Tuesday, September 18, 2018

तुकोबांचे अभंग

🙏👏💐🙏👏💐🙏👏💐🙏

*आतां माझ्या भावा ।*
   *अंतराय नको देवा ॥1॥*

येथे तुकाराम महाराज म्हणतात, "आता माझ्या भावा" म्हणजे माझी जी भगवंता तुझ्याप्रत भावना आहे, ती तशीच तुझ्याप्रत प्रेमाची राहू दे. तिच्यात अंतर पडू देऊ नकोस. ती अधिकाधीक वृद्धींगत होऊ दे.

*आलें भागा तें करितों ।*
    *तुझें नाम उच्चारितों ॥2॥*

पुढे ते म्हणतात,"जे माझ्या भाग्यात आले ते मी करीत राहीन, ते म्हणजे सदासदैव तुझेच नाम उच्चारीत राहीन. तुझ्या नामाचा मला विसर पडू देऊ नकोस, हीच तुझीया चरणी नम्र विनंती.

*दृढ माझें मन।*
     *येथें राखावें बांधोन ॥3॥*

त्यासाठी माझे हे उच्छृंखल मन आहे, जे सदानकदा इथे तिथे भरकटत असते, त्याला तुच तुझ्या शक्तीने तुझ्याच चरण कमलाशी असे बांधोनी ठेव की त्याला इकडे तिकडे धावता येणार नाही.

*तुका म्हणे वाटे ।*
   *नको फुटों देऊं फांटे॥4॥*

शेवटी तुकोबा राय म्हणतात,"हा भक्तीमार्ग अनुसरताना माझ्या मनात शुद्ध भाव निर्माण कर. त्यात तर्क वितर्कांचे फाटे फुटू देऊ नकोस. सदोदित माझे मन आपल्या चरणांवर रत राहू दे."

........................अनगड बुवा.............................

🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

सतवचने

🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

बाबा म्हणतात, *"आजकाल सेवेकरी का फसतात?*
बाबाच पुढे उत्तर देतात, *"कारण सेवेकरी आपले कान हलके ठेवतात* *शक्तीशी तुल्यबळता करतात*

बाबा पुढे म्हणतात, *सद्गुरू ज्या सान्निध्यात आहेत त्याठिकाणी अपयश येणे शक्य नाही.*

*तत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ*

*भगवंत उपासना सोडून दैवत उपासक बनू नका.*

*भक्ती आपुलकीने करा, प्रेमाने करा.*

🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

*अनन्य चिन्तयन्तो माम, ये जनः पर्युपासते,*

🙏💐🙏👏🙏💐🙏👏🙏

*अनन्य चिन्तयन्तो माम, ये जनः पर्युपासते,*
*तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्*
............... *श्री भगवत गीता* .............

जे निष्काम व पूर्ण ज्ञानी आहे व *जे अनन्य भावयुक्त मला आत्मरूपाने जाणतात व माझे निरंतर चिन्तन करतात, स्मरण करतात* व सर्व उपासनेत श्रेष्ठ अशी निष्काम उपासना करतात, अशा माझ्या त्या परमार्थ ज्ञानी भक्तांचा *योगक्षेम* मी चालवितो. *अप्राप्य वस्तूची प्राप्ती येणे नाम योग व प्राप्य वस्तूचे रक्षण येणे नाम क्षेम होय.*  *योग आणि क्षेम* ही दोन्ही कामें मी स्वतः करीत असतो, असे श्रीकृष्ण म्हणतात. ह्याचे कारण ज्ञानीयाला मी माझ्या आत्मास्वरूपा सारखाच आहे आणि ते मला प्रिय असल्यामुळें असे भक्त माझ्या आत्मरूपा सारखेच आहेत.

तद्वतच ह्या भक्तांव्यतिरिक्त इतर भक्तांचे योगक्षेमही भगवंतच चालवित असतात. परंतु ह्यामध्ये एक भेद आहे तो म्हणजे काही भक्त आहेत ते असे समजतात की त्यांचा योगक्षेम ते स्वतःच चालवितात. परंतु जे अनन्य साधारण भक्त आहेत ते असे म्हणत नाहीत. कारण ते *जीवन आणि मरण* ह्या वासनेत लिप्त होऊन राहत नाहीत. अशांचा योगक्षेमही भगवंतच करीत असतो.
🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

सतवचने

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

बाबा म्हणतात, *सुसंगत म्हणजे सज्जनांची संगत असेल तर चांगलीच वाक्ये आपल्या कानी पडणार.* 

*विचाराने वागतात ते सुजन किंवा सज्जन. ते अगदी शांत असतात. त्यांचे वागणे व विचार देखील चांगले असतात.*

*पवित्र विचार व वासना ठेवणारा स्वतः पवित्र असतो.*

*सत् पद हे नेहमी निर्भिड असते.*

*मनाची ठेवण पवित्र असेल तर भावना शुद्ध असेल तरच तो सत् बनेल.*

*अनीतीने जाणारी ज्योत नेहमी कमी दर्जाची असते.*

*नीतिमत्तेने जाणा-या भक्ताचे कधीही अकल्याण होणार नाही.*

*सद्गुरू बंधुत्वाचे नाते हे उच्च दर्जाचे आहे.*

*गुरूबंधु आणि भगिनी यांचे नाते फार श्रेष्ठ आहे. याच्या विरूद्ध जाणारी ज्योत महत् पापी होय.*

👏 *परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज* 👏

🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

अनगडवाणी