Friday, August 3, 2018

सद्गुरू दर्शन

कुणी म्हणेल आपण रोज भगवंताचे नामस्मरण करतो, पण आपल्याला कुठे भगवंताचे दर्शन घडतेय ?

बरोबरच आहे म्हणा. आपल्याला त्या भगवंताचे दर्शन होईलच कसे ? कारण आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इतके आकंठ मायेमध्ये बुडालेले असतो की आपल्याला त्या भगवंताचे नावही घ्यायला फुरसत नसते. ध्यानधारणा करणे राहू द्या, नामस्मरण करायला देखील वेळ नसतो. येथे मला अनगड बुवांची आठवण येते. ते म्हणतात,


इत्यादी गोष्टींनी सुरू झालेला दिवस हळूहळू पुढे पुढे सरकतो तो पुर्णपणे मायावी त-हेने. म्हणजेच माया या नावाच्या ह्या विषाने आपली दृष्टी, विचारधारा, दृष्टिकोन वगैरे सगळं कसं विषारी होतं. अशी त-हा असल्यावर भगवंत आपल्याला दिसेलच कसा ? तो आपल्याला दर्शन देईलच कसा ?

अशाप्रकारे उघड्या डोळ्यांनी हे सगळं विखारी जग पाहिल्यावर आपले जे अव्यक्त मन आहे, ते भगवंताच्या ठिकाणी स्थीर होईल कसे ? भगवंताचे नामस्मरण होईलच कसे ? आणि हे जर आपल्याकडून झाले नाही तर आपल्याला त्याचे दर्शन तरी कसे लाभेल ?

तर ह्यावर उपाय एकच तो म्हणजे, "हे जरी खरे असले तरी आपण हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे की आपले शरीर बाहेरील वातावरणामुळे तसेच वर उल्लेखिलेल्या अनेक कारणांमुळे जे मलिन होते, ती मलिनता तसेच आलेली मरगळ घालविण्यासाठी रोज सकाळी उठून आपण काय करीत असतो? तर या देहाला आंघोळ घालीत असतो.
तशीच आंघोळ जर आपल्या मनाला रोज नित्यनेमाने घातली तर आपले मन नाही कां शुद्ध होणार ?

मग ती आंघोळ आपण आपल्या मनाला कशी बरे घालू शकणार ?

त्यासाठी पहिला उपाय म्हणून आपल्या सद्गुरूनी आपल्याला जे नाम बहाल केलेले आहे, त्याचे नामस्मरण करणे.

नामस्मरण करताना ते कसे व्हावयास हवे ?
तर ते सद्गुरूंच्या ध्यानात. म्हणजेच डोळ्यांसमोर आपल्या सद्गुरू माऊलींची मूर्ती तरळली पाहिजे व मनोमनी त्यांचे नांव घ्यावयास हवे. चक्षू आणि अंत:र्चक्षू हे त्या नामातच तल्लीन व्हावयास हवेत.

दुसरा साधा आणि सोपा उपाय जो आपल्या सद्गुरू माऊलीने दिला आहे, तो म्हणजे सत् स्थानात सताच्या सान्निध्यात येऊन बसणे. ह्याने काय होईल ?

ह्यामुळे सत् स्थानात येऊन सताच्या सान्निध्यात बसल्यानंतर आपल्या देहावर, आपल्या मनावर सत प्रकाश जितका वेळ आपण तेथे बसू तितका वेळ तो आपल्यावर सातत्याने पडल्यामुळे आपली देहशुध्दी तसेच मनशुध्दी होईल व आपण शुचि:र्भूत शुद्ध होऊन बाहेर पडू.

आहे की नाही साधा आणि सोपा उपाय. इतर काहीही आवश्यकता नाही. आणि या व्यतिरिक्त जर त्या सत सान्निध्याच्या कालावधीत आपण नामस्मरण केलेत तर सोन्याहूनी पिवळे. नुसत्या सतप्रकाशात बसण्यामुळे आपल्याला हा लाभ आपोआपच मिळविता येईल.

अनगडवाणी