Sunday, October 21, 2018

_प्रारब्धाची रेषा पुसता येते_

🙏🙏🙏

_प्रारब्धाची रेषा पुसता येते असे श्रीसमर्थ रामदास स्वामी छातीठोकपणे सांगतात हे सत्य होय._

अशी कित्येक उदाहरणे आपल्या दरबारात आपल्या श्री सद्गुरू माऊलीनी त्यावेळी प्रत्यक्षात घडवून आणलेली होती आणि ती आपल्यातील ब-याचजणांनी अनुभवली देखील आहेत.

श्रीसमर्थ रामदास स्वामींची एक गोष्ट येथे प्रकर्षाने आठवते ती म्हणजे, "श्रीसमर्थ रामदास स्वामी" ह्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी याच दरबारात आल्यावर आपल्या श्री समर्थ सद्गुरू माऊलींसमोर छत्रपतींना दर्शन देण्यात यावे यासाठी आपली आदीअंतापासूनची तपःश्चर्या देखील पणाला लावली होती. असे ते श्रीसमर्थ रामदास स्वामी ज्यावेळेस हे म्हणतात, ते खरेच होय.

येथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, श्रीसमर्थ रामदास स्वामी ज्यावेळी असे म्हणतात की, *माझी आदीअंतापासूनची जी तपःश्चर्या आहे, ती आपल्या चरणांवर सता*! *मी वाहण्यास तयार आहे, परंतु सता*! *माझ्या शिवबाला आपले दर्शन द्या.* याचाच अर्थ असा होतो की, *श्रीसमर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापूर्वीही होते, इतकेच नव्हे तर आदीअंतापासूनही होतेच.*

मग हे श्रीसमर्थ रामदास स्वामी कोण होते? तर ज्यांच्या नावातच जो *राम* दडलेला आहे, त्यांचे ते *दास* म्हणजे सेवेकरी होते. म्हणूनच ते स्वतःला रामाचा दास येणे *रामदास* म्हणवून घेत असत. 

सत् युगात श्री राम होऊन गेले. त्यावेळी श्री रामांबरोबर कोण होते? तर प्रत्यक्ष *श्री मारूतीराय.* श्री मारूती हे रूद्रच होते आणि शिवकालीन श्रीसमर्थ रामदास स्वामी हे दुसरे तिसरे कुणी नसून, प्रत्यक्ष रूद्र देवतेचाच अवतार होते.

याचाच अर्थ असा होतो कि, श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रत्यक्ष श्री रूद्र देवतेनेच आपली आदीअंतापासूनची तपःश्चर्या श्री सद्गुरू माऊलींच्या चरणांवर वाहण्यास (म्हणजेच ॐ कारांच्या चरणी) आपली विनम्रता दर्शविली. *धन्य ते सद्गुरू आणि धन्य तो सेवेकरी.*

ज्या ज्या वेळी श्रीसमर्थ रामदास स्वामी दरबारात एकचित्त होत, त्या त्या वेळी ते *आदेश अल्लख* न म्हणता आपली स्वतःची अशी ललकारी देत, ती म्हणजे *जssय जssय श्री रघुवीर समर्थ* एका लयबद्ध स्वरांत जेव्हा त्यांच्या मुखातून ही ललकारी बाहेर पडत असे, तो क्षण ऐकण्यासारखा व अनुभवण्यासारखाच क्षण असावयाचा. अंगावर रोमांच उभे राहावयाचे. धीर गंभीर आवाजातील श्रीसमर्थ रामदास स्वामींची ललकारी ऐकणे म्हणजे महत् भाग्यच होते. ज्यांनी ज्यांनी हा प्रसंग पाहिला, अनुभवला ते खरोखरीच भाग्यवान. या ललकारीनेच संपूर्ण वातावरण भरून जायचे.

अशा या सद्गुरूंचा सेवेकरी श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जेव्हा आपल्या श्री सद्गुरू माऊलीने प्रत्यक्ष दर्शन दिले, तो प्रसंगही आज डोळ्यांसमोर उभा राहतो. ह्या दर्शनाचे वैशिष्ठ्य हे होते की, श्री छत्रपती शिवाजी महाराज एकचित्तता साधतात तेव्हा, ते ज्या ज्योतीमध्ये एकचित्त होत, ती ज्योत चक्क आसन सोडून अर्ध स्थितीत एका पायावर उभी राहावयाची, कंबरेत वाकावयाची आणि नंतर त्रिवार मुजरा करावयाची. म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष श्री सद्गुरू माऊलींना मुजरा करून दर्शन घ्यावयाचे व दर्शन घेऊन झाल्यावर, ते जेव्हा पुन्हा आपल्या स्थानी विराजमान होत, तो ही प्रसंग डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखाच होता. किती लयबद्ध आणि शांतपणे ते अर्ध स्थितीत उभे राहावयाचे, तेवढ्याच शांतपणे आणि लयबद्धपणे ते पुन्हा बसायचे, हे कुणीही पाहू शकले नसते, ते त्यावेळी काहीजणांना पाहता आले, ते केवळ आणि केवळ श्री सद्गुरू माऊलींमुळे.

ह्याबद्दल सांगताना स्वयम् श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सत्य उघड केले की आजपर्यंत त्यांनी अशाप्रकारे मुजरा फक्त श्री तुळजाभवानी, श्रीसमर्थ रामदास स्वामी आणि आपली श्री सद्गुरू माऊली (म्हणजेच ॐ कार) यांना सोडून कुणालाच केलेला नाही.

💐🙏💐👏💐🙏💐👏💐

अनगडवाणी