Tuesday, December 25, 2018

विचार....

👏👏👏

*ll जय श्रीसद्गुरू माऊली ll*

आपण नेहमी आपल्या आयुष्याचा विचार करतो, दुस-याच्या आयुष्याचा विचार फार कमी जण करीत असतात. खरं पहाता, एक वेळ आपल्या आयुष्याचा विचार नाही केला तरीही चालेल, पण दुस-यांच्या आयुष्याचा विचार प्रथम करावयास हवा.  दुस-यांच्या आयुष्याचा विचार करतांना आपल्या आयुष्याचा विचार सहजगत्या होत असतो, त्याकारणे स्वतंत्र विचार करण्याची गरज रहात नाही.

आपलं अंतःकरण यासाठी शुध्द हवं, निर्मळ हवं, तरचं अनेक गोष्टी साध्य करता येतात. *एक गोष्ट प्रामुख्याने करावयास हवी ती म्हणजे प्रार्थना.*

ईश्वराला, आपल्या लाडक्या आराध्याला नियमीतपणे आपलं अंतःकरण स्वच्छ, निर्मळ ठेवण्यासाठी प्रार्थना करावयास पाहिजे. प्रार्थना ही महत्त्वाची भूमिका बजावीत असते. शुध्द मनानं केलेली प्रार्थना ही आराध्याकडे पोहोचते, त्यावेळी आपल्या प्रार्थनेमुळे सर्वांना आपल्या आराध्याकडून कृपाशीर्वाद लाभतो, सर्वांचं हितं साधलं जातं.

म्हणून आपल्या आयुष्याचा विचार करतांना प्रथम दुस-यांचा म्हणजे सर्वांचा विचार केला तर आपलं अंतःकरण शुध्द, निर्मळ होतं, तसंच दुस-यांचही होतं. आनंदी आनंद द्विगुणीत होतो. हा आनंद द्विगुणीत करतांना अंतःकरणातील सद्गुरुंची साथ आपल्याला लाभते, त्यावेळी मिळणारी अनुभूती आपल्याला तृप्ती देत असते - तृप्त करीत असते. यासाठी दुस-यांच्या अंतःकरणात स्वतःला पहा नी स्वतःच्या अंतःकरणात आपल्या सद्गुरुंना पहा. आयुष्य अधिकाधिक सुंदर - आनंदी, समाधानी करा.

#$#$#$#$#$#$#$#$#$#
साभार: प्रदीप नरहरि केळकर

No comments:

अनगडवाणी