प्रेम हे प्रेम असतं.......!!!
प्रेम हे प्रेम असतं,
दिल्या घेतल्याचं काही नसतं......
अंतरंगात न्हाऊन निघतं,
तेच मुळात खरं प्रेम असतं......!!१!!
प्रेमाला नसते कसलीही जात,
प्रेमाला नसते विशेषणांची पात.....
तरीही होतात प्रेमामध्ये अपघात,
कारण प्रेम हे शेवटी प्रेम असतं....!!२!!
प्रेम हे आईच असतं,
तसेच प्रेम हे ताईच देखील असतं.....
प्रेम हे भाईच असतं,
तसेच प्रेम हे सईच देखील असतं......!!३!!
कधी कधी प्रेमाच काही खर नसतं,
कधी कधी प्रेम हे आंधळ देखील असतं.....
कधी कधी ते चांगल असतं.
तर कधी कधी ते टांगलं देखील जातं,
शेवटी प्रेम हे प्रेम असतं......!!४!!
मयुर तोंडवळकर – 9869704882
ह्याच विषयावरील प्राणीमात्रांचे प्रेम पाहण्यासारखे आहे........त्यासाठी खालील लिंकवर क्लिक केल्यास आपणास प्रेम हे प्रेम असत, कावळ्यांच देखील सेम असत.......हा विडीओ पाहता येईल....................
http://www.youtube.com/watch?v=k3Kg26ApNjQ&context=C35c5a20ADOEgsToPDskL22TM1QkhgkPWDFBzqO3SA