Showing posts with label Jagane. Show all posts
Showing posts with label Jagane. Show all posts

Sunday, April 15, 2012

६०० रुपयात जगायचे कसे आणि ६०० रुपयात मरायचे कसे?.....!!!


६०० रुपयात जगायचे कसे आणि ६०० रुपयात मरायचे कसे?
मयुरटीका .........!!! वास्तविका.........!!!

६०० रुपयात ना जगू शकत,
६०० रुपयात ना मरू शकत,
जगायचे असेल तर खर्च १५०० लागतो,
मरायचे असेल तर खर्च १८०० रुपये येतो.

सामान्यांनी करायचे काय?
त्रिशंकू सारखे लटकायचे हाय,
हातात नाही त्यांच्या काही उपाय,
त्यासाठी करावे काय? – डू ऑर डाय.

कोठून आणले हे २८-३० रुपयांचे फॅड,
लोकं म्हणतात सरकार झाले आहे मॅड,
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष कोण देतो?
न्यायालयाला मात्र प्रश्न हा पडतो.

म्हणून न्यायालयाने प्रश्न हा केला,
सामान्य माणसाने ६०० रुपयात जगायचे कसे बोला?
न्यायलायाने केला न्यायिक सवाल,
सरकार दफ्तरी मात्र माजला मोठा बवाल.

अनगडवाणी