यश
यश हे शेवटी यशच असत,
यशासारख दुसर काहीही नसत......!!
अपयश ही यशाची पहिली पायरी असत,
अपयशाच्या पायरीच अपयश रीचवायचं असत.....!!
अशा अनेक अपयशातून पुढे पुढे सरकायच असत,
सरकत सरकत यश पदरात पाडून घ्यायचं असत.....!!
अपयशाने माघारी न फिरता, नव्या उमेदीन पुढे चालायचं असत,
प्रयत्नांती परमेश्वर न म्हणता, प्रयत्नांनी यशस्वी व्हायचं असत.....!!
अनेक अपयश पचवता पचवता, एक यश गाठायचं असत,
यश मिळवून झाल असता, जीवनाच सार्थक झाल अस म्हणायचं असत.....!!
यश हे शेवटी यशच असत,
यशासारख दुसर काहीही नसत......!!
मयुर तोंडवळकर .............9869704882