वृथा अभिमान जातीभेदांचा
काय कामास येणार आहे?
राजकारण्यांच्या राजकारणाला
सामान्य माणूस बळी जाणार आहे......
हे व्यासपीठ नव्हे वादविवाद वाढविण्याचे,
हे व्यासपीठ आहे, सौहार्द वातावरणाचे,
येथे लिहिताना संयम बाळगावा,
कोणत्याही जाती धर्माचा प्रचार न करावा.......
कुठून आल्या ह्या जाती,
कुठून आले हे धर्म,
नाही आम्हास ते ज्ञात,
आम्ही आपले पळतो, त्यांच्याच शोधात.......
मी असे मराठा, मी असे ब्राह्मण,
आहे का मला माझी संपूर्ण ती जाण ?
वृथा बाळगतो मी जाती पातींचा अभिमान,
नाही मला त्याचे क्षणीकही भान......
माझ्याच शरीरात वसती भाग ते चार,
तयासच म्हणती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र
कां मग करीतो आपण विचार अभद्र ?
जात पात आणि जातीभेदांचा क्षुद्र........
जखम जर कां झाली मला,
रक्त वाहे त्यातून भळभळा,
रक्ताला नसे जातपातीचा लळा,
ते तर अंतरंगी लालच असे सकळा.........
मानवता हा असे माझा धर्म,
मी नाही करणार कोणताही अधर्म,
जाती भेदांच्या नावाखाली,
मुळीच नाही होऊ देणार, मी माझ्याकडून दुष्कर्म.......
नर आणि मादी, जाती असती दोन,
त्यातच सामावले विश्व अवघे कोण,
मग कां ही तेढी आणि जाती पातींचे भांडण,
कां बिघड़वती सामाजिक वातावरण........