नव रात्रीचे नऊ रंग,
प्रथमेचा लाल,
सुरुवात करा नऊ रात्रींची
उधळूनी गुलाल......!
दुस-या दिनीचा रंग निळा,
देई मनाला शांती,
निळ्या निळ्या भरजरी शालुत,
फुलून उठे सौभाग्याची कांती.......!
तृतीयेचा रंग पिवळा,
दिसत असे सोपा अन साधा,
आठवण करून देत असे,
मी आहे मात्र सोवळा.......!
चतुर्थीचा रंग हिरवा,
तरुणाईला वाटे बरवा,
भुरकट रंग पंचमीचा,
स्त्रियांच्या भारी आवडीचा......!
षष्टीचा रंग केशरी,
ललनांना भावतो भारी,
पांढरा रंग सप्तमीचा,
ल्यायल्यावर उठोनी दिसे
सादगी......!
अष्टमीचा रंग गुलाबी,
अधरांची खुलवतो कळी,
नवमीचा रंग जांभळा,
गाली खुलवतो छोटीशी खळी.......!!!