🙏👏🙏
आजच्या प्रवचनातून आपल्या श्री सद्गुरू माऊलीने ब-याच गोष्टी उघड करून सांगितलेल्या आहेत. त्याचे स्मरण ठेवून जर कां आपण सर्वांनी मार्गक्रमणा केली, तर ती सद्गुरू माऊली आपणास आपल्या अगदी जवळ घेतल्याशिवाय कदापिही राहणार नाहीत.👏 *_अनगड_*👏
श्री सद्गुरू माऊली म्हणते, *समर्थ उपदेश करीत असतात ते सेवेकरी गरीबी, लाचारी, रोगग्रस्त या मार्गाने सेवेकरी जाऊ नये म्हणून.* हा उपदेश कसा असतो? तर *तो बोधक* म्हणजेच बोध घेण्यासारखा असतो. त्यापासून बरेच शिकण्यासारखे असते.
आपले बाबा पुढे जेव्हा समर्थांबद्दल बोलतात ते तर अतिशय महत्त्वाचे आहे. बाबा म्हणतात, *"समर्थ फार दयाघन आहेत. ते भक्तांचे कोडकौतुक पुरविण्यासाठी कधी पिता बनतात, तर कधी बालक देखील बनतात. ते लोण्यासारखे मऊ मुलायम असून, त्यांना आपल्या भक्ताबद्दल दया ही येतच असते, ती किती? तर दुस-या कुणाला येणार नाही इतकी."* हे सांगताना ते एवढे मोठे श्रेष्ठ तत्व स्वतः असताना, विनम्रपणे, लिनतेने म्हणतात, *मी यत्किंचित पामर काय करू शकणार? समर्थ दयाद्र दृष्टीने पाहणार.*
श्री सद्गुरू माऊली पुढे आपणा समस्तांना आठवण करून देताना म्हणतात, *ज्या सेवेक-यांनी सद्गुरू मेख ओळखली तो सेवेकरी हेलावणार.*
सताचे गुपित हे गुपित न ठेवता, ते गुपित उघड करताना ते म्हणतात, *अशाप्रकारे सत् पदाच्या आदेशाने जर कां ज्योत वागू लागली, तर त्यांचा (सताचा) ठाव घेणे सोपे आहे. अन्यथा वज्रापेक्षा कठीण आहे.*
आता येथे हा विचार करणे आपणास गरजेचे आहे की, आपण अशाप्रकारे सताच्या आदेशांचे पालन करतो कां? त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण वागतो कां? त्यांनी घालून दिलेल्या नितीनियमांचे आपण किती पालन करतो? आपण नित्यनेमाने *नामस्मरण* करतो कां? हे जर कां सर्वस्व आपणाकडून घडत असेल, तर आणि तरच ते सत् आपणास त्यांचा ठाव देईल, अन्यथा नाही.
_येथे ही गोष्ट महत्त्वाची आहे की सत् तत्वास ज्या वेळेस वाटेल की ही ज्योत आता आपला ठाव देण्यायोग्य झालेली आहे, त्यावेळेसच आपल्याला त्या सताचा ठाव घेता येईल, अन्यथा नाही. सतच आपणास तिचा ठाव देईल._
*सताचा ठाव घेणे हे ये-यागबाळ्याचे काम नोहे.*
पुढे बाबा म्हणतात, *"सद्गुरू माऊली कृपेची सावली"* आहे आणि हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. अशा त्या माऊलींची कृपा सर्वस्व अधिष्ठीत असते. पुढे बाबा म्हणतात, *माऊलीला मुलांचे प्रेमही असते.* हे जरी खरे असले तरी मुलालासुद्धा सद्गुरूंबद्दल ओढण ही असलीच पाहिजे.
इतकेच नव्हे तर सगळ्यांत महत्वाचे म्हणजे, *भक्ताकडे ही भावना पाहिजे की, "मी सद्गुरूंचा व सद्गुरू माझे आहेत." त्यांच्यात आणि माझ्यात द्वैत नाही.*
_हे फक्त म्हणण्यासाठी नसून सर्वार्थाने ते असावयास हवे._
तेव्हाच बाबा म्हणतात, *अशावेळी ते हेलावतात.* पण त्यासाठी तोंडाने म्हणजेच *उक्तीने* आणि *कृतीने* ज्योत सद्गुरूमय असावयास हवी. त्याचवेळी *त्रिभुवनी देखील ती वंदनीय ठरते.*
सद्गुरू माऊली पुढे म्हणतात, *जो त्या ठिकाणी स्थिर झाला, तो दूर होणे शक्य नाही व विशेष म्हणजे सद्गुरू त्याला दूर लोटणार नाहीत. हे त्रिवार सत्य आहे.*
परंतु एवढे सगळे म्हटल्यानंतर देखील श्री सद्गुरू माऊली दु:खी होऊन पुढे असेही म्हणतात, *पण सेवेक-यात अजूनही सुधारणा झालेल्या नाहीत.* ही गोष्ट आपणास खचितच कौतुकास्पद आहे असे वाटत नाही.
बाबा आता म्हणतात, *समर्थ प्रथम (ज्योतीची) बुद्धी शुद्ध आहे कां ते पाहणार.*
_त्यासाठी तुम्ही स्फटिकासारखे नितांत शुद्ध रहा. एकदा का त्यांनी तुम्हाला माझें म्हटले तर तुम्ही धन्य होय._
श्री सद्गुरू बाबा पुढे म्हणतात, *समर्थ आपल्या सेवेक-यासाठी अहर्निश झटत असतात. ते कधी नाराज होणार नाहीत. सद्गुरू माऊलींसारखे परम् दैवत नाही. सद्गुरू तुमचे कुळ, मुळ व पूर्वज.*
_विशेष उल्लेखनीय बाब आता पुढेच आहे. श्री सद्गुरू माऊलीने सताची तत्त्वे आणि त्यांचा क्रम आपणापुढे उघडपणे काही अंशी मांडून ठेवला, तो येणेप्रमाणे -_
*पहिले सत*
*सतापासून*
*श्रीहरी ( क्षिराब्धी )*
*श्रीहरींपासून*
*त्रिगुण*
*ब्रह्मा* *विष्णू* *महेश*
आणि
_तद्नंतर सर्वस्व जगत_