👏👏👏
*_श्रद्धा_*
*श्रद्धा कशी असावी?*
आपले बाबा आपल्याला विचारणा करतात, *"श्रद्धा कशी असावी?"* आणि उत्तरही देतात, ते असे, *"श्रद्धा ठाम आणि सतशुध्द असावी."* पुढे ते म्हणतात, *"जर का सतच तुमच्या जवळ असेल, तर तुम्हाला इतर कुणीही दूर लोटू शकणार नाही."* इतकेच नव्हे तर, *_त्रिगुण - ब्रह्मा, विष्णू, महेश_* आणि त्यांच्या तीन शक्त्या - देखील तुम्हाला काही करू शकणार नाहीत. कारण त्रिगुण आणि त्यांच्या तीन शक्त्या, तसेच ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र हे सगळे या सताजवळ हात जोडून नम्रपणे उभे असतात. कारण त्यांची निर्मिती या सतानेच केलेली आहे, ह्याची त्यांना जाणीव आहे.
आता राहिला भाग तो देव-देवतांचा, दैवतांचा जी स्थिती त्रिगुणांपेक्षा खालच्या दर्जाची होय. असे असताना देखील आपण वरच्या दर्जाच्या स्थितीची दखल न घेता खालील दर्जाच्या स्थितीलाच जास्त मानतो नां? त्यांच्याच भजनी लागतो नां?
*यामधून एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की जर जगताचा व्यवहार हाकण्यासाठी सतानेच निर्माण केलेल्या या शक्त्या त्यांच्या चरणकमलाशी हात जोडून उभ्या आहेत, आणि आपण त्या सताचे जर सेवेकरी आहोत, तर मग आपण आपल्या सतावर संपूर्ण श्रद्धा न ठेवता, डळमळीत कां होतो? कां आपण इकडे तिकडे भटकतो? कां इतर मार्ग अनुसरतो?*
आणि म्हणूनच बाबा पुढे विचारणा करतात, *"जर सतच तुमच्या बरोबर असेल, तर बाकीचे सर्वस्व तुम्हाला वश नाही कां होणार?"* म्हणूनच पुढे आपणास जाणीव करून देताना म्हणतात, "अन् हे कशामुळे होऊ शकते? तर *"हे केवळ श्रद्धेनेच होऊ शकते."*
बाबा पुढे आठवण करून देताना म्हणतात, *"जर श्रद्धाच नसेल, तर अनंत प्रगट होतील कां?"* आणि *अनंत जर प्रगट झाले नाहीत, तर तुम्ही त्यांना कसे पाहू शकाल?* अशी विचारणा देखील करतात.
श्री सद्गुरू माऊली आपल्या या प्रवचनातून *गुरू गुह्य* सहजपणे उघड करून सांगतांना म्हणतात, *"सताचा संबंध अनंतांशी असतो, त्रिगुणांशी नाही. अनंत आणि सत् यांचे परस्पर संबंध असतात. अनंतांच्या संदेशानुसार सत् कर्तव्य होत असते आणि सताशिवाय, सद्गुरूंशिवाय तुम्ही अनंतांप्रत _जाणेच_ शक्य नाही."*
*सत् सान्निध्याशिवाय, सद्गुरू सान्निध्याशिवाय अनंतांकडे तुम्हाला जाताच येणार नाही.* याची जाणीवही करून देतात.
आणि हे होण्यासाठी किंवा करण्यासाठी उपायही सांगतात. *तो उपाय म्हणजे सतावर, आपल्या सद्गुरूंवर निस्सीम श्रद्धा ठेवणे होय.*
येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे *पायरी*. प्रत्येक देव देवतेची *एक पायरी किंवा दर्जा असतो*. त्यानुसार जगताचे व्यवहार हाकण्यासाठी अनंतांनी काही तत्त्वे निर्माण केलीत. त्यानुसार प्रथम ॐकार तत्व निर्माण करण्यात आले. तद्नंतर क्षिराब्धी. त्यांच्यानंतर त्रिगुण व त्यांच्यानंतर इतर लहान मोठी तत्त्वे निर्माण करण्यात आलीत.
ज्यावेळेस बाबा म्हणतात, *"सताचा संबंध अनंतांशी असतो, त्रिगुणांशी नाही. अनंत आणि सत् यांचे परस्पर संबंध असतात."* असे आपले बाबा कां बरे म्हणत असावेत?
तर लक्षात घ्यावयास हवे ते हे की, *सत् म्हणजे कोण आणि सद्गुरू म्हणजे कोण? अनंत कोणाला संबोधावे?*
येथे आपणास हे लक्षात घ्यावे लागेल - *निर्गुण आणि सगुण*.
_*निर्गुणातून सगुण प्रसवले म्हणजेच निराकारातून आकाराची निर्मिती झाली. येथे निर्गुण किंवा निराकार म्हणजे अनंत तत्व तर सगुण किंवा आकारी म्हणजे ॐ कार तत्व.*_ सत तत्व हे दोन्ही तत्वांमध्ये आहे. म्हणजेच ते आकारी आहे तसेच ते निराकारी देखील आहे. आता हे समजने अगत्याचे ठरेल की आपले सद्गुरू म्हणजेच सत, म्हणजेच ॐ कार तत्व, म्हणजेच आकारी तत्व आणि म्हणूनच श्री सद्गुरू माऊली म्हणते, *"अनंतांच्या संदेशानुसार सत् कर्तव्य होत असते आणि सताशिवाय, सद्गुरूंशिवाय तुम्ही अनंतांप्रत _जाणेच_ शक्य नाही."*
🕉☸✡🔯🕉☸✡🔯🕉
No comments:
Post a Comment