ध असली तरच त्रिकुटी स्थिर राहते. त्रिकुटी स्थिर झाली तरच मन स्थिर होते आणि ज्यावेळेस मन स्थिर होते, तेव्हाच आपण आपल्या श्री सद्गुरू माऊलींना म्हणजेच भगवंताला पाहू शकतो.*

*प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

काव्य



# *सद्गुरू सारीखा नसे कुणी दुजा,*

# *सद्गुरू सारीखा नसे कुणी दुजा,*
*समस्त प्राणीजात त्यांच्यासमोर असतो खुजा* #

*सद्गुरूंच्या मनी येता अभिलाषा*
*अपुल्या भक्तांची ते, पुरवतील आशा*

*कोण घेणार मग भक्तांची परीक्षा*
*त्यानांच घ्यावी लागेल, सद्गुरूंची दिक्षा*

*नतमस्तक होता, सद्गुरूंच्या पुढे*
*लयाला जातील पापे, नाही घेणार ते आढेवेढे*

*अनगड म्हणे बा सद्गुरू नाथा*
*तुझ्याच चरणी ठेवितो मी माथा*

*माफ करा समस्त अज्ञ जीवा*
*घडू द्या अमुच्याकडून, अपुल्या चरणांची सेवा*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

*स्थुल रूप आणि सूक्ष्म रूप*

👏👏👏

*स्थुल रूप आणि सूक्ष्म रूप*

"त्याचप्रकारे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा म्हणजेच *आकार* आणि तोच परिपूर्ण परमात्मा जेव्हा सूक्ष्म रूपात भेटतो तेव्हा तो *निराकार* स्वरूपात असतो. तसेच सूक्ष्म, अतिसूक्ष्म - अणू, रेणू, परमाणू यामध्ये असूनही अलिप्त असणारे तत्व देखील हेच *निराकार* तत्व होय. अर्थात आपले सद्गुरू परब्रह्म तत्व होय.

आपण *आकारातून* *निराकारात* कधी जाऊ शकतो?

जेव्हा आपण आपल्यातील *स्वः* ला विसरून *नामस्मरण* करीतो तेव्हाच.

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

अनगडवाणी