“काश्मीर की कली”
आली आली थंडीची लाट आली,
“काश्मीर की कली” मुंबईत अवतरली.....(१)
थंडीच्या लाटेचा झाला रेकॉर्ड ब्रेक,
चला जाऊया, फिरुया आणि करुया मनालीचा ट्रेक......(२)
मनालीच कशाला हवी,
थंडीच आहे सर्वत्र हावी.......(३)
थंडीच्या या लाटेत सगळे झाले गप्प,
सार्-या जगातच सगळीकडे जीवन झाले ठप्प.......(४)
थंडीचा कहर.........!!!
चित्रात पाहतो आहे थंडीचा परिणाम,
सगळीकडेच असते खाली आलेले तपमान.......
तपमान खाली येताच गोठू लागते जनजीवन,
नाशिकात दवबिंदूंचे बर्फात होते अवतरण,
मुंबईत वाजू लागताच गारेगार थंडी,
आपोआपच बाहेर पडतात स्वेटर आणि बंडी,
सा-या जगभरच झाला थंडीचा कहर,
जनजीवन गेले गोठून, निसर्गाला येईना बहर.......!!!
मयुर तोंडवळकर ..............9869704882