योद्धा गेला, सम्राट हरपला, मराठ्यांचा वाली राहिला नाही,
महाराष्ट्राचा कैवारी, यम राजानाही परत
पाठविणारा यम जेती,
असा कोणी जेता पाहिला नाही........!!!
अशी सार्थ बिरुदे मिरविणारे जनसामान्यांचे लाडके कै. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या निधनाची बातमी सार्र्या न्यूज चॅनेलनी दिली आणि सार्र्या देशात आणि परदेशात हाहा:कार उडाला.

नेरूळ स्टेशन वरील रात्रौ ९ वाजताचे हे
छायाचित्र स्पष्ट करते कि जसा ह्या स्टेशनात
एकाद दुसरा माणूस तिकिटासाठी उभा
होता,
तशीच
परििस्थती मुंबईतील इतर स्टेशनवर देखील दिसून येत होती.

त्याचबरोबर रेल्वे
कमपार्टमेंटमधूनही शुकशुकाटच जाणवत होता.
ह्याची प्रचीती ह्या सोबतच्या
छायाचित्रावरून स्पष्टपणे दिसून येत आहे.

माणसे घराबाहेर न
पडल्यामुळे नेहमी प्रवाशांनी ओसंडून वाहणारी हि मुंबईची ‘लाईफ
लाईन’ आज प्रवाशांविना
स्वतची जीवन वाहिनी हि ओळखच हरवून बसली होती.
इतकेच नव्हे तर बहुतेक स्टेशनवर
देखील अशीच दृश्ये दिसून येत होती. एरव्ही
माणसाना पाय ठेवायला ज्या स्टेशनात आणि
रेल्वे डब्ब्यांमध्ये जागा नसते तेथे, आज
मोकळी जागाच जागा
सर्वत्र दिसून येत होती. हा परिणाम होता तो माणसे आप-आपल्या
घरी टी. वी. समोर
बसण्याचा. बाळासाहेब आपण आमच्यातून गेलात काय पण
सगळेचजन आपल्याच बातम्या ऐकण्यात
गर्क झालेले दृश्य सगळ्या घराघरातून दृश्यमान
होत होते.

रस्ते सगळे ओस पडले होते. रस्त्यावरून
तुरळकच गाड्या धावताना दिसत होत्या शिवाय
माणसेही शोधून काढावी इतकी नगण्यच होती.
बसेस रस्त्यावरून धावताना तर दिसत
होत्या पण त्यात प्रवासीच नव्हते.

अशी स्वयं घोषित
बंदची िस्थती गेल्या कित्येक वर्षात दिसली नव्हती ती आज आपल्या
जाण्यामुळे दिसून
येत होती. काही जन तर आपल्या जाण्याने आपल्या घरचेच कोणी गेले
आहे असे वागताना
दिसत होते. काहीना अश्रू अनावर झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून ते
बाहेर पडताना
दिसत होते. त्यांना त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते.