मेगाब्लॉक........!!!
(ही नव्हे वात्रटिका......तर ही आहे मयुरटिका.....वास्तविका....!!!)
(समाजाचे वास्तव शब्दांकन)
मेगाब्लॉक घ्या
नाहीतर मेगाटॅाक घ्या
रेल्वे काही सरळ
रुळावर येईना........
आज कुठे
ओवरहेड तुटली
उद्या कुठे
रेल्वेच घसरली
परवा अपघात
होऊन
रेल्वे
एकमेकावरच चढली
हे झाले आहे नित्याचे रडणे
दोन्ही रेल्वेचे हे सततचे रडगाणे
काय बरे करावे ह्या रेल्वेला ?
कोणी संपवेल का रेल्वेचा हा अवतार रडवेला.......