Monday, September 24, 2012

सार्वजनिक गणपतींचे वास्तव......!!!


सार्वजनिक गणपतींचे वास्तव......!!!
लोकमान्य टिळकांनी जो सार्वजनिक गणपती उत्सव चालू केला होता, त्यामागील कारण होते जनजागृती आणि जनजागृतीतून, परदेशी जोखडातून समस्त भारतीयांची muktatमुक्तtता. त्यावेळी इंग्रजांनी सर्वत्र बळाच्या जोरावर समस्त हिंदुस्तानी जनतेची मुस्कटदाबी केलेली होती. बाहेरून आलेले हे परकीय येथील स्वकियांवर इतके हावी झालेले होते की जनसामान्यांना त्यांच्याविरुद्ध ‘ब्र’ देखील काढायची भीती होती. अशा या भयंकर परिस्थितीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी नामी उपाय शोधून काढला व तो म्हणजे सार्वजनिक गणेशोस्तव. आपणा समस्तांस विदित आहेच की त्यावेळेस गणपती हा फक्त घराघरातून पूजिला जायचा. त्यामुळे टिळकांनी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व समस्त भारतीयांना एकत्र आणण्यासाठी हा उत्सव सार्वजनिक रीतीने साजरा करून जनजागृतीचा हा वसा त्यावेळेस उचलला होता.
परंतु आता व्यापारीकरण एवढे झाले आहे की या उत्सवाच्या माध्यमातून जमेल तेवढे व जमेल तसे य उत्सवाचे बाजारीकरण म्हणा किंवा व्यापारीकरण म्हणा सुरु झालेले आहे व तो आता दृश्य स्वरुपात व राजरोसपणे लोकांपुढे मांडला जात आहे. याची ताजी उदाहरणे म्हणजे य गणपती उत्सवात कोणी आपला गणपती राजा आहे म्हणून संबोधतो तर कोणी त्यास महाराजा आहे असे म्हणतो, कोणी त्यास नवसाला पावणारा आहे म्हणून जाहिरात करून लोकांना आकार्शिण्याचे काम करतो, तर कोणी त्याला निरनिराळ्या माध्यमांच्या स्वरुपात जनतेसमोर पेश करून त्याचे भांडवल करीत असतो, जसे, अमुक तमुकचा राजा, महाराजा, नावाने ओळख निर्माण करून आता त्याचे कायदेशीर हक्क म्हणजेच पेटंट / ट्रेड मार्क घेण्याचा मार्गावर हे लोकं आहेत, तर कोणी आपला बाप्पा कसा आकर्षित होईल ह्यासाठी जीवाचा आटापिटा करून त्याला वेगवेगळ्या स्वरुपात लोकांसमोर आणण्याचे काम करीत आहेत, जसे, आता एका नामांकित चोकलेट निर्मात्या कंपनीने एका मॉलमध्ये चक्क त्यांच्या चोकलेटच्या गोळयांचाच गणपती बनवून लोकांना विशेषकरून बच्चे कंपनीला आकर्षित केलेले आहे. या अगोदर काहीजणांनी या गणपतीला नारळाच्या किशीपासून,] सुपारीच्या फळांपासून, केल्यांपासून, ते चक्क मोत्यांच्या मान्यांपासून, काजुगारापासून, अशा वैविध्यतेणे नटविले होते व लोकांना आकर्षित देखील केले होते.
एकंदरीतच काय टिळकांचा सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्याचा जो उद्देश्य होता, तोच मुळी पायदळी तुडवून, या उत्सवाला बाजारीकरणाचे सवरून प्राप्त करून दिलेले आहे आणि त्यातून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा घाट घातलेला आहे. हे करता करता ही मनसे यामध्ये इतकी गर्क झालीत की अनवधानाने कां होईना - वरील चित्रात ते वास्तव दृष्टोपत्तीस आले आहे.
या चित्राकडे तुम्ही जर बारीक लक्ष देऊन पाहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की संपूर्ण गणेशाचे छबीमध्ये कुठेही उणेपणा नाही. परंतु वास्तव हे आहे की त्याच्या पायाजवळ जी दानपेटी ठेविलेली आहे, त्यावर असा उल्लेख आहे की – उपनगराचा राजा आणि त्या खालोखालाच लिहिलेले आहे दानपेटी. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे उपनगराचा म्हणा किंवा मुंबईचा म्हणा हा जो कोणी राजा आहे, तो गणपती नसून, ही दानपेटी आहे असे प्रतीत होते आणि हे किती भयानक वास्तव आहे ह्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
एकंदरीतच आजचा गणपती उत्सव पाहता हे सत्य नाकारता येत नाही की आजचा राजा हा गणपती नसून, ही दानपेटीच आहे. ज्याचावर हा समस्तांचा, सर्वच गणेशोस्तव मंडळांचा हा खेळ उभा आहे. आज पैशालाच किंमत आहे ज्याच्याजवळ तो आहे, त्याचीच सद्दी आहे. तो करील ती पूर्व दिशा आहे.
आपण नेहमी वर्तमानपत्रातून वाचतो की या गणेशोस्तवामध्ये कोट्यावधींची उलाढाल या दहा दिवसात होत असते. यावरून कल्पना येईल की जरी जनतेसाठी हा गणपती उत्सव असला तरी काही लोकांसाठी तो उत्सव किंवा सण न राहता व्यापार झालाय. त्याच्याकडे ते व्यापारी दृष्टीकोनातूनच पहात असतात व वर्षभर जेवढी मेहनत करून आर्थिक लाभ मिळणार नसतील, तेवढे ते आर्थिक लाभ या दहा दिवसात कमावित असतात.
पूर्वीसारखे देखावे, समाज प्रबोधन करणारी दृश्ये, त्या अनुषंगाने येणारे सामाजिक सेवेचे भान ठेवलेले कार्यक्रम आता हळू हळू लोप पावत चाललेले असून, त्यांची जागा आता व्यापाराने घेतलेली आहे. याला काही अपवाद आहेत म्हणा, परंतु एकंदरीतच मोठ्या स्वरुपात याचे बाजारीकरण झालेले आपल्या दृष्टोत्पत्तीस पडते, हे सत्य नाकारता येत नाही.
मयुर तोंडवळकर – 9869450934 / 9869704882

अनगडवाणी