Showing posts with label Mayur Tondwalkar. Show all posts
Showing posts with label Mayur Tondwalkar. Show all posts

Tuesday, April 30, 2013

भारतमाता धाय मोकलून रडली .......!!!

दिल्ली ते गल्ली,
बलात्कारानी भिजली,
कोण करील रक्षण आपल्या मायभगिनीनचे,
म्हणून भारतमाता धाय मोकलून रडली .......!!!

Thursday, April 11, 2013

वाह रे ! नौजवान..... !!!


वाह रे ! नौजवान..... !!!

किधर है तेरा ध्यान,
मत मांगते मांगते मतदाताओन्से,
फिसल गयी तेरी जबान......!!!
 वाह रे ! नौजवान..... !!!

धरनोंसे पाणी हो गया बाहर,
तेरी जबान ने ढाया बहोत हि कहर,
घुस्सेसे तू इतना हो गया बेखबर,
कि तेरी जबानसे निकली जहर कि लहर,
 वाह रे ! नौजवान..... !!!

तू मांगते रहा माफिकी सौगात,
यह लहर बन गयी तेरी औकात,
मुह्से मांगने वाला था तू मत
लेखीन निकाल गया गलतीसे ? "X X"
 वाह रे ! नौजवान..... !!!

यह गलती हि पडी तुझे बहोत भारी,
कौन लढायेगा केस अब तेरी,
अब जिंदगीभर पस्ताते रहो,
मस्तीमे अपने गुर्राते रहो,
 वाह रे ! नौजवान..... !!!

जबांको अपने
फिसलने मत दो अब,
याद करो, नौजवान !
छुडाने तुझे तभी आयेगा रब !!
 वाह रे ! नौजवान..... !!!

यह "रब" कही बाहरसे नही आता ,
वह तो अपनो और अपनोमेही है बसता,
जब सुधर जायेगी अपनी यह लड्खडाती जुबान,
तभी हि मिलेगा "रब" का संपूर्ण वरदान........!!!
  वाह रे ! नौजवान..... !!!


Sunday, November 18, 2012

योद्धा गेला, सम्राट हरपला, मराठ्यांचा वाली राहिला नाही, महाराष्ट्राचा कैवारी, यम राजानाही परत पाठविणारा यम जेती, असा कोणी जेता पाहिला नाही........!!!


योद्धा गेला, सम्राट हरपला, मराठ्यांचा वाली राहिला नाही
महाराष्ट्राचा कैवारी, यम राजानाही परत पाठविणारा यम जेती,
असा कोणी जेता पाहिला नाही........!!! 

अशी सार्थ बिरुदे मिरविणारे जनसामान्यांचे लाडके कै. बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या निधनाची बातमी सार्र्या न्यूज चॅनेलनी दिली आणि सार्र्या देशात आणि परदेशात हाहा:कार उडाला. 




नेरूळ स्टेशन वरील रात्रौ ९ वाजताचे हे छायाचित्र स्पष्ट करते कि जसा ह्या स्टेशनात 

एकाद दुसरा माणूस तिकिटासाठी उभा होता

तशीच परििस्थती मुंबईतील इतर स्टेशनवर देखील दिसून येत होती. 






त्याचबरोबर रेल्वे कमपार्टमेंटमधूनही शुकशुकाटच जाणवत होता. 

ह्याची प्रचीती ह्या सोबतच्या छायाचित्रावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. 




माणसे घराबाहेर न पडल्यामुळे नेहमी प्रवाशांनी ओसंडून वाहणारी हि मुंबईची लाईफ

 लाईनआज प्रवाशांविना स्वतची जीवन वाहिनी हि ओळखच हरवून बसली होती.

 इतकेच नव्हे तर बहुतेक स्टेशनवर देखील अशीच दृश्ये दिसून येत होती. एरव्ही 

माणसाना पाय ठेवायला ज्या स्टेशनात आणि रेल्वे डब्ब्यांमध्ये जागा नसते तेथे, आज 

मोकळी जागाच जागा सर्वत्र दिसून येत होती. हा परिणाम होता तो माणसे आप-आपल्या 

घरी टी. वी. समोर बसण्याचा. बाळासाहेब आपण आमच्यातून गेलात काय पण 

सगळेचजन आपल्याच बातम्या ऐकण्यात गर्क झालेले दृश्य सगळ्या घराघरातून दृश्यमान 

होत होते. 







रस्ते सगळे ओस पडले होते. रस्त्यावरून तुरळकच गाड्या धावताना दिसत होत्या शिवाय 

माणसेही शोधून काढावी इतकी नगण्यच होती. बसेस रस्त्यावरून धावताना तर दिसत 

होत्या पण त्यात प्रवासीच नव्हते. 




अशी स्वयं घोषित बंदची िस्थती गेल्या कित्येक वर्षात दिसली नव्हती ती आज आपल्या 

जाण्यामुळे दिसून येत होती. काही जन तर आपल्या जाण्याने आपल्या घरचेच कोणी गेले 

आहे असे वागताना दिसत होते. काहीना अश्रू अनावर झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून ते 

बाहेर पडताना दिसत होते. त्यांना त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण झाले होते.

Monday, October 29, 2012

सिलिंडर न घेणारा देशभक्त - देशभक्तीची नवी व्याख्या......!!!


सिलिंडर न घेणारा देशभक्त - देशभक्तीची नवी व्याख्या......!!!

काय गम्मत आहे पहा ! काय तर म्हणे गॅस ग्राहकांना ‘देशभक्त’ बनण्याची नामी संधी चालून आलेली आहे. बरे हे कसे बरे व्हावे? तर त्यासाठी फक्त एवढेच करायचे की गॅस कंपन्यांना तुम्ही एक अर्ज करायचा व त्यावर लिहून द्यावयाचे की आम्हाला तुम्ही देत असलेला सवलतींच्या दरातील सिलिंडर नको. बस्स ! इतकेच. आहे की नाही गम्मत. किती साधी अन सरळ योजना आहे ही, आणि तुम्ही म्हणता ‘देशभक्त’ होण्यासाठी देशासाठी रक्त सांडावे लागते, अतिरेक्यांशी मुकाबला करावा लागतो, सामाजिक बांधिलकीची जपणूक करावी लागते, देशासाठी आणि देशाच्या कार्यासाठी वाहून घ्यावे लागते, हे साफ खोटे आहे, हे ह्यांनी वरील गोष्टीतून दाखवून दिलेले आहे. फक्त अर्ज करा, आणि तोही कशासाठी तर सवलतींचा गॅस सिलिंडर नको म्हणण्यासाठी अन व्हा ‘देशभक्त’. आहे की नाही ही अक्कल हुशारी. अशाप्रकारे कोणीही उद्या ‘देशभक्त’ म्हणून मिरवू शकतो आणि ‘देशभक्त’ म्हणून सरकरी सोयी-सुविधा मिळविण्यासाठी मोठ्या रुबाबात त्या मिळवू शकतो. मानायला पाहिजे ह्यांच्या ह्या अकलेला आणि अकलेशी काडीमोड घेतलेल्या अकलेच्या ह्या कांद्यांना.
ह्या साध्या दोन ओळी तुम्ही लिहून दिलात की, झालात की तुम्ही ‘देशभक्त’. वा ! फारच सुंदर कल्पना आहे मांडलेली ह्या पेट्रोलियम कंपन्यांनी आणि पेट्रोलियम मंत्रालयाने. किती साधे अन सरळ आहे हे काम, नाही का? अशाप्रकारे एका दगडात दोन पक्षी मारण्यासारखेच हे काम सोपे करून ठेवले आहे ह्या तथाकथित ‘देशभक्तीचा’ नारा पिटना-यांनी. इकडे अर्ज द्या, तिकडे देशभक्त व्हा. वा, काय शक्कल लढविली आहे ह्या बहाद्दरांनी. खुपच छान. असे जर ‘देशभक्त’ निर्माण झाले असते तर मग काय विचारता? सगळीकडे ‘देशभक्त’ अन ‘देशभक्त’च दिसले असते नाही का?
इतकेच करून हे भागवान थांबलेले नाहीत, तर त्यांनी पुढे असेही जाहीर करून टाकलेले आहे की, जो कोणी असे करेल, त्याला वी. आय. पी. सुविधा देण्यात येतील. आता हे वी. आय. पी. कोण? तर सवलतींचा सिलिंडर नाकारणारे तथाकथित, ह्यांच्या सांगण्याप्रमाणे करणारे लोकं.
हे लोकांना खुळे की वेडे समजतात? त्यांना कसे बरे वाटले की, असे लोकं लिहून देतील अन ताबडतोब ‘देशभक्त’ होतील? कोणतेही देशासाठी कार्य न करता, बलिदान न करता, फक्त ह्या तथाकथीताना लिहून दिल्यामुळे जर का लोकांना ‘देशभक्त’ होण्याची संधी हे जर देत असतील, तर लोकांनी ती अवश्य घ्यावयास नको का? घर बसल्या ‘देशभक्त’ होण्याची ही नामी संधी लोकांनी दवडता कामा  नये आणि त्याचबरोबर ‘देशभक्तांसाठी’ देण्यात येणा-या सोयी-सुविधा, सवलती जें जें म्हणून काही हे वाटायला निघाले आहेत ते सगळे, पदरात पाडून घ्यावयास हवे, नाही का? आयतीच संधी ह्या शहाण्यासुरत्या, अक्कल्बाज लोकांनी लोकांना उपलब्ध करून दिलेली असताना, ती सर्व-सामान्यांनी नाकारावी किंवा घेऊ नये असे कसे बरे आम्ही म्हणावे? घ्या बापडयांनो, ही संधी जरूर घ्या, आणि स्वताचे आणि सगळ्यांचे कोटकल्याण करून घ्या. अशी संधी पुन्हा मिळणे नाही. तर, मग घेणार ना ही ‘देशभक्त’ होण्याची संधी? आणि होणार ना ‘देशभक्त’. जरूर व्हा, ताबडतोब व्हा. एकदा का ही संधी तुम्ही गमावलीत, तर पुन्हा अशी संधी तुम्हाला तुमच्या उभ्या आयुष्यात सापडायची नाही. तर मग घेताय ना, ही संधी?
मयुर तोंडवळकर – 9869704882/9869450934

Saturday, October 27, 2012

भ्रष्ट्राचारावर रामबाण.......!!!


भ्रष्ट्राचारावर रामबाण.......!!!

कॉंग्रेस काय आणि भाजप काय,
सगळे राजकारणी सारखेच हाय,
अंगाशी येता भ्रष्टाचाराची प्रकरणं
रिंगणातून काढती तत्काळ पाय.........!!

साऱ्या देशभर आलीय भ्रष्टाचाराची लाट,
कोण कोणाची थोपटणार पाठ,
सगळ्यांच्या शिरावर घोटाळ्यांचे ओझे,
जो तो म्हणे हे नसे माझे..........!!

झटकली जबाबदारी, हे झाले मोकळे,
ह्यांच्यावर कार्यवाही करणारे मात्र थकले,
कारण ह्यांना सामील, सरकारी यंत्रणा,
कायद्यातील पळवाटा, ही त्यांची मंत्रणा ........!!

करणार कोण ह्यांना कायमचे शासन?
हे तर आहेत २१ व्या शतकातले रावण,
ह्यांना हवा आहे तो पुरुषोत्तम राम,
जो ह्यांना करायला लावील राम, राम.......!!

राम जर सोडील अपुला धनुष्यबाण,
तोच असेल शेवटचा रामबाण,
त्यासाठी उत्पन्न व्हावा लागेल २१व्या शतकातला राम,
तरच ह्या भ्रष्टाचारी राजकारण्यांवर घालता येईल लगाम......!!!
                        घालता येईल लगाम......!!! 

Wednesday, October 17, 2012

नव रात्रीचे नऊ रंग........!!!!!


नव रात्रीचे नऊ रंग,
प्रथमेचा लाल,
सुरुवात करा नऊ रात्रींची
उधळूनी गुलाल......!

दुस-या दिनीचा रंग निळा,
देई मनाला शांती,
निळ्या निळ्या भरजरी शालुत,
फुलून उठे सौभाग्याची कांती.......!

तृतीयेचा रंग पिवळा,
दिसत असे सोपा अन साधा,
आठवण करून देत असे,
मी आहे मात्र सोवळा.......!

चतुर्थीचा रंग हिरवा,
तरुणाईला वाटे बरवा,

भुरकट रंग पंचमीचा,
स्त्रियांच्या भारी आवडीचा......!

षष्टीचा रंग केशरी,
ललनांना भावतो भारी,

पांढरा रंग सप्तमीचा,
ल्यायल्यावर उठोनी दिसे सादगी......!

अष्टमीचा रंग गुलाबी,
अधरांची खुलवतो कळी,

नवमीचा रंग जांभळा,
गाली खुलवतो छोटीशी खळी.......!!!

Wednesday, July 25, 2012

मेगाब्लॉक........!!!


मेगाब्लॉक........!!!
(ही नव्हे वात्रटिका......तर ही आहे मयुरटिका.....वास्तविका....!!!)
(समाजाचे वास्तव शब्दांकन)

मेगाब्लॉक घ्या
नाहीतर मेगाटॅाक  घ्या
रेल्वे काही सरळ
रुळावर येईना........

          आज कुठे ओवरहेड तुटली
          उद्या कुठे रेल्वेच घसरली
          परवा अपघात होऊन
          रेल्वे एकमेकावरच चढली

हे झाले आहे नित्याचे रडणे
दोन्ही रेल्वेचे हे सततचे रडगाणे

         काय बरे करावे ह्या रेल्वेला ?
         कोणी संपवेल का रेल्वेचा हा अवतार रडवेला....... 

Monday, July 23, 2012

आघाडी तेथें बिघाडी


आघाडी तेथें बिघाडी
(ही नव्हे वात्रटिका तर ही आहे मयुरटीका.......वास्तविका)
(समाजाचे वास्तव शब्दांकन)

आघाडी तेथें बिघाडी
सावरता सावरता
राजकारण्यांची बिघडते नाडी

जुळवून आणता आणता
नाकी नऊ येतात
त्यासाठी जनतेची मात्र दमछाक करतात

पैसेवाल्यांशी साटेलोटे करतात
दरवाढ करतात___भाव वाढवितात
जनतेची मात्र लुबाडणूक करतात

सरकारी जमिनी लाटतात
कॉन्क्ट्रॅक्टरांशी संगनमत करतात
जनतेची मात्र फसवणूक करतात

साखर सम्राट होतात
शिक्षण सम्राट होतात
जनतेला मात्र भिक्षांदेही करतात

अशी ही आघाडी
बिघडवते सामन्यांची नाडी
समाजावर मात्र करतात कुरघोडी 

Tuesday, July 10, 2012

वाकडी वाट ......!!! मयुर टीका .......वास्तविका ......!!! (समाजाचे वास्तव शब्दांकन)


वाकडी वाट ......!!!
मयुर टीका .......वास्तविका ......!!!
(समाजाचे वास्तव शब्दांकन)

सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचार,
झाली आहे ही नित्याची बाब,
ह्या महाभाग भ्रष्टाचा-यांना
     कोण विचारणार आहे त्याचा जाब?

म्हणे मी द्यायला तयार आहे
     माझा आदर्श मधील फ्लॅट
पण जनता म्हणे, आपण का धरली
     अगोदरच वाकडी वाट?

अनगडवाणी