Showing posts with label मयुर तोंडवळकर. Show all posts
Showing posts with label मयुर तोंडवळकर. Show all posts

Friday, August 14, 2020

आत्मविश्वास

*आत्मविश्वास*
शब्द किती सोपा.
असे कां बरे म्हटले जाते?
काय असेल बरे हा शब्द?

आत्मविश्वास हा एकच शब्द आहे की हा संधी आहे.
या शब्दाची फोड करावयाची झाल्यास हा संधी देखील होऊ शकतो. जसे, खालीलप्रमाणे लिहिले, तर......

*आत + मधील + विश्वास*

येणे स्वत:च्या आत असणारा म्हणजे आत मनामध्ये असणारा विश्वास.

हा आत्म्याचा विश्वास होऊ शकत नाही, कारण आत्म्याला म्हणजे आपल्यात आत असणारी मा अर्थात ज्योत, जी बिंदू स्वरुपी असून, तिचा या पंचमहाभूताच्या देहाशी तसे पाहिले तर काही एक संबंध नसतो. परंतु तो आत्मा जर त्या पंचमहाभूताच्या देहात नसेल तर पंचमहाभूताचा देह हा असून नसल्यासारखाच असतो.

पंचमहाभूतांचा देह हा सदा न कदा मनाच्या ओढणीने कार्यरत असतो, त्यामुळे तो मायेत असतो. परंतु आत्मा हा स्वयं असतो. ना तो कोणाच्या इशा-याने चालत, ना कोणाच्या आदेशाने हलत. तो स्वतंत्र आहे.

हा ! तो चालतो फक्त नामाच्या गतीने. नाम म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच नाम.

जो भक्त नेहमी सदा न कदा, त्या भगवंताच्या, त्या सताच्या, त्या सद्गुरुंच्या, त्या ओंकारांच्या, त्या अनंतांच्या नामस्मरणात दंग असतो, त्या भक्ताचा त्याच्या *आत मधील विश्वास* हा कसा असणार, तर तो *आत्मविश्वासपूर्णच* असणार नाही कां?........अनगड

Sunday, January 19, 2020

गुरूकिल्ली

*_फार मोठी गोष्ट ह्या गुरुदेवांनी आपल्या भक्तांना उपदेश करताना सांगितलेली दिसून येते._*

_खरंच ! आहे कां हो वेळ आपल्या सारख्या कलियुगात राहणा-या भक्तांना ?_ 

_नेहमीच सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळ तरी असतो कां आपणाला?_

_हो हे ही खरेच म्हणा._ _सकाळी उठल्यापासून जे आपण या मायावी कर्तव्यात म्हणजेच आपल्या जबाबदा-यांमध्ये इतके लिप्त होऊन गेलेलो असतो की इतर ठिकाणी, आजुबाजूला बघण्यासाठीही आपल्याकडे वेळ नसतो, मग अशातच भगवंताची आठवण करायला वेळ कुठून असणार. नाही कां?_

_या गोष्टींवरून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, भक्त सुज्ञ तर असतो, पण प्रत्यक्षात या आजुबाजूच्या मायावी स्थितीमुळे त्याच्या संज्ञा सगळ्या बोथट झालेल्या असतात._

_जो भक्त आपल्या गुरुदेवांना सांगत असतो की काय बरोबर आणि काय चुक, त्या भक्तालाच जर हे कळले असते की आपण कुणाला काय सांगतो आहोत, तर मग काय सांगावे?_ असे कदाचित घडलेही नसते.

*_ह्या गोष्टीवरुन असे वाटले की आपल्याकडेही असे हुश्शाsssर भक्तगण असतीलही नां?_*

अन्यथा ह्या अगोदर जे घडले, जे आता घडते आहे आणि जे पुढे भविष्यात देखील घडणार आहे, ते वरील उदाहरणात गुरूदेवांनी म्हटल्याप्रमाणे. 

*_ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह कधीच थांबणार नाही आणि वाहणाऱ्या पाण्यामध्ये आपल्याला नदी पार करावी लागेल, त्याचप्रमाणे आपले हे (तुटपूंजे ६०/७० वर्षाचे) जीवन देखील संपुन जाईल, परंतु आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या कधीच संपणार नाहीत आणि आपणांस वेळही कधीच मिळणार नाही._*

_तरी सत् भक्तांनो ! वेळीच सावध व्हा आणि नदी आटण्याचा अट्टाहास करु नका._

*जो येईल तो वेळ आपला समजा आणि जेवढी जास्तीत जास्त सेवा म्हणा, उपस्थिती म्हणा, सत् कर्तव्यता म्हणा, स्थानात येणे म्हणा, नामस्मरण करने म्हणा इत्यादी सात्त्विक गोष्टींमध्ये वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न आपण सर्वस्वांनी करुया.*

*_सत् स्थानांचे महात्म्य कांहीं औरच आहे आणि त्याबद्दलची कल्पना आपल्याला आपल्या सतानेच दिलेली आहे._* 

*साक्षात श्री सद्गुरू माऊलींकडून आपणांस ते स्थुलात असतांना त्यांनी सर्वस्वांना समजावून सांगितलेलेच असल्यामुळे आपण आपला (अमुल्य) वेळ, थोडाबहुत कां होईना, वेळोवेळी श्री सद्गुरू माऊलींसाठी देऊन, त्यांच्या कर्तव्यात देऊन, आपले स्वत:चे कोटकल्याण करुन घेणे नाही कां उचीत ठरणार?*

एक लक्षात घ्या, हे सांगणारा मी कोण? मी कुणीही नाही. सद्गुरू माऊलींचा एक सेवेकरी, एक पाईक. परंतु, ह्या कथेवरून ह्या सर्वस्व गोष्टींची आठवण झाल्याने फक्त एक आठवण म्हणून येथे हे कथन करता झालो एवढेच. मनाला भावली, मनाला भुरळ घातली आणि अंत: करणापर्यंत पोहोचली. निमित्ते काही गोष्टी आठवल्या, वाटल्या, त्यांची उजळणी व्हावी या हेतूने येथे मांडल्या. कुणी किती घ्यावे, कुणी काय घ्यावे, कुणी किती महत्त्व द्यावे, हे सर्वस्व ज्याचे त्याने ठरवावयाचे आहे. 

बस इतकेच सांगावेसे वाटते की आपण, आपला दरबार, आपला मुळाश्रम, आपले सद्गुरू, आपल्या श्री सद्गुरू माऊलींची शिकवण, आपल्या दरबारची ठेवण अशी कितीतरी वैशिष्ट्यें ही बाहेर इतर कुठेही सामान्यरित्या सापडू शकणार नाहीत अशी आहेत.

आपले स्थान हे आदीअंतापासून असलेले व आदीअंतापर्यंत राहणारे असे, आपल्या, तसेच ह्या विश्र्वाचे जे मालिक आहेत, त्या सताचे, त्या ओंकाराचे हे स्थान आहे, जे स्वयम् आहे. या स्थानामध्ये स्वयंम् प्रकाश आहे आणि ह्या स्वयंम् प्रकाशात नुसते येऊन बसणे हे देखील भाग्याचे लक्षण आहे. मांगल्याचे प्रतीक आहे. आपल्यावर बाहेरच्या वातावरणामुळे जी मायेची पुटें चढलेली आहेत, त्यांचा नाश करण्याची क्षमता ह्या स्थानातील स्वयंम् प्रकाशात आहे. 

इतकेच नव्हे तर ह्या स्थानात जसा आपल्या मानवी भक्तगणांचा वावर असतो, तसाच सतत चोवीस तास वावर अदृश्य रितीने असणा-या भक्तांचा देखील असतो, त्यामुळे जो कुणी ह्या स्थानांत उपस्थित असतो त्याला नकळतच त्या गोष्टीचा लाभ पोहोचतच असतो. मग तो नामस्मरण करीत असो वा नसो, ध्यानधारणा करीत असो वा नसो, अथवा कर्तव्यकर्म करीत असो वा नसो. त्याशिवाय चोवीस तास निरंतरपणे सतांचा शुभ आणि शुभ्रप्रकाशाचा वर्षाव देखील अव्याहतपणे बरसत असल्याने सोन्याहूनही पिवळे असाच हा योग असतो. अशा परम् पवित्र सत् स्थानांत, सान्निध्यात आपण आपला वेळ घालविला, तो वाया जाईल काय? आपला आपणच विचार करा आणि ठरवा आपल्या आयुष्याची वाटचाल कशी करावयाची ते !

*_अपले भाग्य अपुल्या हाती_*
*_चालवावी अपुली मती_*
*_अनगड म्हणे हे जगरिती_*
*_द्यावी आपण तिलांजली_*

👏🙏👏💐🌹🌷👏🙏👏💐🌹🌷

Thursday, January 16, 2020

बदलापूरायन

बदलापूर - एक सेंट्रल रेल्वेवरील कर्जतच्या दिशेने असणारे सर्वसामान्य रेल्वे स्टेशन. हे ठाणे जिल्ह्यात असून ह्याचे सर्वसाधारण क्षेत्रफळ अंदाजे ३५.६८ स्के.मी. इतके आहे. 

येथे आल्यावर पाहण्यासाठी जवळपास उपलब्ध असणारी ठिकाणे म्हणजे कोंडेश्वर मंदिर, मलंगगड, चिखलोली (अंबरनाथ) आणि बारवी धरण, माहुली शिखर, कोंडेश्वर तलाव, चंदेरी किल्ला, विस्परींग पिपल रिसाॅर्ट, धनगर धबधबा इत्यादी इत्यादी.

आम्ही येथे आलो कारण आमचे एक मित्र आणि सत्संग परिवारातील स्नेही चंद्रकांत येवले यांच्या आग्रहाखातर, जे गेल्या काही वर्षांपासून येथे वास्तव्यास आहेत. 

येथे उतरल्यावर मुंबईच्या उपनगरीय स्टेशनांसारखेच हे छोटेखानी स्टेशन असून, बाजूलाच भलामोठा स्कायवाॅक बांधलेला दिसून येतो. ह्याचे नांव हेनरेपाडा फुट ओवरब्रीज असून, तो बाजूच्याच सर्वोदय नगर एरियाचा भाग आहे.

आमच्या यजमानांनी आमची चोख व्यवस्था अगोदरपासूनच करुन ठेवलेली होती. त्यामुळे जसे आम्ही स्टेशनवर उतरलो, त्यांनी आमचे आनंदाने स्वागत करुन पलीकडे उभ्या करून ठेवलेल्या इको ह्या मोठ्या टॅक्सीत नेऊन बसविले. 

जाता जाताच यजमानांनी आम्हांस कल्पना दिलेली होती की आपणांस बदलापूरच्या एका प्रसिध्द वडेपाववाल्याकडे *मुळगांवचा वडापाव* जायचे आहे आणि तेथून पुढे मग डॅमवर (धरणावर) जावयाचे आहे.

दहा-पंधरा मिनिटांत आम्ही आमच्या संकेतस्थळावर पोहोचलो देखील. बाहेरच ब-याचशा गाड्या पार्क केलेल्या लांबूनच दिसून येत होत्या, त्यामुळे क्षणभर असे वाटून गेले की आपला नंबर लवकर काही लागणार नाही. परंतू घडले विपरीत. जसे आम्ही गाडीतून उतरून बाहेर पडलो, तेव्हाच कळले की आज म्हणावी तेवढी गर्दी नसल्याने, आम्हांला लवकरच एकत्र बसण्याची जागा उपलब्ध होणार आणि झालेही तसेच.

झाले. ताबडतोब आॅर्डर दिली गेली आणि कांहीं वेळातच गरमागरम मुळगांवचा फेमस वडापाव आमच्या टेबलांवर हजर झाला. प्रथमतःच कागदाच्या प्लेटवरील वडापाव पाहून मन समाधानी पावते न पावते तोच बाजूलाच प्लेटवर मिरचीच्या हिरव्यागार रंगाची ठेच्याची चटणी पाहून गर्भगळीत व्हावयास झाले. त्या ठेच्यातून हिरवट पिवळ्या रंगाचा तेलाचा पाट वाहताना पाहून वाटले, आता आपले काही खरे नाही.

परंतु, गंमत अशी की दृश्य जेवढे भयानक वाटत होते, तेवढे ते प्रत्यक्षात नव्हते. जरी हा हिरव्यागार मिरचीचा ठेचा होता, तरी तो आपल्या नावाला न जागणाराच होता आणि म्हणूनच की काय थोड्या वेळाने पाहतो तर ठेचा प्लेटवरून गायब झालेला होता आणि फक्त हिरवा पिवळा तेलाचा ओघळ तेवढा प्लेटवर शिल्लक राहिलेला होता.

अशाप्रकारे सकाळच्या नाश्त्यावर येथेच्छ ताव मारुन आमची पलटण पुढच्या प्रवासाला निघाली. झाले. थोड्याच वेळात आम्ही डॅमच्या एका कोपरावर आलो. दुर्दैव असे की धरण पाहण्यासाठी यावेळी रितसर परवानगी देण्यात आलेली नसल्याने सर्वचजण नाराज झालेले होते. कारण डॅमवर सैरसपाटा मारण्यास यावेळी मिळणार नसल्याने पुढील कार्यक्रमाचे आता काय करायचे अशा विचारात असतानाच, आमच्या सोबत आलेले, तेथीलच एक ग्रामस्थ श्री रवी यांनी एक उपाय सुचविला. म्हणाले, आपण धरणाच्या खालील भागात रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाखाली जाऊया. थोडा वेळ पाण्यात पाय भिजवूया. 

ठरले. आयडियाची कल्पना सगळ्यांनाच आवडली. खाली उतरण्यासाठी असलेला रस्ता शोधू लागलो आणि शिवाजी महाराजांचा काळ आठवला. किल्ल्यावर जाताना जसा एकपदरी दगडाधोंड्यांचा रस्ता असायचा, बाजूलाच खोल दरी असायची, तसा हा रस्ता भासला. रस्ता कसला? हि तर पायवाटच होती. होय नाय होय नाय करीतच आम्ही शेवटी खाली उतरण्यात यशस्वी झालोच.

येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आम्ही भेट दिलेली ही वेळ येथे येण्याची नक्कीच नव्हती. त्यामुळे येथे जे दृश्य दिसत होते ते म्हणजे सर्वत्र पसरलेला काळा कातळ. काही ठिकाणी निसर्गानेच निर्माण केलेले पाण्याचे डोह. काही खोल, तर काही उथळ. पुलावरून पाणी वाहून जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. कारण हा काही पावसाळी हंगाम नव्हता, ज्यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेट देत असतात. 

खाली उतरतानाच रवी भाऊंनी कल्पना दिलेली होती की जो दूरचा डोह आहे, तेथे मात्र कुणी जाऊ नका, कारण तो एक अॅक्सिडंट स्पाॅट आहे. तेथे जाणे म्हणजे जाणूनबुजून आपण अपघात अंगावर ओढून घेतल्यासारखे होईल. तेथे पावसाळ्यात हमखास अपघात घडून येत असतात. कारण पावसाळ्यात पाण्याच्या खोलीची कल्पना नव्याने येणाऱ्या पर्यटकांना येत नाही आणि त्यामुळें नाहकच अपघात घडून जीवावर बेतण्याचे प्रसंग सुद्धा उद्भवतात.

थोड्या गमंती जमती करून, मनोरंजनात्मक कार्यक्रम करून पोटात कावळे ओरडायला लागल्याने आम्ही तेथून काढता पाय घेतला. रवी भाऊंच्या घरी अगोदरच जेवणाची सोय करून ठेवण्यात आलेली असल्यामुळे सगळ्यांचे पाय आपसूकच तिकडे वळले. जेवणाचा बेत हा घरगुतीच असल्याने कित्येक दिवसांनी गावाकडचे घरगुती जेवण खावयास मिळणार असल्याने पाहुणे मंडळी खूप खुष होती. दोन्ही प्रकार - वेज, नाॅनवेज उपलब्ध होते. नाॅनवेजमध्ये गावठीचा बेत होता, तर वेजमध्ये वरण भात, उसळ, चुलीवरची ताजी ताजी तांदळाच्या पिठाची भाकरी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती. मंडळींनी येथेच्छ मन सोडून भोजन केले, ते यजमानांचे गुणगान गातच. किती दिवसांत असे गावाकडचे घरगुती जेवण खावयास मिळाले नव्हते आणि मिळणारही नव्हते. याचे अप्रुप काही वेगळेच होते.

तेथेच कांहींनी आराम केल्यावर, पुढे कोंडेश्वर मंदिरास भेट देण्याचे ठरले. हे ठिकाणही एका बाजूला असून, तेथे आजूबाजूला डोंगर, डोह, कातळ, आणि जंगलच असल्याचे जाणवले. हा ही एक निर्जन भागच आहे. जुने शिवाचे मंदिर असून, बाजूलाच डोह देखील आहे. येथील डोहात देखील पावसाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांचे अपघात घडत असतात. त्यामुळे हा ही भाग तसा सुरक्षित नाहीयय. परिसरात ह्यावेळी तरी स्वच्छता पाहावयास मिळाली. मुख्य कमानीपासून बरेच आत हे मंदिर छोटेखानीच आहे. येथे लिंग स्थापिलेले असून, गाभाऱ्यात मात्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. पावसाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य खुललेले असावे, हे आजूबाजूचा प्रदेश डोळ्याखालून घालताच जाणवते. श्री शंकराचे हे स्थान असल्यामुळे येथे जाणवणारी शांतता देखील भयाण असल्याचे जाणवते. माणसांचा वावर येथे दिसून येत नसल्याने, ती प्रकर्षाने जाणवली असावी इतकेच.

तेथून पुढे परतीचा प्रवास आटोपून आम्ही बदलापूर स्टेशन कधी गाठले हे कळलेच नाही.

Wednesday, August 21, 2019

बुलबुल

झावळीवर बसली, बुलबुलांची जोडी
कावळा करु लागला, त्यातच लाडीगोडी
त्या जोडीला ही, लाडीगोडी कांही रुचेना
कावळ्याच्या गोडीगुलाबीला, ती जोडी काही फसेना

बुलबुलांची जोडी,
कावळ्याची लाडीगोडी,
दूर दूर जाई जोडी
थोडी थोडी थोडी थोडी......

Monday, September 24, 2012

सार्वजनिक गणपतींचे वास्तव......!!!


सार्वजनिक गणपतींचे वास्तव......!!!
लोकमान्य टिळकांनी जो सार्वजनिक गणपती उत्सव चालू केला होता, त्यामागील कारण होते जनजागृती आणि जनजागृतीतून, परदेशी जोखडातून समस्त भारतीयांची muktatमुक्तtता. त्यावेळी इंग्रजांनी सर्वत्र बळाच्या जोरावर समस्त हिंदुस्तानी जनतेची मुस्कटदाबी केलेली होती. बाहेरून आलेले हे परकीय येथील स्वकियांवर इतके हावी झालेले होते की जनसामान्यांना त्यांच्याविरुद्ध ‘ब्र’ देखील काढायची भीती होती. अशा या भयंकर परिस्थितीत लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी नामी उपाय शोधून काढला व तो म्हणजे सार्वजनिक गणेशोस्तव. आपणा समस्तांस विदित आहेच की त्यावेळेस गणपती हा फक्त घराघरातून पूजिला जायचा. त्यामुळे टिळकांनी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व समस्त भारतीयांना एकत्र आणण्यासाठी हा उत्सव सार्वजनिक रीतीने साजरा करून जनजागृतीचा हा वसा त्यावेळेस उचलला होता.
परंतु आता व्यापारीकरण एवढे झाले आहे की या उत्सवाच्या माध्यमातून जमेल तेवढे व जमेल तसे य उत्सवाचे बाजारीकरण म्हणा किंवा व्यापारीकरण म्हणा सुरु झालेले आहे व तो आता दृश्य स्वरुपात व राजरोसपणे लोकांपुढे मांडला जात आहे. याची ताजी उदाहरणे म्हणजे य गणपती उत्सवात कोणी आपला गणपती राजा आहे म्हणून संबोधतो तर कोणी त्यास महाराजा आहे असे म्हणतो, कोणी त्यास नवसाला पावणारा आहे म्हणून जाहिरात करून लोकांना आकार्शिण्याचे काम करतो, तर कोणी त्याला निरनिराळ्या माध्यमांच्या स्वरुपात जनतेसमोर पेश करून त्याचे भांडवल करीत असतो, जसे, अमुक तमुकचा राजा, महाराजा, नावाने ओळख निर्माण करून आता त्याचे कायदेशीर हक्क म्हणजेच पेटंट / ट्रेड मार्क घेण्याचा मार्गावर हे लोकं आहेत, तर कोणी आपला बाप्पा कसा आकर्षित होईल ह्यासाठी जीवाचा आटापिटा करून त्याला वेगवेगळ्या स्वरुपात लोकांसमोर आणण्याचे काम करीत आहेत, जसे, आता एका नामांकित चोकलेट निर्मात्या कंपनीने एका मॉलमध्ये चक्क त्यांच्या चोकलेटच्या गोळयांचाच गणपती बनवून लोकांना विशेषकरून बच्चे कंपनीला आकर्षित केलेले आहे. या अगोदर काहीजणांनी या गणपतीला नारळाच्या किशीपासून,] सुपारीच्या फळांपासून, केल्यांपासून, ते चक्क मोत्यांच्या मान्यांपासून, काजुगारापासून, अशा वैविध्यतेणे नटविले होते व लोकांना आकर्षित देखील केले होते.
एकंदरीतच काय टिळकांचा सार्वजनिक गणपती उत्सव साजरा करण्याचा जो उद्देश्य होता, तोच मुळी पायदळी तुडवून, या उत्सवाला बाजारीकरणाचे सवरून प्राप्त करून दिलेले आहे आणि त्यातून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा घाट घातलेला आहे. हे करता करता ही मनसे यामध्ये इतकी गर्क झालीत की अनवधानाने कां होईना - वरील चित्रात ते वास्तव दृष्टोपत्तीस आले आहे.
या चित्राकडे तुम्ही जर बारीक लक्ष देऊन पाहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की संपूर्ण गणेशाचे छबीमध्ये कुठेही उणेपणा नाही. परंतु वास्तव हे आहे की त्याच्या पायाजवळ जी दानपेटी ठेविलेली आहे, त्यावर असा उल्लेख आहे की – उपनगराचा राजा आणि त्या खालोखालाच लिहिलेले आहे दानपेटी. यावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे उपनगराचा म्हणा किंवा मुंबईचा म्हणा हा जो कोणी राजा आहे, तो गणपती नसून, ही दानपेटी आहे असे प्रतीत होते आणि हे किती भयानक वास्तव आहे ह्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
एकंदरीतच आजचा गणपती उत्सव पाहता हे सत्य नाकारता येत नाही की आजचा राजा हा गणपती नसून, ही दानपेटीच आहे. ज्याचावर हा समस्तांचा, सर्वच गणेशोस्तव मंडळांचा हा खेळ उभा आहे. आज पैशालाच किंमत आहे ज्याच्याजवळ तो आहे, त्याचीच सद्दी आहे. तो करील ती पूर्व दिशा आहे.
आपण नेहमी वर्तमानपत्रातून वाचतो की या गणेशोस्तवामध्ये कोट्यावधींची उलाढाल या दहा दिवसात होत असते. यावरून कल्पना येईल की जरी जनतेसाठी हा गणपती उत्सव असला तरी काही लोकांसाठी तो उत्सव किंवा सण न राहता व्यापार झालाय. त्याच्याकडे ते व्यापारी दृष्टीकोनातूनच पहात असतात व वर्षभर जेवढी मेहनत करून आर्थिक लाभ मिळणार नसतील, तेवढे ते आर्थिक लाभ या दहा दिवसात कमावित असतात.
पूर्वीसारखे देखावे, समाज प्रबोधन करणारी दृश्ये, त्या अनुषंगाने येणारे सामाजिक सेवेचे भान ठेवलेले कार्यक्रम आता हळू हळू लोप पावत चाललेले असून, त्यांची जागा आता व्यापाराने घेतलेली आहे. याला काही अपवाद आहेत म्हणा, परंतु एकंदरीतच मोठ्या स्वरुपात याचे बाजारीकरण झालेले आपल्या दृष्टोत्पत्तीस पडते, हे सत्य नाकारता येत नाही.
मयुर तोंडवळकर – 9869450934 / 9869704882

अनगडवाणी