Saturday, February 25, 2012

मयुरटीका................हल्लीची राजनिती ..........!!! (ही वात्रटिका नव्हे........तर ही आहे मयुरटीका)


हल्लीची राजनिती ..........!!!

जाऊ तिथे खाऊ,
आम्ही बोम्बलत राहू......
आमच्या विरोधात जाईल त्याला,
यमसदनाला धाडू........

हीच आमची निती,
हीच आमची कृती.......
ह्यालाच म्हणतात,
हल्लीची राजनिती......

वल्गना......!!!

ऐका हो ऐका,
येदियुरप्पांची वल्गना ऐका.....
येत्या सोमवारपर्यंत,
मुख्यमंत्र्यांची खुर्ची नाही दिली मला.....
तर सगळ्या माझ्या पाठीराख्यानो,
सदानंद गौडांवर बहिष्कार घाला....
केंद्रीय नेत्यांना आहे ही सूचना,
नाहीतर काहीतरी अघटीत घटेल घटना......

निवडणूकीचे राजकारण........!!!

निवडणूक आली
आणि आरसा दाखवून गेली,
प्रत्येकाच्या पदरात माप
टाकून गेली,
कोणालाच नाही दिले
तिने निर्विवाद संख्याबळ,
नाशिकसारख्या ठिकाणी,
सगळ्यांना मिळाले एकसारखे बलाबल,

मुंबईत ठेवले बी.जें.पी.ला लांब,
नाशिकमध्ये बी.जें.पी.म्हणाली आता थोडे थांब,
गडकरीबरोबर झाले राजकारणाचे मनोमिलन,
गडकरींच्या मिस-कनेक्शन मागे, नाशिकचे राजकारण
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्स मधील मथळा)

मयुर तोंडवळकर .............9869704882

अनगडवाणी