👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏
*रागामुळे अनुसंधानास धक्का बसतो हे तर आपल्याला माहीत आहेच. अहंकारात आग्रह असतो आणि त्या आग्रहीपणामुळे आपण संतापतो.*
हे केव्हा होते? जेथे आपली सत्ता असते तेथेच मनाविरुद्ध घडले की राग येतो. परंतु, जेथे आपली सत्ता चालत नाही, आपल्याला कोणी विचारीत नाही, आपल्यापेक्षा वरचढ अथवा पूज्य माणसादेखत जेव्हा मनाविरुद्ध घडते, तेव्हा राग येत नाही आणि आला तरी आपण आवरतो.
यावरून मला एक सुंदर कल्पना सुचली:- ज्या प्रसंगी मी रागावतो, तेथे जर श्रीसद्गुरू आले तर माझा राग एकदम उतरेल हे मला खरे खरे पटले.
भगवंताला आपण विसरतो म्हणून विकार आपल्यावर अंमल गाजवतात. अर्थात भगवंताचे स्मरण राखले तर विकारांचा अंमल लोपून जाईल. यालाच *नामस्मरण* म्हणतात.
*आपण नामस्मरण करतो म्हणजे भगवंत मला पाहतो, तो माझ्यापाशी आहे याचे स्मरण मनाला देत असतो.*
*नामस्मरणाचा हा अर्थ ज्या दिवशी माझ्या मनात उदय पावला त्या दिवशी साधनमार्गात माझी खरी वाढ झाली. नाम घेताना "ते आहेत, मला पाहत आहेत" ही भावना स्थिर ठेवण्याचा अभ्यास मी आरंभला आणि क्रोध मला स्वाधीन झाला!* 🙏
*जय श्री सद्गुरू माऊली*
###############
साभार: नरेंद्र नवार
No comments:
Post a Comment