Saturday, February 19, 2011
पाचवा प्रणव वेद (भाग पहिला-2)
नामस्मरण हा एक प्रकारचा नाद आहे. तो नाद असा असला पाहिजे की तो पार ब्रह्मानन्दाप्रत घेवून गेला पाहिजे. त्या अनन्तांच्या कानापर्यंत त्या नामस्मरणाचा नाद पोहचला पाहिजे. ती नामस्मरणाची ओढण ओम् कारापर्यंत पोचली पाहिजे. लक्षात घ्या, ध्यान धारणेकरिता आसन आहे. अर्थात ध्यान धारणा आसन घालून करता येते, पण नामस्मरण करताना इकडे, तिकडे लक्ष जात असेल तर ते नामस्मरण काहीही उपयोगाचे नाही. नामस्मरण मुखाने चालू असताना, नेत्र आपले काम करणार, कान आपले काम करणार, म्हणून नामस्मरण करताना नाम अशा त-हेने घेतले पाहिजे की कानांना फक्त नामाचाच ध्वनी ऐकायला यायला हवा. बाहेरचे इतरत्र ध्वनी कानावर येताच काम नयेत. नेत्रासमोर केवळ सद्गुरुंचीच छबी तरळली पाहिजे. असे झाल्यानंतर डोळे आपोआप स्थिर होतील, पापण्या जराही हलणार नाहीत. मग ते नाम अन् ते ध्यान ! दोघांची संयुक्तता साधली अन् त्यात स्थिर झाले मग नाद वरपर्यंत येणे ब्रह्मानंदाप्रत पोहचतो. अशा त-हेने या चाकोरीतून एकदा का सेवेकरी ऊर्ध्वतेणे वाटचाल करू लागला तर आम्ही खात्रीने सांगतो पाचवा प्रणव वेद प्रगत होणारच. पण पाचवा प्रणव वेद प्रगत होण्यासाठी सद्गुरू दर्शन हे आवश्यक आहे. सद्गुरू दर्शन ही सर्वात प्रथम पायरी. सद्गुरू दर्शनानंतर सूक्ष्म गती ही पुढची पायरी.
पाचवा प्रणव वेद प्रगत झाल्यानंतर त्या ठिकाणी स्थिर होवून गती गतीने आपण परमोच्च पदापर्यंत पोहचू शकतो. लक्षात ठेवा, भक्तीमध्ये भेदभाव नाही कारण सर्वांठायी एकच तत्व वास करीत आहे. आपण पाहता महान महान ऋषी-मुनी होवून गेले. पण प्रत्येक जण आपापल्या पायरीप्रमाणे राहणार. संसार सांभाळून, कर्तव्य सांभाळून जो काही वेळ मिळेल त्या अवधीत नामस्मरण करणे हेच आपले आध्य कर्तव्य आहे. आजचे युग हे कलियुग आहे, येणेच संशय युग आहे. मन चलबिचल होते, द्विधा होते. लक्षात घ्या, तापते ते आपले मन, आत्मा कधीही तापत नाही. मन तापल्यानंतर दहा इंद्रिये तापतात. पण आत्मा मात्र शांत असतो. त्याला काही देणे घेणे नसते. तापलेले मन शांत करते कोण? तर आत वास करणारे येणेच सत्. येणेच सद्गुरू! आपण पाहता आपले गुरुदेव वशिष्ठ अत्यंत शांत आणि संयमी ! लक्षात ठेवा, शांत राहिल्या नंतर तुम्ही कधीही अनंतांपासून दूर जाणार नाही. क्रमश:पुढे चालू ........................(३)
Subscribe to:
Posts (Atom)
-
👏👏👏 *चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली बाबा जेव्हा म्हणतात चारही म...
-
*प. पू. श्री सद्गुरु स्वामी* *भगवान महाराज यांची* *अमृतवाणी* *सदा सर्वदा योग तुझा घडावा ।* *तुझे कारणी देह मा...
-
👏🙏👏 येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे. *अवघाची संसार सुखाचा करीन* *आनंदे भरीन तिन्ही लोक* *जाईन गे मा...