Tuesday, December 25, 2018

नमो नमो श्री सद्गुरू राया

👏👏👏

*नमो नमो श्री सद्गुरू राया*
*नतमस्तक करीतो मी काया*
*यावे सत्वर उद्धराया*
*या दत्तजयंती शुभदिनी*

*अनगड म्हणे, हे देवा*
*मान्य करूनी घ्यावी सेवा*
*नामस्मरण हा अपुला ठेवा*
*स्मरतो दत्तजयंती शुभदिनी*

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

ज्ञान* येणे *प्रकाश

👏👏👏

*_ज्ञानेश सांगत आहेत, जर (तुम्ही) सतमय असाल, तर मुक्तीचा प्रश्नच उद्भवत नाही._*

*ज्ञानेश* येणे ज्ञान + ईश = ज्ञानेश हा झाला व्याकरणातील संधी. ह्याचा आध्यात्मिक त-हेने बोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपणास काय आढळून येईल? 

*ज्ञान* येणे *प्रकाश*
*ईश* येणे *ईश्वराचा*
येणे
*ईश्वराचा प्रकाश*
हा आपणास मिळाला असता, आपणास त्या ईश्वराच्या प्रकाशातच *ईश्वर कसा आहे?*, *ईश्वर कोण आहे?* हे स्वतः *ईश्वरच* आपणास दाखवून देत असतो. आणि हे ज्यावेळेस आपणास कळून येते, त्यावेळेस आपल्यातील द्वैत भावनाचा लोप पावून, आपणास तो *ईश्वर* म्हणा, तो *देव* म्हणा अद्वैताकडे आपणास घेऊन जातो.

एकदा का अद्वैताचा अनुभव आपणास मिळाला की सर्वस्वातील फोलपणा आपल्याला दिसून आल्यावर, तो मानव सतभक्तीत रममाण होतो. मग अशावेळी मुक्ती मोक्ष उरतच नाही. सताचे चरण प्राप्त होणे हाच आपला मुक्ती आणि मोक्ष होऊन जातो आणि ख-या अर्थाने तोच मुक्ती मोक्ष होय.

👏🌷👏🌷👏🌷👏🌷👏🌷👏

देवाचा मिसकाँल..

🌹 *OM SHRI SADGURU MAULI* 🌹

                    *देवाचा मिसकाँल..*

         हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आलेलाच आहे...... आपला मोबाईल फ़ोन घरातच कुठेतरी ठेवलेला असतो आणि नेमका तो वेळेला सापडत नाही..... मग आपण काय करतो...... अस्वस्थ होतो काही सुचत नाही...... मग एकच उपाय घरातील पतीला किंवा पत्नीला किंवा मुलांना त्यांच्या मोबाईल वरुन रिंग द्यायला सांगतो...... मग आपला फ़ोन वाजला की त्या आवाजाच्या दिशेने जातो आणि क्षणात आपल्याला आपला मोबाईल सापडतो...... असे जरी असले तरी तो काही पहिल्या फ़टक्यात सापडत नाही...... तीथे सुद्धा एक दोन वस्तु उलट सुलट कराव्या लागतात..... तेव्हा तो सापडतो...... पहा साधा फ़ोन..... आवाजाचा वेध घेवुन चटकन सापडत नाही......

मग सगळीकडे भरुन उरलेला परमेश्वर आपल्याला चटकन सापडेल का ? मग आपण काय करतो ? कुठे मठात जा..... देवळात जा.... बाबा महाराजांकडे जा.... कुठे देवाला..... झाडाला फ़ेऱ्या घाल..... कुठे धागा बांध एक ना अनेक.....

शेवटी काय.... निराश होवुन थकुन जातो.... आणि अचानक आपले पुर्वपुण्य उदयाला येते.... आणि आपण आपले गुरु सद़्गुरु संत यांचे चरणी शरण जातो..... आणि सांगतो सगळीकडे शोधले..... पण देव काही सापडत नाही..... मग गुरु.... सद़्गुरु.... संत सांगतात बाळा ! जरा शांत हो.... निवांत बैस.... मी तुला काही साधन (नामस्मरण, उपासना, इत्यादी) सांगतो.... त्याने तुझी डाउन झालेली बॅटरी  प्रथम चांगली चार्ज होईल..... ती एकदा छान चार्ज झाली की *मग मी “मिस कॉल” देतो देवाच्या मोबाईलवर*..... मग त्याचा रिंगटोन तुला ऐकायला येईल..... त्या आवाजाच्या दिशेने गेलास..... की देवाचा मोबाईल तुला सापडेल...... तो सापडला की.... त्या मोबाईलचा मालक “देव” तुला सापडेलच..... म्हणजेच उपासनेच्या शेवटी.... *देवा भक्ता अखंड भेटी*.....

करता करता तो दिवस उजाडतो.... जेव्हा आपले भाग्य उजळते..... आपली बॅटरी छान चार्ज झालेली असते.... मग अशावेळी आपले गुरु सद़्गुरु संत देवाला miss call देतात... आणि त्याचा रिंगटोन आपल्याच हृदयात वाजायला लागतो.......

मग आपण म्हणतो अरेरे ! उगाचच इकडे तिकडे शोधत फ़िरत होतो..... देव तर इथेच आहे माझ्या हृदयात..... सदा सर्वदा वस्तीला..... आता शोधाशोध करायची गरजच नाही......त्याचा रिंगटोन हरघडी वाजतोच आहे.... दोष आपलाच आहे.... की तो आपण ऐकत नाही किंवा तो आपल्याला ऐकायला येते नाही.....

*एक गुरुकृपा झाली की मगच तो ऐकायला येवु लागतो.🙏🏻*
साभार: आंतरजालावरून

मुक्ती 2

👏👏👏

*मुक्ती - भाग 2*

कालच्या भागात आपण मुक्तीचे चार प्रकार पाहिले.
त्या पुढीलप्रमाणे होत्या -

अ)  *समीपता* - देवाचे सानिध्य प्राप्त होणे. हि मुक्ती *उपासना अथवा पुण्याई* मुळे मिळते.

*समीप* या शब्दाचा अर्थच मुळी जवळ असा आहे. मुक्तीच्या बाबत समीपता म्हणतो, तो अर्थ म्हणजे देवाच्या सान्निध्यात जाणे किंवा जवळ जाणे होय.

*देवाचे सान्निध्य कधी प्राप्त होते?*
देवाचे सान्निध्य एक तर देवाची उपासना केल्याने प्राप्त होते किंवा ते पुण्याई मुळे प्राप्त होते. देवाची उपासना या जन्मातील असू शकते किंवा ती अगोदरच्या जन्मातील सुद्धा असू शकते. त्याचप्रमाणे पुण्याई देखील या जन्मातील वा पूर्व जन्मातील असू शकते. पुण्याईचा अर्थ पुण्य कर्म, हे ज्या मानवाकडून घडले, तो भाग्यवान होय. ह्यामुळेच तो मानव देवाच्या जवळ जाऊ शकतो, अन्यथा नाही.

ह्याच्या समर्थनार्थ तुकाराम महाराजांचा खालील अभंग उद्बोधक ठरेल - *पुण्यकाळ त्यांच्या राहिलासे उभा |* *देवकीच्या गर्भा देव आले ||*

या उदाहरणातून तुकाराम महाराज म्हणतात,"पुण्यामुळे देवकी मातेच्या गर्भात श्रीकृष्णाने जन्म घेतला."

ब)  *सलोकता* - देवाचा लोक प्राप्त होणे. विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ,रामाच्या उपासकांना साकेत धाम, कृष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो. हि मुक्ती *तपामुळे* मिळते.

*देव लोक कधी प्राप्त होतो?*
पहिली पायरी देवाच्या जवळ जाणे, तर ही पुढची पायरी होय.  यामध्ये आपण ज्या देवाची उपासना करतो, त्या देवाच्या लोकी जातो असे म्हटले जाते आणि ही पायरी आपणास तप केल्याने प्राप्त होते असे म्हटले जाते.

येथे तुकाराम महाराज म्हणतात, *वैकुंठा जावया तपाचे सायास|* *करणे लागे नाश जीवा बहु ||*

तुकाराम महाराज येथे म्हणतात,"जर कां मानवाला वैकुंठ म्हणा, कैलासी म्हणा किंवा स्वर्गात जावयाचे असेल तर त्याला तपःश्चर्या ही करावी लागते. तपसाधना केल्याशिवाय हे देव लोक गाठणे मानवाला शक्य होणार नाही.

क)  *स्वरूपता* - देवाचे रूप प्राप्त होणे. हि मुक्ती *ध्यानामुळे* प्राप्त होते.

*देवाचे रूप कशाने प्राप्त होते?*
तिसरी पायरी म्हणजे देवाचे रूप प्राप्त होणे होय. म्हणजेच मानवाला हे समजने की मी देवात आणि देव माझ्यात कसा सामावलेला आहे. ज्यावेळेस या रूपाची जाणीव मानवाला होते, त्याचवेळेला तो ख-या अर्थाने देवाशी एकरूप होतो. त्याचा अद्वैत भाव जागृत होतो. आणि हे फक्त ध्यानधारणेमुळे होऊ शकते.

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,

*ध्यानी ध्याता पंढरीराया|* *मनासहित पालटे काया ||*

आपण ज्याचे ध्यान करू, तेच रूप आपल्या मनाशी साकारते व आपण व ते कसे एक आहोत, ह्याची जाण आपणाला होते.

ड)  *सायुज्यता* - ब्रम्हरूप होणे. मोक्ष मिळणे. हि मुक्ती *ज्ञानाने* प्राप्त होते.

*ब्रह्मरूप कसे होता येईल?*
वरील तीन पाय-यांच्या पुढील व शेवटची पायरी म्हणजे सायुज्यता, येणे मोक्ष. एकदा का आपले मन त्या भगवंताशी मनाने तादात्म्य पावले की तो मानव हा मानव न राहता, देवत्वास जाऊन मिळतो. म्हणजेच तो त्या भगवंतात एकरूप, एकलय होऊन जातो. त्याला कशाचे भान राहत नाही, त्याला कशाची भ्रांत राहत नाही. अर्थात तो आणि भगवंत एक होतात. हाच तो मुक्ती मोक्ष.

*जे ज्ञान तयाचे हाती| तोची समर्थ मुक्ती|*

तुका म्हणे *नामापाशी चारी मुक्ती |* *एसे बहुता ग्रंथी बोलियले ||*

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात,"त्या *नामातच* चारही मुक्ती अंतर्भूत आहेत, असे ग्रंथ सांगतात."

शेवटी ह्या सर्वस्वातून काय निष्पन्न होते, तर *नाम* हेच मुक्ती दाता, *नाम* हेच मोक्ष दाता. *नामा* परते अन्य काहीही साधन नाही. म्हणूनच *नामा* बद्दलच सर्व साधु-संतांनी, ऋषीमुनींनी उहापोह केलेला आहे आणि *नामा* वरच सर्वस्व भर दिलेला आहे.

अनगड आपणास आठवण करून देताना म्हणतात,"आपल्या श्री सद्गुरू माऊलीने देखील *नामाचे* आणि *नामस्मरणाचे* महत्व आपल्या प्रवचनातून वेळोवेळी विशद केलेले आहे."

चार मुक्ती

👏👏👏

*चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली

बाबा जेव्हा म्हणतात चारही मुक्ती म्हणजे चारही देहांपासून मुक्ती. ते चार देह कोणते? तर स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देह. या चारही देहांपासून मुक्ती कधी मिळते? 

*तर ती मुक्ती आपणांस मिळते, ज्यावेळेस आपण सद्गुरूमय होऊन त्यांचे दर्शन मिळवितो.*

आपणास कल्पना असेलच की, आपल्या मातेने ही मुक्ती ह्या कलियुगातच मिळविली. दिनांक 24 नोव्हेंबर 2018 च्या *गुह्यत्वाचा साक्षात्कार* यामध्ये याचे विवेचन आलेलेच आहे.  

याचप्रमाणे मुक्तीचे चार प्रकार देखील सांगण्यात आलेले आहेत. हिंदू किंवा भारतातील प्राचीन समजानुसार मानवाला *चार प्रकारच्या मुक्ती* मिळू शकतात, त्या पुढीलप्रमाणे होत--

अ)  *समीपता* - देवाचे सानिध्य प्राप्त होणे. हि मुक्ती *उपासना अथवा पुण्याई* मुळे मिळते.

ह्याच्या समर्थनार्थ तुकाराम महाराजांचा खालील अभंग उद्बोधक ठरेल - *पुण्यकाळ त्यांच्या राहिलासे उभा |* *देवकीच्या गर्भा देव आले ||*

ब)  *सलोकता* - देवाचा लोक प्राप्त होणे. विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैकुंठ,रामाच्या उपासकांना साकेत धाम, कृष्णाच्या उपासकांना गोलोक प्राप्त होतो. हि मुक्ती *तपामुळे* मिळते.

येथे तुकाराम महाराज म्हणतात, *वैकुंठा जावया तपाचे सायास|* *करणे लागे नाश जीवा बहु ||*

क)  *स्वरूपता* - देवाचे रूप प्राप्त होणे. हि मुक्ती *ध्यानामुळे* प्राप्त होते.

*ध्यानी ध्याता पंढरीराया|* *मनासहित पालटे काया ||* तुकाराम महाराज

ड)  *सायुज्यता* - ब्रम्हरूप होणे. मोक्ष मिळणे. हि मुक्ती *ज्ञानाने* प्राप्त होते.

*जे ज्ञान तयाचे हाती| तोची समर्थ मुक्ती|*

तुका म्हणे *नामापाशी चारी मुक्ती |* *एसे बहुता ग्रंथी बोलियले ||*

यांत काय आहे?......

👏👏👏

*यात काय आहे?*

एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या. त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की *यात काय आहे?* दुकानदार म्हणाला *त्यात मीठ आहे.* संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले *यात काय आहे?* दुकानदार म्हणाला *यात साखर आहे.* असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले *आणि यात काय आहे?* दुकानदार म्हणाला *यात श्रीकृष्ण आहे.* सन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला अरे या नावाची कोणती वस्तू आहे मी तर कधी ऐकली नाही हे तर देवाचे नाव आहे. दुकानदार संन्यासी बुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला *"महाराज तो रिकामा डबा आहे पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो."*
बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. ते ईश्वराला म्हणाले *"अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस. ज्यागोष्टी साठी मी एवढा भटकलो घरदार सोडून सन्यासी झालो ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकवलीस. परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे"*. असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.

जे मन-बुद्धी- हृदय *काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख* अशा लौकिक गोष्टीने भरले आहे तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो. लोकाना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही म्हणजे स्वच्छ होत नाही तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.

👏💐👏💐👏💐👏💐👏💐
साभार आंतरजालावरून

भगवंताची प्राप्ती

👏👏👏

*मनुष्यमात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहे.*
- हे म्हणणे शत प्रतिशत खरे होय. पण कोणासाठी? तर जो सत् मार्गाने जाणारा असेल त्याच्यासाठी. जो असत् मार्गाने जाणारा असेल त्याला ह्याचे काय महत्व? जसे म्हणतात नां, गाढवाला गुळाची काय चव?

*भगवंत एकच ओळखतो* 
- जो त्याची भक्ती करतो, तो त्याला आवडतो, मग तो कोणत्याही जाती-धर्माचा, वर्णाचा अथवा रंगाचा असो. ह्याचे उदाहरण म्हणजे *आपले बाबा* आणि *आपला सद्गुरू दरबार.* 

आपणा सर्वांना कल्पना आहेच की आपल्या दरबारात अनेक जाती-धर्मांच्या गुरूबंधु भगिनी आहेत. त्यामध्ये हिंदू धर्मातील तळागाळातील लोकांपासून ते उच्च वर्णीय लोकांचा जसा समावेश आहे, त्याचप्रमाणे इतर धर्मीयांचा देखील समावेश आहेच. 

प्रवचनकर्ते येथे विचारणा करताहेत - *भाग्यवान कोणाला म्हणावे?*
- येथे प्रवचनकार सांगताहेत, ज्याच्याकडे पैसा-अडका, धन-दौलत, घर-दार, जमीन-जुमला आहे, तो भाग्यवान नसून, ज्याच्याकडे किंवा ज्याच्या सोबत भगवंत आहे, तो खरा भाग्यवान होय. त्यासाठी ते म्हणतात, "भगवंत आपल्याला भेटणे हे ह्या जन्माचे उद्दिष्ट्य ठेवून, तसेच हे प्रत्येकाने आपल्या जीवनातील मुख्य कार्य समजून, तो आपणास कसा प्राप्त होईल, हे पाहावे."

पुढे ते म्हणतात, "पैसा भगवंताच्या आड येत नसतो, तर आपला अहंकार, आपला अहंभाव, आपल्यातील असलेला *मी* पणा, भगवंत प्राप्तीच्या आड येत असतो."

प्रवचनकर्ते *सेवेची* फोड करताना म्हणतात, *"मी सेवा करतो"* असे जे म्हणतात, त्यांच्याकडून भगवंताची खरी सेवा घडतच नाही आणि ह्याला कारण *सेवा करणारा* म्हणतो, *"मी सेवा करतो. तो असे म्हणत नाही की, ही सेवा भगवंत माझ्याकडून करून घेत आहेत." त्या सेवेचा कर्तेपणा तो स्वतःकडे घेत असतो.* ह्याचाच अर्थ तो स्वतःचा अर्थ त्यात पाहतो, म्हणजेच तो स्वार्थ पाहतो, तो येथे परमार्थ पाहत नाही, परम् अर्थ तो पाहत नाही. त्यामुळे त्यामध्ये *मीपणाचा* भाव दिसून येतो.

पुढे ते म्हणतात, "भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म करतात, त्याला पुण्यकर्म म्हणतात."

पुढचा जो भाग आहे, तो अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. त्यात ते म्हणतात, "भगवंत माझ्याजवळ आहेत, ही श्रद्धा ठेवून वागा." आपल्या श्री सद्गुरू माऊलींच्या सद्या सुरू असलेल्या प्रवचनांतून तेही आपणांस श्रद्धेच्या श्रेष्ठपणाबद्दलच सांगताहेत.

*सत्कर्म करणारे पुष्कळ असतात* असे ते पुढे म्हणतात. परंतु त्यामध्ये बरेच वेळा स्वार्थ बुद्धी असते, असेही ते म्हणतात. परंतु असे करू नये असे त्यांचे म्हणणे आहे. कोणत्याही प्रकारे फळाची अपेक्षा न करता सत्कर्म करावे असे ते सांगतात. आणि त्यांच्या मते तीच खरी भक्ती होय.

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

हृदयातील सद्गुरुंशी संवाद

👏👏👏

मधलं पान

माझं हे मधलं पान मला खूप काही देतं असतं - शिकवीत असतं. काही वेळापूर्वी मला म्हणालं की, कुठंही लांबवर शोधायला जायची गरज नाही. शांत बस आणि डोळे मिटून घे. मनात येणारे विचार येवू देतं, रोखू नकोस विचारांना. जसे विचार येतील तसेच विचार विलीन होतील.

*आता हृदयातील सद्गुरुंशी संवाद साधायचा आहे. तुझे सद्गुरु तुझ्या हृदयात वास करून आहेत - निवास करून आहेत. त्यांना शोधायची तुला गरज नाही, तुलाच त्यांनी शोधलंय नी तुझ्या हृदयात वास करून आहेत.*

शिष्यानी सद्गुरु शोधत फिरायचं नसतं तर सद्गुरुच योग्य शिष्यांची निवड करीत असतात.

*हृदयस्थ सद्गुरुंशी संवाद साधण्याची वेळ आता आली आहे. बघ सद्गुरु तुझी आतुरतेने वाट पहात आहेत. विनम्र होवून त्यांच्या चरणावर अहंकार समर्पित करून लीन हो, एकरूप हो, सर्वकाही तुला देणार आहेत. एकरूपता प्राप्त होताच संवादही होईल सद्गुरुंशी. नामात राहून सद्गुरुंच्या चरणी रहा, मरणानंतरची मुक्ती अनुभवण्यापेक्षा जिवंतपणी मुक्तीची अनुभूती घे कारण सद्गुरुच ही अनुभूती देतात. लागता ओढ सद्गुरुंच्या भेटीची, जाणीव होतं असते हृदयस्थ सद्गुरुंची. एक लक्षात येतंय की सद्गुरुंविना जीवन नाही - आयुष्य नाही. खरं ना, पटतंय ना.*

*जय श्री सद्गुरू माऊली*

साभार:  श्री. प्रदीप नरहरि केळकर

मन...

👏 नामस्मरणाच्या आड येते ती माया, नामस्मरणाच्या आड येते ते मन - कबीर आपल्या दोह्यांमधून सांगताहेत -

*माया मुई न मन मुआ, मरी मरी गया सरीर।*
*आसा त्रिसना न मुई, यों कही गए कबीर ।*

अर्थ: कबीर कहते हैं कि संसार में रहते हुए न माया मरती है न मन। शरीर न जाने कितनी बार मर चुका पर मनुष्य की आशा और तृष्णा कभी नहीं मरती!

कबीर ऐसा कई बार कह चुके हैं।

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

दोष कुणाचे पाहु नयेत

👏👏👏

*मंदिरात दोष कुणाचे पाहु नयेत आणि तेथे घडणा-या गोष्टींची चिकित्सा करू नये*

"कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले."

*प्रसादाचे ताट पाहून तेथील *ब्राह्मण पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले.*

तेंव्हा *तेथील गुरू* फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले. पुजा संपल्यावर, *"श्री गुरु दत्तात्रेयांना गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले."*

त्यानंतर तीन दिवस त्यांना *श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही.* ते बैचेन झाले. *त्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्ताञेयांना राग आला असणार!*

तेव्हा *गुरुंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.* त्यांच्या मुखातून *करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडले.*

*_"शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता"।।_*
*_शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता"।।_*

*करुणा ञिपदीचे* हे बोल ऐकून *श्री गुरु दत्ताञेय*
गुरूंच्या समोर उभे राहिले. तेव्हा गुरू म्हणाले, *"देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला"*

तेव्हा *श्री गुरु दत्ताञेयांनी* प्रश्न केला,

*इथे सत्ता कोणाची?*

ह्या प्रश्नावर गुरू म्हणाले, *"देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते"*

त्यावर *श्री गुरु दत्ताञेय* म्हणाले, अरे! *तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता, त्याच्या साठी मी ते ताट पाठविले होते. ते त्याने खाल्ले.*

*त्यात तुझे काय गेले?*

*त्यावर गुरूना आपली चूक कळली. त्याक्षणी श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले.*

या *अध्यात्मिक मार्गात* प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची *देवाकडून, गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे.*

*एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली.*

*आपण तर सामान्य माणस* आपण जर राग आवरु शकलो नाही तर, *आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.*

*प्रबोध :*

*आपण ज्या मंदिरात जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी,* *_त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते, तिथे काय घडते ते पाहू नये. कारण तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते._*

*"मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते"*

*कोण कोणत्या हेतूने बोलतो, कोण कोणत्या हेतूने करतो ह्याची संपूर्ण जाण त्या भगवंताला असते. फक्त ती आपल्याला नसते.*

*आपला बघण्याचा दृष्टिकोन मायेचा अथवा मायावी असतो, तर त्या ईश्वराचा दृष्टीकोन हा सात्विक विशाल सत् मायेचा असतो.*

*ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते* तेथे सामान्य माणसाने फक्त *ईश्वरी इच्छेचा आदर करावा.*

*श्री गुरुदेव दत्त!*
*॥जय श्री सद्गुरू माऊली॥*
साभार: आंतरजालावरून

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

अमृतवाणी....

*अमृतवाणी*

आपले बाबा आजच्या प्रवचनातून आपणा सर्वस्वांना सांगताना म्हणतात, *"आपले मन शंकाकुल होऊ देऊ नका. सत् तुमच्या जवळच आहे अन् त्यांचे लक्ष तुमच्यावर आहेच आहे. पण मात्र, आपल्या श्रध्देला तडा जाऊ देऊ नका."*

पुढे श्री सद्गुरू माऊली म्हणतात, *तुम्ही कोठेही असलात, लाखो मैल जरी दूर असलात तरी तुमचे सद्गुरु तुमच्या जवळच आहेत.* 

या संदर्भातील एक गोष्ट आठवली, ती आपणा सर्वस्वां सोबत वाटाविशी वाटली म्हणून येथे देत आहे.

आपल्या परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलींचे महानिर्वाण झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. माऊलींच्या पश्चात त्यांचा हा वारसा पुढे चालू कसा ठेवायचा याची भ्रांत सगळ्यांना पडली होती. त्यावर उपाय म्हणून त्यांच्याच नामाभिधानाचा ट्रस्ट स्थापन करण्याचे सर्वांनुमते ठरले. प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे, यावर विश्वस्त कोणाकोणाला नेमायचे आणि कुणी नेमायचे? शेवटी बाबांचे एकचित्तात संदेश घेण्याचे ठरले. परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलीने पितामहांवर हे कर्तव्य सोपविले. झाले. एक एक नावे पितामहांसमोर वाचून दाखविण्यात येऊ लागली व त्यावर सखोलतेने विचारणा करून पाच नावांना मान्यता देण्यात आली. त्यातील एक नाव होते - गोपाळराव नवांगुळ यांचे.

(गोपाळराव "दादा" नवांगुळ हे पूर्वाश्रमीचे *"महामुनी अरूणी"* होत. त्यांच्या बाबतची इतिहासात हकीगत अशी सांगितली जाते की त्यांच्या त्यावेळच्या सद्गुरूनी ज्यावेळेस शेतामध्ये बांध घालण्यास पाठविले होते, त्यावेळी धुवांधार पावसामुळे बांध टिकत नव्हता, तेव्हा ह्यांनी सद्गुरूंचा शब्द सिद्ध करण्यासाठी स्वतःला बांधाच्या ठिकाणी आडवे पाडून बांध निर्माण केला होता आणि अशा या भक्ताला सव्वीसाव्या अवतार कार्यात सताने आपल्या सान्निध्यात घेतले होते.)

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ज्यांना आम्ही "दादा" म्हणत असू हे त्यावेळेस पुण्यात स्थायिक झालेले होते आणि त्यामुळे आपल्यापैकी काहीजणांनी शंका-कुशंका निर्माण करत, अशी शंका उपस्थित केली होती की, नवांगुळ हे पुण्यात राहतात, मग त्यांचे नाव विश्वस्त म्हणून कसे? ते कर्तव्याचे वेळेस येथे कसे हजर राहू शकतील?

यावर आपल्या परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलीने जे स्पष्टीकरण दिले होते ते खरोखरीच उद्बोधक ठरावे. बाबा त्यावेळेस म्हणाले होते, *नवांगुळच काय, माझा कोणताही सेवेकरी मग ते पुणेच काय, तर जगाच्या कोणत्याही कानाकोप-यात का असेना, तो माझ्याप्रत, माझ्या सताप्रत मनोभावे, मनःपूर्वक जर का असेल, तर त्याला सोडून मी नाही, आणि माझे सतही नाही.*

यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात यावयास हवी, ती म्हणजे *जो निस्सीम भक्त आहे, तो मग जगाच्या पाठीवर कोठे कां असेना, त्याला सोडून सत् कधीच असणार नाही.*

म्हणूनच आपण श्रध्देला तडा जाऊ द्यायचा नाही. मनात जरी शंका आली तरी श्रध्देला तडा जाईल आणि आपण ते कदापिही होऊ द्यावयाचे नाही. सर्वस्व त्यांच्यावर सोडून आपण आपल्या *नामात* राहावयाचे. 

प्रत्येक सेवेक-यांनी ही खात्री बाळगा की आपले सद्गुरु आपल्या जवळच आहेत. ते मला सोडून क्षणभर देखील राहणार नाहीत. म्हणूनच पुढे आपले बाबा म्हणतात, *तुमचा जो आत्मा आहे, तेच सद्गुरु! येथे *आत्मा* म्हणजे *आपल्यात असणारी ती मा, म्हणजेच ज्योत, म्हणजेच आपले सद्गुरू, म्हणजेच अनंत !!*

माऊली पुढे विचारणा करते, *"तोच त्यांचा अंश तुम्हाला सोडून आहे का एक क्षण तरी?"* 

मग सेवेक-याने मनाशी अशी ठेवण ठेवता कामा नये कि बाबा माझ्याशी बोललेच नाहीत. कोणी काहीही बोलो, कोणी काही सांगो, बाकीच्यांच्या मनाशी उपलब्धता ठेवायची नाही. 

आपले मन एकाच ठिकाणी सत् चरणांवर स्थिर ठेवले पाहिजे. कोणी वंदो, कोणी निंदो, काहीही होवो, आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. निंदणारे निंदतील, वंदणारे वंदतील, भावीक भाविकतेने जातील परंतु त्या ज्योतीची श्रध्दा ठाम आहे ती सताशिवाय दूसरा काही विचार करणार नाही असे आपली माऊली आपणास समजावून सांगते आहे.

💐👏💐👏💐👏💐👏💐👏

उद्याची चिंता न करता

💐💐💐

*उद्याची चिंता न करता _जीवन_ आज मनाप्रमाणे जगायला हवे.*

एका घरात पंडितजी पूजा करीत होते. पुजारी मंत्र वाचत होते. लोक थोडं थोडं होमहवनाचं साहित्य घेऊन अग्नीत अर्पण करत होते. स्वाहा म्हणता यजमानही अग्नीत थेंब थेंब तूप टाकत होते. सर्वजण थोडं थोडंच अर्पण करत होते, संपू नये या हेतूने. पूजा पूर्ण झाली. सर्वांजवळ जास्त प्रमाणात होमाचं साहित्य शिल्लक राहिलं.

तूप अर्ध्यापेक्षाही कमी वापरलं गेलं होतं. होम पूर्ण झाल्यानंतर पुजारी म्हणाले की, जेवढं साहित्य शिल्लक आहे ते सर्व अग्नीत अर्पण करा. सर्वांनी पूर्ण साहित्य व तूप अग्नीत अर्पण केलं.

*संसार हवनकुंड आहे. जीवन पूजा आहे. जीवनाची पूजा संपते तेव्हा तुमच्याजवळचं साहित्य तसंच राहतं. जिवंत असतांना त्याचा नीट वापर केलेला नसतो.*

तरी तसे होऊ नये म्हणून, जीवन जगत असताना, ते पूर्णत्वाने जगा. आपल्याला मिळालेल्या रोजी रोटीतून काही भाग दानधर्मासाठी वापरा, काही भाग त्या जगत् नियंत्याच्या कार्यासाठी वापरा, उर्वरित शेष भाग आपल्यासाठी व आपल्या कुटुंबीयांसाठी योग्य त-हेने वापरून, त्यातून शिल्लक राहिलेला भाग भविष्याची तरतूद म्हणून बाजूला काढून किंवा गुंतवून ठेवा.

आपला दिवस आनंदात जावो !
🌹 *जय श्री सद्गुरू माऊली* 🌹
साभार : आंतरजालावरून

_श्रद्धा_

👏👏👏

           *_श्रद्धा_*
    *श्रद्धा कशी असावी?*

आपले बाबा आपल्याला विचारणा करतात, *"श्रद्धा कशी असावी?"* आणि उत्तरही देतात, ते असे, *"श्रद्धा ठाम आणि सतशुध्द असावी."* पुढे ते म्हणतात, *"जर का सतच तुमच्या जवळ असेल, तर तुम्हाला इतर कुणीही दूर लोटू शकणार नाही."* इतकेच नव्हे तर, *_त्रिगुण - ब्रह्मा, विष्णू, महेश_* आणि त्यांच्या तीन शक्त्या - देखील तुम्हाला काही करू शकणार नाहीत. कारण त्रिगुण आणि त्यांच्या तीन शक्त्या, तसेच ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र हे सगळे या सताजवळ हात जोडून नम्रपणे उभे असतात. कारण त्यांची निर्मिती या सतानेच केलेली आहे, ह्याची त्यांना जाणीव आहे.

आता राहिला भाग तो देव-देवतांचा, दैवतांचा जी स्थिती त्रिगुणांपेक्षा खालच्या दर्जाची होय. असे असताना देखील आपण वरच्या दर्जाच्या स्थितीची दखल न घेता खालील दर्जाच्या स्थितीलाच जास्त मानतो नां? त्यांच्याच भजनी लागतो नां?

*यामधून एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी की जर जगताचा व्यवहार हाकण्यासाठी सतानेच निर्माण केलेल्या या शक्त्या त्यांच्या चरणकमलाशी हात जोडून उभ्या आहेत, आणि आपण त्या सताचे जर सेवेकरी आहोत, तर मग आपण आपल्या सतावर संपूर्ण श्रद्धा न ठेवता, डळमळीत कां होतो? कां आपण इकडे तिकडे भटकतो? कां इतर मार्ग अनुसरतो?*

आणि म्हणूनच बाबा पुढे विचारणा करतात, *"जर सतच तुमच्या बरोबर असेल, तर बाकीचे सर्वस्व तुम्हाला वश नाही कां होणार?"* म्हणूनच पुढे आपणास जाणीव करून देताना म्हणतात, "अन् हे कशामुळे होऊ शकते? तर *"हे केवळ श्रद्धेनेच होऊ शकते."*

बाबा पुढे आठवण करून देताना म्हणतात, *"जर श्रद्धाच नसेल, तर अनंत प्रगट होतील कां?"* आणि *अनंत जर प्रगट झाले नाहीत, तर तुम्ही त्यांना कसे पाहू शकाल?* अशी विचारणा देखील करतात.

श्री सद्गुरू माऊली आपल्या या प्रवचनातून *गुरू गुह्य* सहजपणे उघड करून सांगतांना म्हणतात, *"सताचा संबंध अनंतांशी असतो, त्रिगुणांशी नाही. अनंत आणि सत् यांचे परस्पर संबंध असतात. अनंतांच्या संदेशानुसार सत् कर्तव्य होत असते आणि सताशिवाय, सद्गुरूंशिवाय तुम्ही अनंतांप्रत _जाणेच_ शक्य नाही."* 

*सत् सान्निध्याशिवाय, सद्गुरू सान्निध्याशिवाय अनंतांकडे तुम्हाला जाताच येणार नाही.* याची जाणीवही करून देतात.

आणि हे होण्यासाठी किंवा करण्यासाठी उपायही सांगतात. *तो उपाय म्हणजे सतावर, आपल्या सद्गुरूंवर निस्सीम श्रद्धा ठेवणे होय.*

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे *पायरी*. प्रत्येक देव देवतेची *एक पायरी किंवा दर्जा असतो*. त्यानुसार जगताचे व्यवहार हाकण्यासाठी अनंतांनी काही तत्त्वे निर्माण केलीत. त्यानुसार प्रथम ॐकार तत्व निर्माण करण्यात आले. तद्नंतर क्षिराब्धी. त्यांच्यानंतर त्रिगुण व त्यांच्यानंतर इतर लहान मोठी तत्त्वे निर्माण करण्यात आलीत.

ज्यावेळेस बाबा म्हणतात, *"सताचा संबंध अनंतांशी असतो, त्रिगुणांशी नाही. अनंत आणि सत् यांचे परस्पर संबंध असतात."* असे आपले बाबा कां बरे म्हणत असावेत?

तर लक्षात घ्यावयास हवे ते हे की, *सत् म्हणजे कोण आणि सद्गुरू म्हणजे कोण? अनंत कोणाला संबोधावे?* 

येथे आपणास हे लक्षात घ्यावे लागेल - *निर्गुण आणि सगुण*.

 _*निर्गुणातून सगुण प्रसवले म्हणजेच निराकारातून आकाराची निर्मिती झाली. येथे निर्गुण किंवा निराकार म्हणजे अनंत तत्व तर सगुण किंवा आकारी म्हणजे ॐ कार तत्व.*_ सत तत्व हे दोन्ही तत्वांमध्ये आहे. म्हणजेच ते आकारी आहे तसेच ते निराकारी देखील आहे. आता हे समजने अगत्याचे ठरेल की आपले सद्गुरू म्हणजेच सत, म्हणजेच ॐ कार तत्व, म्हणजेच आकारी तत्व आणि म्हणूनच श्री सद्गुरू माऊली म्हणते, *"अनंतांच्या संदेशानुसार सत् कर्तव्य होत असते आणि सताशिवाय, सद्गुरूंशिवाय तुम्ही अनंतांप्रत _जाणेच_ शक्य नाही."*

🕉☸✡🔯🕉☸✡🔯🕉

मनी वसेल स्वार्थ,

👏👏👏

*मनी वसेल स्वार्थ, तर कसा कराल परमार्थ?*
*नाही झाला परमार्थ, तर हाेईल सर्व व्यर्थ*
*झाल्यावर सर्व व्यर्थ, काय उरेल जीवनाला अर्थ?*
*उरणार नाही जीवनाला अर्थ, मग भेटणार कसे सद्गुरू समर्थ?*

*भेटण्या सद्गुरू समर्थ, करू लागा परमार्थ*
*जाणा नामस्मरणाचा अर्थ,*
*ठेऊनीया बाजूला स्वार्थ*
*ज्यावेळेस बनेल मन नि:स्वार्थ,*
*तेव्हाच येई जीवनाला अर्थ*
*तेव्हाच भेटतील श्री सद्गुरू समर्थ,
तेव्हाच भेटतील श्री सद्गुरू समर्थ........*

*जाऊ देऊ नका अनगडाचे बोल हे व्यर्थ*
म्हणूनची नित्य स्मरा *जय श्री सद्गुरू समर्थ,
.................................जय श्री सद्गुरू समर्थ*.......

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

तुम्ही ज्या बाबांना शरण आहात....

👏👏👏

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात*........

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात त्यांची ओळख करून घेता आली पाहिजे* असे जेव्हा आपले बाबा म्हणतात, त्यावेळी त्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे?

बाबांजवळ एखादी नवीन व्यक्ती दर्शनासाठी आली की, बाबा त्यांना सांगत की, आंधळेपणी मला शरण जाऊ नका. मला आपण सद्गुरू म्हणून जर स्वीकारत असाल, तर तत्पूर्वी मला जाणून घ्या, आपले होणारे सद्गुरू हे कोण आहेत? ते पडताळून पहा. त्याना हवे तर तावून-सुलाखून घ्या. हे सगळे केल्यानंतर जर आपणास वाटले की, आपले सद्गुरू पदासाठी योग्य आहेत, मगच त्याना शरण जा. पण हे लक्षात ठेवा की, एकदा का तुम्ही त्यांना शरण गेलात की मग आपल्या सद्गुरूना चाचपण्याचा, त्यांच्यावर अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.

इतकेच नव्हे तर, *आपले सद्गुरू हे कोण आहेत हे जाणल्यानंतर, आपणास त्यांना स्वतःच्या दृष्टीने पाहता आले पाहिजे,* असे आपले बाबा आपणास सांगतात. याचा अर्थ काय? 

येणे आपणास डोळे बंद करून ज्यावेळेस नामस्मरण करावयाचे असते, त्यावेळेस आपल्या बंद असलेल्या डोळ्यांसमोर आपल्या सद्गुरूंची मूर्ती साकारावयास हवी. आपले बाबा आपणास, जसे ते आपल्या चर्मचक्षूना दिसत असत, तसे ते दृष्टी बंद केल्यानंतरही पाहता आले पाहिजेत. मग आपणाला कळू शकेल की आपले बाबा हेच सतही आहेत. म्हणजेच आपणास कल्पना येईल की *सगुण आणि निर्गुण* हे दोन्ही तेच आहेत. अर्थात त्यासाठी आपले नामस्मरण सुद्धा तेवढ्याच उच्च पातळीवरचे असावयास हवे. आपली सता प्रतीची भक्ती देखील तेवढ्याच उच्च गतीची असावयास हवी. तेव्हाच हे शक्य होईल.

बाबा पुढे म्हणतात, "ते (सद्गुरू) सांगतात ते आपण आचरणात आणा. *जे अनन्य भावे माझ्या भक्तित निपूण आहेत, त्याला समर्थ कधीही उपाशी ठेवणार नाहीत*" आणि हे आपणांपैकी कित्येकांनी अनुभवले तर आहेच, तद्वत ते अजून सुद्धा अनुभवत आहेत.

श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, *"समर्थ मतलबी मायेला भाळणारे नाहीत."* हे आपल्या बाबांचे म्हणणे शंभरच काय तर एकशे एक टक्के सत्य होय. आपल्या बाबानी मायावी मायेला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व कधीच दिले नाही. मायेने देखील, सुरुवातीच्या काळात बाबांचा येणे सताचा कस घेतला असताना देखील, बाबांनी तिला कधीही महत्व दिले नाही, म्हणून तिने बाबांना स्थूलात असताना भरपूर त्रास देखील दिला. परंतु बाबा त्यावेळेला तिला किंवा तिच्या मायावी त-हेला कधीही भुलले नाहीत.

सद्गुरु महिमा किती अगाध आहे, याबाबत ते म्हणतात, *"वेळेला समर्थ सेवेकऱ्याचे अर्धे संचित आपल्यावर घेतात. त्यांच्याखेरीज मायेचा पुत सुद्धा हे घेऊ शकणार नाही."* ह्याची बरीच उदाहरणे आपल्यापैकी ब-याच गुरूबंधु भगिनींनी प्रत्यक्षात या दरबारात अनुभवली देखील आहेत. 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे, *ते समत्व बुध्दीने पाहतात.* त्यांच्याकडे द्वैत भाव नसून, ते अद्वैत भावाचे पाठीराखे होते. त्यांच्याकडे दुजाभाव अजिबात नव्हता. माझे तुझे नावाला देखील नव्हते. एक जवळचा व दुसरा दूरचा असेही नव्हते. सगळे त्याना समान होते. त्यांच्याकडे लहान मोठा, गरीब श्रीमंत हा भेदभाव था-याला देखील उभा राहू शकत नव्हता. असे ते आपले सद्गुरू होते. अशा सद्गुरूंचे आपण सेवेकरी आहोत, हे प्रत्येकांने लक्षात घेऊन आपली वाटचाल करावयास हवी.

💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷

निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे

👏👏👏

*निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे.*

समजा आपल्याला एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी धरून आपण तिची संगती करतो. आपले गाव आले की आपण ती गाडी सोडतो. हे जसे खरे, त्याचप्रमाणे, निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी; पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही हेही तितकेच खरे.

*सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की, एकीकडे ’मी ’ नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो आणि शेवटी परमात्मा शिल्लक राहतो. म्हणूनच, आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावे.*

स्वतःचा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला, तर निर्गुण आणखी ते कोणते राहिले ? परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागते, त्याप्रमाणे आपली वृत्ती विषयाकार झालेली आहे. तिला सगुण, निर्गुण, दोन्ही कुठे गोड लागतात ?

’सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो’ म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. वस्तुतः तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याचे त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात, त्यांनी त्याला सगुणात नाही आणले या म्हणण्यात काय अर्थ आहे ?

परमार्थाविषयी आपल्याला विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको. सूर्य हा आपल्या आधी होता, आज आहे आणि पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपले तसेच घडते.

एखादा नास्तिक जर म्हणाला की, ’देव नाहीच; तो कुठे आहे हे दाखवा, ’ तर त्याला असे उत्तर देऊन अडविता येईल की, ’देव कुठे नाही ते दाखवा. ’ पण हा उत्तम मार्ग नव्हे. देव नाही असे म्हणणारालासुद्धा, त्या स्वरूपाचे काहीतरी आहे ही जाणीव असतेच; फक्त तो त्याला निरनिराळी नावे देतो. निसर्ग, शक्ति, सत्ता, अशी नावे देऊन त्यांचे अस्तित्व मान्य करतो, पण ’ देव ’ नाही असे तो म्हणतो. जे आहे असे त्याला वाटते तोच देव समजावा.

*मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही; जितके लिहिलेले असते तितके वाचणार्‍याला समजत नाही; त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही; आणि ऐकणार्‍याला, तो जितके सांगतो तितके कळत नाही.* म्हणून, मूळ वस्तूचे वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे.

परमात्मा कर्ता आहे असे समजून, आपण आजचे कर्तव्य करीत राहावे.

निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही. म्हणून ते अवताररूपाने, अथवा संतरूपाने, सगुणरूप घेऊन येते.

साभार - आंतरजालावरून

गुह्यत्वाचा साक्षात्कार....2

👏👏👏

*_गुह्यत्वाचा साक्षात्कार_*

ह्या प्रवचनातील महत्वाचा मुद्दा असा, तो म्हणजे *आपल्या सद्गुरू मातेचे अनंताप्रत झालेले प्रयाण.* ज्यावेळेस बाबांनी अनंतांना प्रणव दिधले, त्याच वेळेस आपली माता अनंतांप्रत जाण्यास सज्ज झाली. तिचे मार्गक्रमण हे बाबानी सांगितल्याप्रमाणे *तीन टप्प्यांत* झाले आणि ते तीन टप्पे पार पडण्यासाठी स्वतः अनंतांनी व पितामहांनी पाठीमागे राहून सहाय्य केले होते. 

हे निर्वाण कार्य ज्यावेळेस घडत होते, तेव्हा माता ही ज्योती स्वरूपात आणि तीन टप्प्यांत अनंतांप्रत प्रयाण करती झाली. या प्रयाणा दरम्यान मातेने टप्प्याटप्प्याने *चार देहांचा - स्थुल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण - त्याग केला होता,* परंतु या घटनेची साक्षीदार असलेली योगीनी हिला देखील ते चार देह येथे कसे ठेवले ते काही कळले नाही. याबाबत आपल्या श्री सद्गुरू माऊलीने म्हटल्याप्रमाणे, "त्या गोष्टीची जाण - त्या गुह्याची जाण योगीनीलाही दिली नाही."

आपणास कल्पना असेलच की माणूस मृत झाला असता प्रथम त्याचा श्वास बंद पडतो, अर्थात सत बाहेर पडते. श्वास म्हणजेच नाम बंद पडते. हा झाला स्थुल देहाचा भाग. इतर देहाने तो तेथेच आजूबाजूला असतो, कारण इतर तीन देहांचा नाश फक्त आणि फक्त अनंतच करू शकतात, इतर कुणीही नाही. यालाच आपण मानव मृत झाला असे म्हणतो.

तर अशाप्रकारे चार देहांचा त्याग करून माता अनंतांप्रत चालली असताना ती देह रूपी न जाता ज्योती स्वरूपात जात होती. शेवटी चारही देहांपलीकडे गेल्यावर मातेची ज्योत अनंतांमध्ये एकरूप झाल्याचे वर्णन त्यावेळेस या घटनेची साक्षीदार असलेल्या योगीनीने केले होते.

अशाप्रकारे मानव सरळसरळ अनंतांप्रत जाऊ शकत नाही, परंतु माता त्या नियमाला अपवाद होती. हे शक्य झाले आपल्या श्री सद्गुरू माऊलींमुळे. यावरून आपण एक गोष्ट लक्षात घ्यावयास हवी, ती म्हणजे, *आपले सद्गुरू हे कोण होते व आहेत?*

या सव्वीसाव्या अवतार कार्यात मानव रूप धारण केलेले आपले सद्गुरू हे - निराकार आणि आकार - ह्यातील आकार रूपी ॐकारच होत, त्याचप्रमाणे निराकारही होत. त्यामुळेच त्यांची शक्ती - आद्यशक्ती - ही आपली माता, मानवी त-हेने त्यांच्याच आदेशावरून - निराकाराने अर्थात अनंतांनी आपल्यात सामावून घेतली. तिची जागा तीच होती आणि आहे देखील. ती इतरत्र कशी जाणार? त्यामुळे ती त्यांच्यातच सामावली गेली. 

👏💐👏💐👏💐👏💐👏💐

सुमन....

सद्गुरुंना पुजूया
शुभ्र सुमनांनी|

सद्गुरुंना पुजूया
शुभ्र सु मनांनी||

दीपक वेदपाठक

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

👏👏👏

*सुमनाचे यमक मनोमन भावले*
*यमकाच्या रूपाने सद्गुरू आम्हा पावले*
*सुमन किती थोर ते सद्गुरू चरणी वाहिले*
*सु-मन किती थोर ते त्याने सद्गुरू चरण दाविले*

💐👏💐🙏💐👏💐🙏💐

हार - महात्म्य

👏👏👏

        ॥ *हार - महात्म्य*॥

या हाराला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. कुणी साध्या सोप्या शब्दांत त्याला *हार* या नावांने संबोधतात, तर कुणी त्याला *पुष्पहार* म्हणतात. कुणी त्याला *पुष्पमाला* म्हणूनही ओळखतात, तर कुणी फक्त *माळा किंवा माला.* एकूण काय ! तर हा हार आपण भगवंताच्या गळ्यात घालण्यासाठी घेत असतो.

आपण पाहिले असेलच की हे हार तयार करण्यासाठी हारवाले निरनिराळ्या प्रकारची फुले वापरत असतात, ज्यामध्ये सफेद रंगाचा कागडा, लिली, गुलछडी इत्यादींचा समावेश असतो, तसेच भगव्या रंगाची अथवा पिवळ्या झेंडूची फुले देखील असतात. त्याचबरोबर साथीला लाल गुलाब, कधी कधी नारिंगी रंगाची अबोली सुद्धा असते. बरोबर अशोकाची, आंब्याची किंवा इतर हिरव्यागार पानांची सुद्धा हार सजविण्यासाठी योजना करावयाची असल्याने त्यांचीही रेलचेल असते. 

ही झाली *हार* आणि हारांची तयारी. आता हे तयार झालेले *हार* वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यात येत असतात. काही *हार* भगवंताच्या गळ्यात विराजमान होतात, तर काही हार एखाद्याचा मान-सन्मान करण्यासाठी वापरले जातात, काही हार छायाचित्रांना घालण्यासाठी उपयोगात आणतात, तर काही हार मृत्यू शय्येवर पडलेल्या व्यक्तीच्या गळ्यात जाऊन स्थिरावतात. 

हारांचा रंग देखील तितकाच महत्त्वाचा. पांढ-या फुलांचे हार हे शांतीचे प्रतिक समजले जातात, तर भगव्या लाल रंगाची फुलें शक्तीचे प्रतिक म्हणून वापरण्यात येतात आणि म्हणूनच ते 
ब-याच वेळा देव देवतांच्या गळ्यात घालण्यासाठी वापरण्यात जरी येत असले, तरी लाल पिवळ्या फुलांचे हार देखील देव देवताना घातले जातात. 

विशेषकरून / मुख्यत्वे करून पांढरी फुले व जोडीला हारामध्ये इतर रंगाची आरास करण्यासाठी इतर रंगीत फुले गुंफिली जातात. परंतु हे जरी सत्य असले तरी शक्ती उपासक, देव-देवताना शक्तीचे प्रतिक असलेली लाल भगव्या रंगाच्या झेंडूच्या किंवा अस्टरच्या फुलांचाच प्रामुख्याने वापर करताना दिसून येतो हे ही तितकेच सत्य होय.

आता आपण समजून घेऊया *आपल्या सद्गुरूना कोणत्या फुलांचा हार आवडत असे? आणि कां तो आवडत असे?*

आपले हे स्थान शुद्ध, सात्विक भक्तीचे स्थान आहे हे सर्वस्वाना माहित आहेच. आपल्या सताचा प्रकाश कोणता? तर शुभ्र पांढरा. त्यात कोणत्याही रंगाची छटा नाही असा. आपल्या सताचा हा आवडता रंग. त्यामुळे सताचे आसनही पांढ-या शुभ्र रंगाचे. सत ज्यावेळेस या सव्वीसाव्या अवतार कार्यात कार्यरत होते, त्यावेळेस देखील त्यांच्या परिधानाची वस्त्रे होती पांढरी शुभ्र, यामध्ये समावेश होता तो पांढ-या धोतराचा, पांढ-या सद-याचा. पूर्वी ते पांढरी टोपी देखील वापरावयाचे, त्याचप्रमाणे पांढरा लेहंगा देखील घालायचे. एकूणच काय तर आपल्या *श्री सद्गुरू माऊलीना* म्हणजेच सताला पांढरा रंगच जवळचा होता. त्यामुळे हारांच्या बाबतही त्यांना पांढ-या रंगांच्या फुलांचा हारच आवडायचा. म्हणूनच हा सात्विकतेचे प्रतिक असलेला पांढरा रंग हारासाठी निवडून पांढ-या रंगांच्या फुलांचा हारच आपण त्यांना अर्पण करण्यासाठी वापरणे जास्त संयुक्तिक ठरेल नाही कां? मग ह्यापुढे शक्यतोवर पांढ-या शुभ्र फुलांचा हारच आपल्या श्री सद्गुरू माऊलीना अर्पण करून शुद्ध सात्विकता पाळूया.

💐💐💐💐💐💐💐💐💐

विचार....

👏👏👏

*ll जय श्रीसद्गुरू माऊली ll*

आपण नेहमी आपल्या आयुष्याचा विचार करतो, दुस-याच्या आयुष्याचा विचार फार कमी जण करीत असतात. खरं पहाता, एक वेळ आपल्या आयुष्याचा विचार नाही केला तरीही चालेल, पण दुस-यांच्या आयुष्याचा विचार प्रथम करावयास हवा.  दुस-यांच्या आयुष्याचा विचार करतांना आपल्या आयुष्याचा विचार सहजगत्या होत असतो, त्याकारणे स्वतंत्र विचार करण्याची गरज रहात नाही.

आपलं अंतःकरण यासाठी शुध्द हवं, निर्मळ हवं, तरचं अनेक गोष्टी साध्य करता येतात. *एक गोष्ट प्रामुख्याने करावयास हवी ती म्हणजे प्रार्थना.*

ईश्वराला, आपल्या लाडक्या आराध्याला नियमीतपणे आपलं अंतःकरण स्वच्छ, निर्मळ ठेवण्यासाठी प्रार्थना करावयास पाहिजे. प्रार्थना ही महत्त्वाची भूमिका बजावीत असते. शुध्द मनानं केलेली प्रार्थना ही आराध्याकडे पोहोचते, त्यावेळी आपल्या प्रार्थनेमुळे सर्वांना आपल्या आराध्याकडून कृपाशीर्वाद लाभतो, सर्वांचं हितं साधलं जातं.

म्हणून आपल्या आयुष्याचा विचार करतांना प्रथम दुस-यांचा म्हणजे सर्वांचा विचार केला तर आपलं अंतःकरण शुध्द, निर्मळ होतं, तसंच दुस-यांचही होतं. आनंदी आनंद द्विगुणीत होतो. हा आनंद द्विगुणीत करतांना अंतःकरणातील सद्गुरुंची साथ आपल्याला लाभते, त्यावेळी मिळणारी अनुभूती आपल्याला तृप्ती देत असते - तृप्त करीत असते. यासाठी दुस-यांच्या अंतःकरणात स्वतःला पहा नी स्वतःच्या अंतःकरणात आपल्या सद्गुरुंना पहा. आयुष्य अधिकाधिक सुंदर - आनंदी, समाधानी करा.

#$#$#$#$#$#$#$#$#$#
साभार: प्रदीप नरहरि केळकर

तुकारामांचे अभंग.....

👏👏👏

*_तुकारामांचे अभंग_*
  (मराठी भावार्थ सहित)

माया तें चि ब्रह्म ब्रह्म तेंचि माया । 
अंग आणि छाया तया परी ॥1॥ 

तोडितां न तुटे सारितां निराळी ।
लोटांगणांतळीं हारपते ॥2॥ 

दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । 
आणिक ते आटी विचाराची ॥3॥

तुका म्हणे उंच वाढे उंचपणें । 
ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥4॥

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

माया हेच ब्रह्म आणि ब्रह्म हीच माया जसे शरीर आणि सावलीच जणू. 

शरीरापासून सावली वेगळी होत नाही किंवा करता येत नाही,
पण लोटांगण घातल्याने सावली शरीराखाली नाहीशी मात्र
होत असते तद्वत ब्रह्म आणि माया एकच असले तरी ते तसे आहेत किंवा नाहीत यास्तव मनोमनी बळाचा वापर कां करावा बरे? आणि कोणासाठी करावा बरे? तसेच त्यासाठी तर्क वितर्कांना उधाण कां आणावे बरे?

तुकोबा म्हणतात, "उंच हे उंच उंच वाढतच जाते, तर आकाराने ठेंगणी लव्हाळी असतात ती ठेंगणीच राहतात." याचाच अर्थ असा की, "ब्रह्मा समोर लोटांगण घाला म्हणजे सावली प्रमाणेच माया देखील नाहीशी होईल." म्हणजेच *परब्रह्माला शरण जा, म्हणजे सावली रूपी माया आपोआपच त्या परब्रह्मात सामावली जाईल व तिचे वेगळे असे अस्तित्व राहणार नाही व आपल्या आयुष्यात तिचा त्रास होणार नाही किंवा उद्भवणार नाही.*

*। ॐ श्री सद्गुरूवे नमः l*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सदा सर्वदा योग तुझा घडावा

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी*
     *भगवान महाराज यांची*
              *अमृतवाणी*

*सदा सर्वदा योग तुझा घडावा ।*
*तुझे कारणी देह माझा पडावा ।*
*उपेक्षु नको गुणवंता अनंता ।*
*रघुनायका मागणे हेची आता ।*

वरील श्लोकाचा अर्थ सांगताना श्री सद्गुरू माऊली म्हणते,
"ह्या श्लोकामध्ये रामदास स्वामीनी स्वतःसाठी रामचंद्र प्रभूना आळवले आहे." 

*हे प्रभो ! प्रत्यक्ष रामा ! तुम्ही माझ्या संगती असावयास पाहिजे. तुम्ही माझ्या दृष्टि समोर रहा. अहंर्निश सतत माझ्यासोबत असा, म्हणजेच मला दर्शनयुक्त करा.* 

श्री सद्गुरू माऊली म्हणते, "रामचंद्र, सद्गुरु, परमतत्व असे संबोधून त्यांनाच आपण सत् समजतो." पण ते असे कुठेही म्हणत नाहीत की ते सर्वस्व मीच आहे.

येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आपले बाबा स्वतः ॐकार तत्व असून देखील, स्वतः सत् तत्व असून देखील ते मी आहे म्हणून कुठेही म्हणत नाहीत. नाहीतर आपण मर्त्य मानव सदा न कदा त्या *मी* पणाच्या गर्तेत धडपडत असतो.

बाबा पुढे म्हणतात, "नेहमी सकाळ, दुपार, संध्याकाळ अहर्निश, हे जगत् जेत्या ! तुम्ही प्रत्यक्ष माझ्या समोर असा. तुमच्या नामात मी असेन. प्रत्येक बरे, वाईट या सर्वांसाठी, दु:खांती, सुखांती नसून कुठेही असा, पण सुखांती नको व दु:खांती असा असे नाही. हे रामा ! तुम्ही सुखांती, दु:खांती नसून कुठेही असा. आपणाकरीता माझा सर्वस्व देह मी अर्पण करीत आहे. तुमच्यासाठी हा देह झीजावा. हे अविनाशा ! श्रीहरी ! देह कारणी लागावा. 

श्री सद्गुरू माऊली म्हणते, "रामदासानी त्यातले वर्म ओळखले होते. देह हा आपला नव्हे. देह हा जाणार सकळीक. प्रभो रामचंद्रांसाठी देह गेला तर तो सत् कर्मी गेला. आसनी, शयनी, भोजनी तुम्ही अहर्निश माझ्या हृदयी प्रगट असा. ते साधताना माझा देह सतत झीजत रहावा. 

बाबा विचारणा करतात, "खरोखर असा जर भक्त असेल तर सद्गुरु माऊली आपल्याला दूर ढकलील काय?" 

असे _जर सेवेकरी समर्थमय बनले, तर श्री समर्थ म्हणा किंवा श्री सद्गुरू माऊली म्हणा आपल्याला त्यांच्या चरणांपासून कदापिही दूर ठेवणार नाहीत._

*रामदास समर्थमय बनले म्हणून त्यांना समर्थ म्हणतात* असे बाबाच आपल्याला सांगतात.

जगत् जननी

🙏👏🙏

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी*
*भगवान महाराज यांची*
*अमृतवाणी*

आपले बाबा आपणास सांगतात, *"आपण जिला जगत् जननी म्हणतो तीच जगद् माता!"* पुढे या गोष्टीची आठवण करून देताना म्हणतात, "जगत माया निराळी."

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे, बाबा म्हणतात, *"जगत् जननीला सर्व अधिकार आहेत. पण या आसनासमोर अधिकार नाहीत."* आपले बाबा असे का बरे म्हणत असावेत? *कारण आपला हा दरबार सर्वसाधारण दरबार नव्हे, तर तो सताचा दरबार आहे. ॐ कारांचा दरबार आहे. येथे सताशिवाय इतर कुणाचाही अधिकार लागू होत नाही.*

बाबा पुढे जगत् जननीला सांगताना म्हणतात, "कोणत्या सेवेक-यावर लाघव करावे, कोणावर करू नये ह्याची जबाबदारी तूझी, ते तू जाण."

आठवण करून देताना पुढे म्हणतात, "क्षमा द्यायची आहे. पण तशी क्षमा करता येणार नाही."

बाबा पुढे म्हणतात, "सेवेक-याची कसोटी घेतली तर तिची सुद्धा कसोटी घेणारा कोणीतरी आहे." म्हणजे काय? तर तिला जरी मानवांची परीक्षा घेण्याचे अधिकार असले, तरी सुद्धा ती देखील परीक्षाधीन असून, सताच्या परीक्षेला तिला देखील सामोरे जावे लागणारच आहे.

सत् काय करते? तर प्रथम कसोटी घेते आणि त्या कसोटीत पास झाल्यानंतरच कार्य सुपूर्द करते.

आपणा सर्वांना आठवण करून देताना म्हणतात, *"जगत् जननी सामान्य तत्व नाही, तर ते सुद्धा महान तत्व आहे."*

हे जरी खरे असले तरी बाबा जगत् जननीला म्हणतात, "सेवेकरी अडाणी असले तरी तू जाणीव घेतली पाहिजे." पुढे जाणीव करून देताना म्हणतात, "ज्याला परमपदाचा अधिकार आहे अशी तू सेवेकरीण असलीस तरी या दरबारात तूझी किंमत शून्य. जगत् जननी कुणाला वर पाठवीत नाही. नाना क्लुप्त्या करुन खालीच पाठवते." दरबारच्या बाबतीत तिची पायरी ठेवली आहे. तिला म्हणजे *"जगत् जननीला उत्पन्न करणारा कोणीतरी आहे."*

बाबा पुढे सेवा, पूजा ह्या बाबतीत मार्गदर्शन करताना म्हणतात, *"सेवेक-याने वेडीवाकडी पण समाधानाने केलेली सेवा त्या ठिकाणी (सद्गुरू चरणांवर) पोहचते. पण पूजा करताना सेवेक-याची भावना कशी हवी? तर शुध्द. भावना शुद्ध नसेल तर सेवा पावन होणार नाही."*

तसेच सेवेक-याला पूजेची माहिती नाही पण त्याने श्रध्देने केलेली पूजा मला पावन आहे असे बाबा म्हणतात. बाबा विचारणा करताना म्हणतात, "सेवेक-यामध्ये भोळा भाव व अखंड लीनत्व केव्हा येते? तर त्याच्याकडे शुद्ध आचार विचार असल्यासच ते असते. लीनत्व शुध्द असल्याशिवाय लीनत्व राहणार नाही." *लिनत्व असणा-या सेवेक-याच्या सानिध्यात परमेश्वर येतो.*

बाबा पुढे म्हणतात, "सेवेकरी एकतर अडाणी किंवा पूर्ण ज्ञानी तरी असावा, अतीविव्दान नसावा."

बाबा विद्वान कोणाला म्हणतात?
जो प्रत्येक गोष्टीतून त्या चाकोरीच्या चौकटीत बसतो तो विव्दान. बाबा विद्वानाला महत्व देतात, अतीविद्वानाला नव्हे.

"जो योग्यतेचा सेवेकरी असेल, त्याची योग्य सेवा, योग्य तर्‍हेने त्याला शोभली पाहिजे. सद्भावना व लीनत्व ज्याच्याकडे आहे, त्याची सेवा सद्गुरू चरणी रुजु आहे."

*"समर्थांनी एकदा आदेश दिले तर ते कायमचे असतात"*, असे श्री सद्गुरू माऊली म्हणते.

पुढे सद्गुरू माऊली म्हणते, *"सुगंध कोठून व कसा येतो त्याची जाणीव घ्या."*

ह्या संदर्भात आठवण सांगाविशी वाटते ती म्हणजे, काही काही वेळा दरबार सुरू असताना, मध्येच असा काही सुगंध सुटायचा की तो सांगता यावयाचा नाही. तो फक्त अनुभवता यावयाचा. बरे ! तो कुठून येतो, कसा येतो, कशाचा येतो ते काहीही कळत नसे इतका तो अवर्णनीय असा परिमळ असायचा. संपूर्ण वातावरण एका अलौकिक सुवासाने दरवळून जायचे. असा तो सुगंध क्षणीक, काही क्षणांपुरताच असावयाचा, पण तो आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जायचा. आणि असे ज्यावेळेस घडायचे त्यावेळी नक्कीच श्री मालिक येऊन गेल्याची जाणीव व्हावयाची. असा तो काळ म्हणजे साक्षात श्री सद्गुरू माऊलीने आपल्या सर्वांसाठी प्रत्यक्ष अनुभव उघड करून सप्रमाण दाखवून दिल्याचा तो काळ होता. ह्यासाठीच बाबा म्हणायचे, "सुगंध कोठून व कसा येतो त्याची जाणीव घ्या." हे जरी सत्य असले तरी ती आपली कुवत होती कां? तर नाही.

बाबांचे सांगणे होते, *"सुगंध मिळणे हे सुद्धा भाग्याचे लक्षण आहे. तो सुगंध निराळाच वाटतो. त्या ठिकाणी एकाग्र व्हा. सुगंध आला, मालिक येऊन गेले असे समजू नका. सेवेक-यावर समर्थाचे अखंड लक्ष असते. कार्य करीत असताना सुगंध आला तर लीन व्हा.*

अनाथांच्या नाथा.....

*ॐकार स्वरूपा सद्गुरु समर्था ।*
*अनाथांच्या नाथा तुज नमो ।।*
*गुरूराज स्वामी असे स्वयंप्रकाश।*
*ज्या पुढे उदास चंद्र, रवी ॥*

एकनाथ महाराजांच्या ह्या अभंगात ते म्हणतात,"ॐकारा ! आपणच सद्गुरू आहात, आपणच समर्थ आहात. सद्गुरु माऊली आपणच अनाथांचे नाथ आहात. ज्याचा कुणी वाली नाही, त्यांचेही तुम्ही नाथ आहात."

सता! आपणच तारक आहात. पूर्णात पूर्ण असणारे तत्व देखील आपणच आहात. भक्ताला अनुग्रहीत करून, तसेच सद्गुरूंची गती देऊन पूर्णात पूर्ण पदाला पोहचविणारे ॐकार स्वरूप म्हणजेच ॐकार बीज, जे वेदांचे बा देखील आहेत,ते सुद्धा आपणच आहात.

बाबा विचारणा करतात,"पंचमहाभूतांचा अंत कुणी घेतला आहे कां? पृथ्वीचा अंत घेतला आहेत कां? पाण्याचा अंत कोणी घेतला आहे कां?" 

पाणी पण निराकारी आहे. तेज म्हणजे प्रकाश आणि वारा स्पर्शज्ञानाने कळतो. तो दिसत नाही. वायु नसेल तर आपण जीवंत राहू शकणार नाही. 

बाबा पुढे विश्वाच्या निर्मिती मागील रहस्य उघड करताना म्हणतात,

*_वायु म्हणजेच प्रणव. धुंधुंकारातून प्रणव प्रसवला. प्रणव म्हणजे अक्षरे. ती ऐकता येतात. पण पाहता येतात कां? ते आकलन करता येत नाही._* 

बाबा म्हणतात,"आपल्याला ॐकार स्वरूप पाहता आले पाहिजे." ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे चार वेद असून पाचवा वेद प्रणव. पंचमहाभूते निराकारी आहेत. 

बाबा विचारतात, "ॐ कार कसा आहे? तर आठ प्रकृतीने नटलेला ॐ आहे. (ह्या आठ प्रकृती कोणत्या? पंचमहाभूतें (पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश) आणि अहंकार, बुद्धी आणि चित्त (अव्यक्त परा प्रकृती) ह्या सर्व मूळ प्रकृती मिळून अष्टदा प्रकृती होतात असे भगवद् गीता सांगते.)

पुढे बाबा म्हणतात,"समर्थांना आकार नाही. समर्थ कसे आहेत, तर निराकारी. परंतु तुमच्या कोडकौतुकासाठी ते आकार घेतात. स्वतः समर्थांनी आपल्याला आपल्यात सामाऊन घेतले आहे. *प्रगट दृष्य तर अप्रगट अदृष्य.* 

एकाने उत्पत्ती करायची, एकाने स्थितीप्रत ठेवायचे, एकाने लय करायचे, ही कर्तव्ये कोण करीत असते? तर ब्रह्मा, विष्णू व महेश म्हणजेच त्रिगुण.

समर्थ म्हणतात, "भक्ताला मला पहाता येते पण पहाणारा पाहिजे." सर्व व्यापक सद्गुरु आहेत आणि व्यापूनही अलिप्त देखील आहेत. अलख निर्गुण निराकार पद आहे. ॐकार स्वरूप गुरूराज स्वामी आहेत. त्या प्रकाशापूढे चंद्र, सूर्य फिके पडतात, तोच स्वयम् प्रकाश. 

*वेद म्हणजे प्रणव.* *ॐकार ध्वनी सुद्धा शांत होतो.* 

जाणीव ठेवून जर एखादा भक्त दर्शन घ्यावयास गेला तर त्याला दर्शन होणार नाही. ह्यासाठी जाणीव रहित सत् चरणांत तादात्म्य होणे गरजेचे आहे आणि ज्यावेळेस अशी स्थिती होते, त्याचवेळेस त्या भक्ताला सत् चित् आनंद मिळतो. तो मिळाल्यावर तो भक्त आनंदिमय होतो व अशावेळेस त्यांचे तेज लोप पावणारे नसते.

कृपादृष्टी होणे म्हणजे अमृत दृष्टीने भगवंताने भक्तावर कृपा करणे होय. ते प्रगट कसे होणार? तर हिच गुरुकिल्ली आहे. 

एकनाथ महाराज सद्गुरू माऊलींना प्रभूराज म्हणतात. बाबा पुढे म्हणतात, "आपण सत्य काय आहे ते पहा, मायेला फसू नका."

*ज्ञानबीज म्हणजे अखंड नाम* आणि *भूमी म्हणजे भक्त.* जोपर्यंत भक्ताची भूमी शुध्द होत नाही तोपर्यंत ते ज्ञानबीज सद्गुरू माऊलींकडून भक्ताच्या भूमीवर पेरले जाणार नाही. म्हणजेच ते *नाम* तुम्हाला सद्गुरू माऊलींकडून मिळणार नाही आणि नाम न मिळाल्याने तुमचा उद्धार होणे कठीण होते. 

*उद्धार होणे म्हणजे काय?* तर उद्धार होणे म्हणजे भक्ताला सद्गुरूंकडून नामाची प्राप्ती होणे व ती झाल्यावर अखंडितपणे आपण ते न विसरता घेत राहणे होय. अशाप्रकारे आपण सद्गुरू चरणांवर लिन झाले असता, आणखी उद्धार तो कोणता? त्यामुळे आपणाला श्री सद्गुरू माऊलींचे सतत सान्निध्य मिळते, वेळोवेळी सेवा करण्याची संधी मिळते, सत् कार्य करण्याची द्वारे आपोआप सद्गुरू माऊली आपणासाठी खुली करून देतात. अशाने एकप्रकारे आपला उद्धारच होत असतो.

🙏💐👏🙏💐👏🙏💐👏🙏

तुम्ही ज्या बाबांना शरण आहात....1

👏👏👏

*_भाग एक_*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज*

*तुम्ही ज्या बाबांना शरण आहात त्यांची ओळख करून घेता आली पाहिजे, त्यांना स्वत:च्या दृष्टीने पाहता आले पाहिजे असे आपले बाबा कां म्हणतात?*
कारण त्यावेळेस आपण आपल्या बाबांना मानवी त-हेने आपल्यातीलच एक म्हणून पाहत होतो. म्हणून ते म्हणायचे, "आपले सद्गुरू कोण हे आपल्याला ओळखता आले पाहिजेत. आपल्याला आपल्या स्वतःच्या दृष्टीने (येथे दृष्टी याचा अर्थ अंत:र्दृष्टीने म्हणजेच ज्ञान दृष्टीने अर्थात प्रकाशाच्या दृष्टीने डोळे बंद केलेले असोत वा उघडे असोत) पाहता आले पाहिजे."

*हे होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?*
त्यासाठी आपल्याला आपल्या श्री सद्गुरू माऊलीने सत् पदाच्या आसनावरून बहाल केलेल्या *नामाची* उज्वलता करणे, त्या *नामाचा* जास्तीत जास्त उजाळा करणे, जास्तीत जास्त आपणाकडून *नामस्मरण* घडणे हे गरजेचे आहे.

बाबा म्हणतात, *ते आपण आचरणात आणा.*
याचाच अर्थ असा की, "सद्गुरू माऊलीने जी जी शिकवण आपणा समस्त भक्तगणांना आपल्या प्रवचनातून बहाल केली आहे, ती अंगीकारून आपल्या आचरणात आणावयास हवी. त्याबरहुकूम आपण आपले वागणे ठेवावयास हवे, तरच आपल्याला आपल्या श्री सद्गुरू माऊलीना स्वतःच्या दृष्टीने पाहता येऊ शकेल."

आपले बाबा आपल्याला आठवण करून देताना म्हणतात, *जे अनन्य भावे माझ्या भक्तित निपूण आहेत त्यांना सत् कधीही उपाशी ठेवणार नाहीत.*

*सद्गुरु महिमा किती अगाध आहे* ह्याची जाणीव करून देताना ते पुढे म्हणतात, "समर्थ मतलबी मायेला भाळणारे नाहीत. वेळेला समर्थ सेवेकऱ्याचे अर्धे संचित आपल्यावर घेतात आणि आपल्या भक्ताला पूर्व वाईट संचितातून मुक्त करतात. त्यांच्याखेरीज मायेचा पुत वा इतर कुणीही हे घेऊ शकणार नाही, घेणे शक्य नाही."

श्री सद्गुरू माऊली सर्वांना समत्व बुध्दीने पाहतात. त्यांच्याकडे लहान थोर, श्रीमंत गरीब, डावा उजवा, उच नीच असा भेदभाव कधीही नसतो. त्यांच्यासाठी सगळे समान असतात. ते सगळ्यांना तितक्याच आत्मियतेने समजावून सांगत असतात. तितक्याच ममत्वाने बोध देखीली करीत असतात.

"या आसनाच्या ठिकाणी असणारा सेवेकरी, आसनाजवळ सेवेकरी व बाह्य ठिकाणी सद्गुरु आहे" असे जेव्हा आपले बाबा म्हणतात त्याचा अर्थ आपले बाबा आपल्या सेवेक-यावर किती विश्वास टाकतात. तो विश्वास सार्थ करण्यासाठी येथे आपण हे लक्षात घेतले पाहिजे की त्यामुळे आपली जबाबदारी वाढते व ती ओळखूनच, त्याप्रमाणे आपण वागावयास हवे. आपण आपली *कृती* आणि *उक्ती* अशी ठेवावयास हवी की आपल्या सताला किंवा त्यांच्या शिकवणीला कुठे गालबोट लागता कामा नये. उलट बाह्य स्थितीत तो चारचौघांत उठून दिसावयास हवा. त्याच्या उक्ती आणि कृतीमुळे बाह्य स्थितीने आवर्जून म्हटले पाहिजे की वाह् ! धन्य ते सद्गुरू आणि धन्य तो सेवेकरी !!

कारण आपण हे लक्षात घ्यावयास हवे की सद्गुरू हे एकच तत्व होऊ शकते. हा आपल्या श्री सद्गुरू माऊलींचा मोठेपणा आहे की ते म्हणतात, "या आसनाचा सेवेकरी येथे सेवेकरी आणि *बाह्यठिकाणी सद्गुरू आहे.*"

💐👏💐👏💐👏💐👏💐👏

वादे वादे जायते तत्वबोध:

👏👏👏

*_वादे वादे जायते तत्वबोध:_*

अर्थ - शब्दशः अर्थ असे सांगतो की, सुसंवाद केल्याने चांगले तत्वविवेचन होऊन ज्ञानप्राप्ती होते.

*अभिमान कशाने निर्माण होतो?*
तर *_असंगाने अभिमान निर्माण होतो._* (म्हणजेच वाईट माणसांशी संगत केल्याने वृथा अभिमान निर्माण होत असतो.) ह्यासाठी बाबा म्हणतात, *"अहंकाराची बाधा आपल्या मनाला लागू द्यायची नाही. अहंकार आपल्या मनाला शिवू द्यावयाचा नाही."*

बाबा पुढे म्हणतात, "आपला जो सत्संगाचा पाया आहे तो मजबूत करण्यासाठी नितीमत्ता अंगीकारा व त्या सताजवळ त्यांचे अखंड दर्शन मिळण्यासाठी टाहो फोडा. मानवाने सत्संग हा केलाच पाहिजे."

त्यासाठी मानवाने काय केले पाहिजे?
तर *मानवाने सत्संग केला पाहिजे.* त्यासाठी *सद्गुरू माऊलीना शरण गेले पाहीजे.* *सद्गुरू हे परब्रह्म मानले पाहिजे.* सदासर्वकाळ त्या *सद्गुरू माऊलींचे नाम मुखी घ्यावयास हवे.*

*_सद्गुरू हे सेवेक-यास अज्ञानाच्या अंध:कारातून बाजूला सारून पूर्ण प्रकाशाच्या मार्गाने घेऊन जाणारे तत्व असून, ते सर्वव्यापकही आहे._*

सर्व व्यापक म्हणजे सर्व ठिकाणी व्याप्त (चरात चर, परात पर, क्षरात क्षर, इतकेच नव्हे तर ते अणू, रेणू, परमाणू ह्यामध्ये असूनही अलिप्त असणारे असे ते तत्व आहे) असणारे असे ते तत्व आहे.

बाबा पुढे म्हणतात, "तुमची भूमी शुद्ध असेल तर *(भूमी शुद्ध करी, ज्ञान बीज पेरी)* पुरुष / स्त्री हा भेदाभेद त्यांच्याकडे नसतो, त्यामुळे अशावेळी ते भक्तात ज्ञान बीज पेरून, नाम बहाल करून, त्या भक्ताला भगवंताप्रत पोहोचण्याचा राजमार्ग खुला करून देतात."

तो राजमार्ग कसा असावा? तर त्या सद्गुरू माऊलींचे स्मरण करताच तेथे ज्ञान प्रसवावयास हवे. अर्थात ती दिव्य दृष्टी त्या भक्तास प्राप्त होते. त्या दृष्टीच्या सहाय्याने तो भक्त त्या सद्गुरू माऊलींच्या चरणांत तादात्म्य होऊन जातो.

म्हणून श्री सद्गुरू माऊली पुढे म्हणते, "नितीने जा, अनितीस दूर सारा. मी नितीने जाणार अशी भीष्म प्रतिज्ञा करा."

 *अंतकाळीचा बा पांडुरंग !* हे नेहमी लक्षात ठेवा. इतर कुणीही अंतकाळी आपल्या मदतीला धावून येणार नाही, शिवाय श्री सद्गुरू माऊली. आणि अशात-हेने तुम्ही जर वाटचाल केलीत, तर तो भगवंत आपल्या पासून कधीही दूर राहणार नाही. ती श्री सद्गुरू माऊली आपणापासून कदापिही दूर राहू शकणार नाही.

🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐

गुह्यत्वाचा साक्षात्कार....1

🙏👏🙏

आजच्या प्रवचनातून आपल्या श्री सद्गुरू माऊलीने ब-याच गोष्टी उघड करून सांगितलेल्या आहेत. त्याचे स्मरण ठेवून जर कां आपण सर्वांनी मार्गक्रमणा केली, तर ती सद्गुरू माऊली आपणास आपल्या अगदी जवळ घेतल्याशिवाय कदापिही राहणार नाहीत.👏 *_अनगड_*👏

श्री सद्गुरू माऊली म्हणते, *समर्थ उपदेश करीत असतात ते सेवेकरी गरीबी, लाचारी, रोगग्रस्त या मार्गाने सेवेकरी जाऊ नये म्हणून.* हा उपदेश कसा असतो? तर *तो बोधक* म्हणजेच बोध घेण्यासारखा असतो. त्यापासून बरेच शिकण्यासारखे असते.

आपले बाबा पुढे जेव्हा समर्थांबद्दल बोलतात ते तर अतिशय महत्त्वाचे आहे. बाबा म्हणतात, *"समर्थ फार दयाघन आहेत. ते भक्तांचे कोडकौतुक पुरविण्यासाठी कधी पिता बनतात, तर कधी बालक देखील बनतात. ते लोण्यासारखे मऊ मुलायम असून, त्यांना आपल्या भक्ताबद्दल दया ही येतच असते, ती किती? तर दुस-या कुणाला येणार नाही इतकी."* हे सांगताना ते एवढे मोठे श्रेष्ठ तत्व स्वतः असताना, विनम्रपणे, लिनतेने म्हणतात, *मी यत्किंचित पामर काय करू शकणार? समर्थ दयाद्र दृष्टीने पाहणार.*

श्री सद्गुरू माऊली पुढे आपणा समस्तांना आठवण करून देताना म्हणतात, *ज्या सेवेक-यांनी सद्गुरू मेख ओळखली तो सेवेकरी हेलावणार.*

सताचे गुपित हे गुपित न ठेवता, ते गुपित उघड करताना ते म्हणतात, *अशाप्रकारे सत् पदाच्या आदेशाने जर कां ज्योत वागू लागली, तर त्यांचा (सताचा) ठाव घेणे सोपे आहे. अन्यथा वज्रापेक्षा कठीण आहे.*

आता येथे हा विचार करणे आपणास गरजेचे आहे की, आपण अशाप्रकारे सताच्या आदेशांचे पालन करतो कां? त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण वागतो कां? त्यांनी घालून दिलेल्या नितीनियमांचे आपण किती पालन करतो? आपण नित्यनेमाने *नामस्मरण* करतो कां? हे जर कां सर्वस्व आपणाकडून घडत असेल, तर आणि तरच ते सत् आपणास त्यांचा ठाव देईल, अन्यथा नाही.

_येथे ही गोष्ट महत्त्वाची आहे की सत् तत्वास ज्या वेळेस वाटेल की ही ज्योत आता आपला ठाव देण्यायोग्य झालेली आहे, त्यावेळेसच आपल्याला त्या सताचा ठाव घेता येईल, अन्यथा नाही. सतच आपणास तिचा ठाव देईल._

*सताचा ठाव घेणे हे ये-यागबाळ्याचे काम नोहे.*

पुढे बाबा म्हणतात, *"सद्गुरू माऊली कृपेची सावली"* आहे आणि हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. अशा त्या माऊलींची कृपा सर्वस्व अधिष्ठीत असते. पुढे बाबा म्हणतात, *माऊलीला मुलांचे प्रेमही असते.* हे जरी खरे असले तरी मुलालासुद्धा सद्गुरूंबद्दल ओढण ही असलीच पाहिजे.

इतकेच नव्हे तर सगळ्यांत महत्वाचे म्हणजे, *भक्ताकडे ही भावना पाहिजे की, "मी सद्गुरूंचा व सद्गुरू माझे आहेत." त्यांच्यात आणि माझ्यात द्वैत नाही.*

_हे फक्त म्हणण्यासाठी नसून सर्वार्थाने ते असावयास हवे._

तेव्हाच बाबा म्हणतात, *अशावेळी ते हेलावतात.* पण त्यासाठी तोंडाने म्हणजेच *उक्तीने* आणि *कृतीने* ज्योत सद्गुरूमय असावयास हवी. त्याचवेळी *त्रिभुवनी देखील ती वंदनीय ठरते.*

सद्गुरू माऊली पुढे म्हणतात, *जो त्या ठिकाणी स्थिर झाला, तो दूर होणे शक्य नाही व विशेष म्हणजे सद्गुरू त्याला दूर लोटणार नाहीत. हे त्रिवार सत्य आहे.*

परंतु एवढे सगळे म्हटल्यानंतर देखील श्री सद्गुरू माऊली दु:खी होऊन पुढे असेही म्हणतात, *पण सेवेक-यात अजूनही सुधारणा झालेल्या नाहीत.* ही गोष्ट आपणास खचितच कौतुकास्पद आहे असे वाटत नाही.

बाबा आता म्हणतात, *समर्थ प्रथम (ज्योतीची) बुद्धी शुद्ध आहे कां ते पाहणार.*

_त्यासाठी तुम्ही स्फटिकासारखे नितांत शुद्ध रहा. एकदा का त्यांनी तुम्हाला माझें म्हटले तर तुम्ही धन्य होय._

श्री सद्गुरू बाबा पुढे म्हणतात, *समर्थ आपल्या सेवेक-यासाठी अहर्निश झटत असतात. ते कधी नाराज होणार नाहीत. सद्गुरू माऊलींसारखे परम् दैवत नाही. सद्गुरू तुमचे कुळ, मुळ व पूर्वज.*

_विशेष उल्लेखनीय बाब आता पुढेच आहे. श्री सद्गुरू माऊलीने सताची तत्त्वे आणि त्यांचा क्रम आपणापुढे उघडपणे काही अंशी मांडून ठेवला, तो येणेप्रमाणे -_

            *पहिले सत*
            *सतापासून*
      *श्रीहरी ( क्षिराब्धी )* 
           *श्रीहरींपासून*     
                *त्रिगुण*
   *ब्रह्मा*   *विष्णू*   *महेश*
                   आणि
        _तद्नंतर सर्वस्व जगत_

.....हे सतयुगात होते काय?

🙏🙏🙏

वरील विडीयोमध्ये शेवटी हिंदू आणि मुसलमानांचा उल्लेख आलेला आहे. त्यावरून एक गोष्ट आठवली म्हणून ती सांगतो -

*मुसलमान हे सतयुगात होते काय?*
तर त्याचे उत्तर नाही म्हणूनच येईल. मग हे मुसलमान आले कोठून व केव्हा?

श्री कृष्णांना सांब नावांचा मुलगा होता. तो खुप द्वाड होता. त्याला दुर्वास वा विश्वामित्र म्हणा ऋषींची, खोड काढण्याची लहर आली. म्हणून त्यांने आपल्या पोटासभोवती कपडे गुंडाळून व स्त्री अवतार धारण करून त्यांच्यासमोर हजर झाला व विचारता झाला, "सांगा बरे माझ्या पोटात कोण वाढत आहे?"

ऋषीनी सांबाला तक्षणीच ओळखले होते व त्याच्या या खोडकर वृत्तीला देखील समजले आणि म्हणूनच त्यांनी रागाच्या भरात सांगून टाकले की तुझ्या पोटात जे आहे, ते मुसळ म्हणून जन्माला येईल आणि त्यामुळेच तुझ्या पित्याचा मृत्यू ओढवेल व यादव कुलाचा नाश देखील होईल.

झालेही तसेच. ऋषींची ही वाणी खरी ठरली. आता ह्याचे निराकरण कसे करायचे, ह्याचा प्रश्न आ वासून त्याच्या समक्ष उभा ठाकला. कपडे सोडून पाहतो तर काय? साक्षात मुसळच प्रगट झालेले. आता ऋषींची ह्या पुढील वाणीही खरीच ठरणार, ह्यात तीळमात्रही शंका उरली नव्हती आणि तसे होऊ नये म्हणून सांबाने त्या मुसळाची अनेक बारीक बारीक शकले करून नदी किनारी फेकून दिलीत. त्याचीच पुढे अनेक मुसळे निर्माण होऊन, आपसातील युद्धात, शस्त्रे म्हणून त्यांचा वापर होऊन यादव कुलाचा नाश देखील झाला.

ह्याच मुसळांपासून पुढे मुसलमानांची पैदास झाली. मुसळांपासून निर्माण झालेले म्हणून ते मुसलमान. पूर्वाश्रमीचे हे हिंदूच होत. ह्यांच्या बहुतेक चालीरीती ह्या नेमक्या हिंदू धर्माच्या उलट्या असतात. ह्यांचे जे पीर असतात, तेच मुळी आपल्या नाथांकडून दिक्षा घेतलेले असतात.

हे जे हजची यात्रा करण्यासाठी मक्केला जातात, ते स्थान आपल्या श्री शंकरांचे स्थान असून तेथे शिवलिंग असल्याचे अलिकडील संशोधनातून उघड झालेले असून, ते जगजाहीरही होऊन, त्याबाबतचे विडीयो युट्यूबवर उपलब्ध देखील झालेले आहेत.

प्रपंच आणि संसार

*_श्री समर्थ रामदास स्वामीनी प्रपंचा संदर्भात विवरण केले आहे, तर आपल्या श्री सद्गुरू माऊलीने सगुणाचा सार येणे नाम संसार म्हणजेच संसाराबद्दल विवरण केलेले आहे._*

*प्रपंच* केला असता आपण मायेत अडकतो किंवा अडकून राहतो, तर *संसार* केला असता आपण मायेत अडकून न राहता, त्या पलिकडे असणा-या भगवंताच्या चरणाप्रत जाण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करीत असतो. 

_म्हणूनच बाबांनी म्हटलेले आहे_
*संसार करून परमार्थ साधा.*

👏👏👏👏👏👏👏👏👏👏

प्रारब्धाची रेषा पुसता येते.....

🙏🙏🙏

_प्रारब्धाची रेषा पुसता येते असे श्रीसमर्थ रामदास स्वामी छातीठोकपणे सांगतात हे सत्य होय._

अशी कित्येक उदाहरणे आपल्या दरबारात आपल्या श्री सद्गुरू माऊलीनी त्यावेळी प्रत्यक्षात घडवून आणलेली होती आणि ती आपल्यातील ब-याचजणांनी अनुभवली देखील आहेत.

श्रीसमर्थ रामदास स्वामींची एक गोष्ट येथे प्रकर्षाने आठवते ती म्हणजे, "श्रीसमर्थ रामदास स्वामी" ह्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी याच दरबारात आल्यावर आपल्या श्री समर्थ सद्गुरू माऊलींसमोर छत्रपतींना दर्शन देण्यात यावे यासाठी आपली आदीअंतापासूनची तपःश्चर्या देखील पणाला लावली होती. असे ते श्रीसमर्थ रामदास स्वामी ज्यावेळेस हे म्हणतात, ते खरेच होय.

येथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, श्रीसमर्थ रामदास स्वामी ज्यावेळी असे म्हणतात की, *माझी आदीअंतापासूनची जी तपःश्चर्या आहे, ती आपल्या चरणांवर सता*! *मी वाहण्यास तयार आहे, परंतु सता*! *माझ्या शिवबाला आपले दर्शन द्या.* याचाच अर्थ असा होतो की, *श्रीसमर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापूर्वीही होते, इतकेच नव्हे तर आदीअंतापासूनही होतेच.*

मग हे श्रीसमर्थ रामदास स्वामी कोण होते? तर ज्यांच्या नावातच जो *राम* दडलेला आहे, त्यांचे ते *दास* म्हणजे सेवेकरी होते. म्हणूनच ते स्वतःला रामाचा दास येणे *रामदास* म्हणवून घेत असत.

सत् युगात श्री राम होऊन गेले. त्यावेळी श्री रामांबरोबर कोण होते? तर प्रत्यक्ष *श्री मारूतीराय.* श्री मारूती हे रूद्रच होते आणि शिवकालीन श्रीसमर्थ रामदास स्वामी हे दुसरे तिसरे कुणी नसून, प्रत्यक्ष रूद्र देवतेचाच अवतार होते.

याचाच अर्थ असा होतो कि, श्री छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रत्यक्ष श्री रूद्र देवतेनेच आपली आदीअंतापासूनची तपःश्चर्या श्री सद्गुरू माऊलींच्या चरणांवर वाहण्यास (म्हणजेच ॐ कारांच्या चरणी) आपली विनम्रता दर्शविली. *धन्य ते सद्गुरू आणि धन्य तो सेवेकरी.*

ज्या ज्या वेळी श्रीसमर्थ रामदास स्वामी दरबारात एकचित्त होत, त्या त्या वेळी ते *आदेश अल्लख* न म्हणता आपली स्वतःची अशी ललकारी देत, ती म्हणजे *जssय जssय श्री रघुवीर समर्थ* एका लयबद्ध स्वरांत जेव्हा त्यांच्या मुखातून ही ललकारी बाहेर पडत असे, तो क्षण ऐकण्यासारखा व अनुभवण्यासारखाच क्षण असावयाचा. अंगावर रोमांच उभे राहावयाचे. धीर गंभीर आवाजातील श्रीसमर्थ रामदास स्वामींची ललकारी ऐकणे म्हणजे महत् भाग्यच होते. ज्यांनी ज्यांनी हा प्रसंग पाहिला, अनुभवला ते खरोखरीच भाग्यवान. या ललकारीनेच संपूर्ण वातावरण भरून जायचे.

अशा या सद्गुरूंचा सेवेकरी श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना जेव्हा आपल्या श्री सद्गुरू माऊलीने प्रत्यक्ष दर्शन दिले, तो प्रसंगही आज डोळ्यांसमोर उभा राहतो. ह्या दर्शनाचे वैशिष्ठ्य हे होते की, श्री छत्रपती शिवाजी महाराज एकचित्तता साधतात तेव्हा, ते ज्या ज्योतीमध्ये एकचित्त होत, ती ज्योत चक्क आसन सोडून अर्ध स्थितीत एका पायावर उभी राहावयाची, कंबरेत वाकावयाची आणि नंतर त्रिवार मुजरा करावयाची. म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष श्री सद्गुरू माऊलींना मुजरा करून दर्शन घ्यावयाचे व दर्शन घेऊन झाल्यावर, ते जेव्हा पुन्हा आपल्या स्थानी विराजमान होत, तो ही प्रसंग डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखाच होता. किती लयबद्ध आणि शांतपणे ते अर्ध स्थितीत उभे राहावयाचे, तेवढ्याच शांतपणे आणि लयबद्धपणे ते पुन्हा बसायचे, हे कुणीही पाहू शकले नसते, ते त्यावेळी काहीजणांना पाहता आले, ते केवळ आणि केवळ श्री सद्गुरू माऊलींमुळे.

ह्याबद्दल सांगताना स्वयम् श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सत्य उघड केले की आजपर्यंत त्यांनी अशाप्रकारे मुजरा फक्त श्री तुळजाभवानी, श्रीसमर्थ रामदास स्वामी आणि आपली श्री सद्गुरू माऊली (म्हणजेच ॐ कार) यांना सोडून कुणालाच केलेला नाही.

💐🙏💐👏💐🙏💐👏💐

भगवंताच्या प्राप्तीची साधने

👏🙏👏

*भगवंताच्या प्राप्तीची साधने.*

*भगवंत आणि आपण ह्यांच्यामध्ये अभिमानाचा पडदा आहे; हा दूर झाला म्हणजे आपल्याला भगवत्प्राप्ती झाली.* 
हा दूर व्हायला अनेक मार्ग आहेत. कर्ममार्ग, हठयोग,राजयोग, वगैरे मार्गांनी हा तितका लवकर दूर होत नाही; उलट क्वचित् प्रसंगी वाढतोही. *भक्तिमार्ग सोपा आहे. भक्ति म्हणजे भगवंताला अभिमानरहित अनन्य शरण जाणे, भगवंताचे होऊन राहणे, भगवंताशिवाय दुसरे काहीच न दिसणे, सर्वत्र भगवत् प्रचीती येणे. अशी भक्ति प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्व कर्तृत्व भगवंताकडे देणे, सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे, आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकर नाहीसा होतो.* 

हे साधत नसेल तर *गुरु आज्ञेत राहणे,* म्हणजेच आपला मान अभिमान, शहाणपण, हे सर्व गुंडाळून ठेवून, गुरु सांगतील तसे, सबब न सांगता वागणे. हेही साधत नसेल तर संतांजवळ नुसते पडून राहणे. त्यांच्या सांगण्याने, सहवासाने, अभिमान हळूहळू कमी होतो.

भक्ति दोन प्रकारांनी उत्पन्न करता येते. पहिला प्रकार म्हणजे सर्व सोडून, लंगोटी लावून, 'भगवंता, तू मला भेटशील तेव्हाच मी उठेन,' अशा निग्रहाने बसणे. हा मार्ग कठीण आहे. प्रापंचिकाला हा साधणार नाही. *दुसरा प्रकार म्हणजे सहवासाने भक्ति उत्पन्न करणे.* भगवंताचे गुणवर्णन वाचणे, त्याचेच गुण श्रवण करणे, त्याच्या दर्शनास जाणे, प्रत्येक कृत्य भगवंताकरिता करणे, प्रत्येक कृत्यात त्याचे स्मरण ठेवणे; असा त्याचा अखंड सहवास ठेवावा, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होते. विषयाकरिता केलेली भगवद्‌भक्ति ही खरी भक्ति होऊ शकत नाही. *भगवत्‌सेवा निष्काम पाहिजे;* कारण भक्ति म्हणजे संलग्न होणे. मी विषयाशी संलग्न असतो तेव्हा ती विषयाची भक्ति होते, भगवंताची नाही. तेव्हा, आपण करतो ही भगवंताची सेवा नसून विषयाची सेवा होते हे ठरल्यासारखे झाले; म्हणजे मी विषयाचाच गुलाम झालो. विषयांचा गुलाम होऊन मी विषय कसचे भोगणार ? मालक होऊन विषय भोगावेत. संत, भगवंत, हे निरतिशय सुख देणारे आहेत. त्यांच्याजवळ विषय मागणे म्हणजे रामाजवळ भिक्षेचे फडके मागण्याइतकेच वेडेपणाचे नव्हे का ? आपण सेवेचे फळ मागून भगवंताला मात्र दूर करतो. *भगवंताची प्राप्ती हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून* आपण नेहमी त्याच्याभोवती फिरत असावे. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत, हे लक्षात ठेवावे.

भगवंताच्या प्राप्तीच्या आड येणारे नाहीसे व्हावे म्हणून 
तळमळणारा जो असतो, त्याचे साधन बरोबर चाललेले असते.

👏👏👏👏👏👏👏👏👏👏
साभार आंतरजालावरून

मंत्र पुष्पांजली आणि अर्थ

👏👏👏

*मंत्र पुष्पांजली आणि अर्थ*

*ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्| ते हं नाकं* *महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॐ राजाधिराजाय प्रसह्ये साहिने | नमो वयं वैश्रवणाय कुर्महे स मे कामान्कामकामाय मह्यम्|* *कामेश्वरो वैश्रवणो ददातु| कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं* *समंतपर्यायी स्यात्सार्वभौम: सार्वायुष आंतादापरार्धात्पृथिव्यै समुद्रपर्यंता या एकराळिति तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुत: परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे*
*आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवा: सभासद इति एकदंतायविद्महे वक्रंतुडाय धीमहि तन्नोदंती प्रचोदयात्*

 _श्रीशुभं भवतु_
 
मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणे-

 _या मंत्रांचा अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकाचा अर्थ येणेप्रमाणेः_

 *श्लोक – १*
 _यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन् तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याःसंति देवा:_

 *श्लोकाचा अर्थ –*
देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.

 *श्लोक २*
 _ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने। मनोवयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामाकामाय मह्यं। कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः_ 

 *श्लोकाचा अर्थ –*
 _आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची )पूर्ति प्रदान करो._

 *श्लोक ३*
 _(प्रथमार्थ) ओम स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं।_

 *श्लोकाचा अर्थ –*
आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.

 *श्लोक ३*
 _(द्वितियार्थ) समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात्। पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति।_
 
 *श्लोकाचा अर्थ –*
आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.

 *श्लोक ४*
 _तदप्येषः श्लोकोभिगीतो। मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे। आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति।।_
 
 *श्लोकाचा अर्थ –*
या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.

 *संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

एकाचा अंत.....

👏👏👏

*एकाचा अंत घेणे येणे नाम एकांत*
एकाचा म्हणजे कुणाचा?
तर तो एक म्हणजे अनंत, तो एक म्हणजे अपुली श्री सद्गुरू माऊली, तो एक म्हणजे साक्षात ॐ कार.
हे शक्य आहे कां?
म्हटले तर होय, म्हटले तर नाही.
हे शक्य कोणाला आहे? तर जो भक्त त्या अपुल्या सद्गुरू माऊलींशी तन, मन आणि धनाने तादात्म्य पावला आहे त्यालाच. तसेच त्या सद्गुरू माऊलींची इच्छा असल्यास, तरच हे त्या भक्ताला ते शक्य होते, अन्यथा नाही.
*द्वैत आणि अद्वैत काय आहे?*
अशुद्धत्वता आणि शुद्धत्वता. बाबा म्हणतात, *मन शुद्ध तेथे अद्वैत आहे आणि जेथे मन अशुद्ध तेथे द्वैत आहे.*

*संसार करून परमार्थ साधणे* हाच बाबांच्या मते अद्वैत सिद्धांत होय व तोच श्रेष्ठ होय.

पुढे बाबा म्हणतात, *अद्वैत सिद्धांत हा निराकारी आहे.* *सत् हे आकार रहीत असते.*

*आकारी जे आहे, ते द्वैत आहे आणि ह्याला कारण माया आहे.*

बाबा पुढे म्हणतात, *तमोगुण म्हणजे तामस गुण म्हणजेच अंधार होय.* येथे विचार सापडत नाही, तर येथे अविचारच सापडतो. येथे प्रकाश सापडणार नाही.

*त्रिगुणी माया काय आहे?*
रज, तम आणि सत्व गुण जेथे एकत्र येतात, तेथेच ही त्रिगुण नटलेली माया साकारताना दिसून येते. हे त्रिगुण म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणूनच म्हटले आहे, ही त्रिगुणात्मक आहे. अर्थात त्रिगुण नसतील तर संसार होणार नाही ह्याची बाबा पुढे आपणास आठवण करून देतात.

*बाबा श्रीमान कुणाला म्हणतात?*
सताचा जो सेवेकरी तो बाबांच्या मते खरा श्रीमान. फक्त धनवान किंवा सावकार तो श्रीमान नव्हे. दूस-यांचे हित करणारा तो बाबांच्या मते श्रीमंत.

म्हणूनच पुढे बाबा म्हणतात, *अद्वैत भक्ती ही श्रीमान आहे.*

बाबा पुढे आठवण करून देताना म्हणतात, *हा दरबार सताचा दरबार आहे आणि तो ज्ञानासाठी मुक्त आहे.* *हे ज्ञानाचे आगर आहे.* आणि हे पुढील काळात बाबांनी वेगवेगळ्या विषयांवरील प्रवचने करून दाखवून दिले आहे.

ह्या दरबारात अनेक प्रकारची कर्तव्ये बाबांनी केलेली आहेत. त्यात ज्ञानोपासना करण्यापासून ते शुद्धीकरणे - वेगवेगळ्या पातळींची, स्थुल, सूक्ष्म, कारण, महाकारण देहाची आणि त्या पलिकडची सुद्धा केलेली आहेत. सव्वीस अवतारांचे गुपितही ह्या कलियुगी स्थितीत उघड करून सांगितले आहे. सद्गुरूंचा महिमा पदोपदी उलगडवून सांगितला आहे, त्याशिवाय दाखवूनही दिलेला आहे. तो अगाध कसा आहे हे सोदाहरण दाखवून दिलेला आहे. अखंड चमत्कार काय व कसे असतात, तर त्यांच्यासमोर भुरटे चमत्कार कसे खुजे असतात हे ही भक्तगणांना येथेच या दरबारात दाखविलेले आहेत. किती किती म्हणून कर्तव्ये श्री सद्गुरू माऊलीने आपल्या या अवतारकार्यात या दरबारात प्रत्यक्षात घडवून घेतली होती, ती अवर्णनीयच होत.

शेवटी बाबा म्हणतात, *ज्याठिकाणी सत् आहे, तेथे शांती व स्थिरता आहे.* *याच भूमीवर पूर्वी सत् पदाचे स्थान होते.*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

पुन्हा देह नाही....

👏👏👏

नर (मनुष्य) देहानंतर पुन्हा देह नाही हे म्हणने तितकेसे बरोबर नाही. कारण मनुष्य देहामध्ये असतांना आपण जे कांही कर्तव्य करीत असतो त्याचा लेखाजोखा आपणच तयार करून ठेवित असतो, त्याचा हिशेब पुढिल देह कोणता मिळणार - (जसे चत्वार खाणी म्हणजेच जे कांही दृश्यमान आहे अर्थात डोळ्यांना दिसू शकते - तसेच त्या व्यतिरिक्त असणारे) - हे अवलंबून असते. त्यामुळे मानव देह मिळणार किंवा नाही? कां इतर कोणता देह मिळणार? हे सर्वस्वी आपल्या ह्या जन्मीच्या कृतीवर अवलंबून
असणारे असते आणि म्हणूनच म्हटले जाते "चांगले ते पेरा म्हणजे उगवेल तेही चांगलेच असेल" अर्थात चांगले काय आणि 
वाईट काय? हे आपण कसे ठरविणार? 
हे ठरविण्यासाठी आपल्याला एका चांगल्या मार्गदर्शकाची आवश्यकता असते. म्हणजेच
गुरूची आवश्यकता असते. हे गुरू पहिल्या प्रथम आपले माता-पिता असतात, जे
वेळोवेळी आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून धडपडत असतात. तद्नंतर शाळेत जाऊ लागल्यावर शिक्षक हे आपले
गुरू होतात आणि मधल्या काळांत जस जसे आपण मोठे होत जातो तस तसे समाजामध्ये
असणा-या चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होत जातो आणि ह्या कसोटीच्या
वेळी आपण आपल्या माता-पित्यांनी तसेच गुरूजणांनी दिलेले संस्कार पाठीमागे सोडून
नविन संस्कार धारण करण्यास सुरूवात करीत असतो. त्यात मग घरी दारी रोजची भांडणे
आणि इतर गोष्टींचा समावेश होतो. गोष्टी विकोपाला जाण्याची वेळ येते आणि मग आपल्याला
गरज भीसते ती अध्यात्मिक, धार्मिक गोष्टींची. अशा वेळेस धाऊन येतात ते आपले गुरू,
जे फक्त गुरू न राहता सद्गुरू होतात. ह्या सर्वस्व चक्रातून बाहेर पडण्यास आपणांस
मदत करतात. आपल्याला राजमार्ग दाखवितात आणि आपला पुढिल कल्याणाचा,
मुक्ती मोक्षाचा मार्ग खुला करून देतात आणि हा राजमार्ग खुला झाला की आपण पुनरपी 
जननम पुनरपी मरणम आणि ते सुद्धा हक्काने मानव देह मिळवून त्या सताची सेवा
करण्यासाठी सज्ज होतो. परंतु हे देणे म्हणजेच मानव देह देणे की इतर चत्वार खाणीत ज्या
मध्ये किड्या मुंग्यापासून ते साध्या डोळ्यांना न दिसणा-या (जे आपण डिस्कवरीवर पाहतो)
जीव-जंतूपर्यंत असणा-या कोणत्याही देहांत फेकले जाऊ शकतो) हे सगळे त्या सद्गुरू
माऊलीच्या हातात असते. म्हणून नर देह पुन्हा प्राप्त होऊ शकतो हे सत्य होय.
वरील उहापोह हा आपल्या श्री सद्गुरूंच्या प्रवचनातील कांही अंश आहे. हे सर्वस्व
विचार जे योग्य आणि चांगले आहेत हे त्यांचे असून त्यामधील अनवधानाने कांही चुकीचे
असल्यास ते माझे आहेत. तरी त्याबद्दल कोणी चुकीचा अर्थ काढू नये इतकेच सांगणे.
श्री सद्गुरू माऊलींची क्षमा मागून हे इथेच आवरते घेतो.
धन्यवाद. 🙏🙏🙏

अवघाची संसार सुखाचा करीन

👏🙏👏

येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे.

*अवघाची संसार सुखाचा करीन*
*आनंदे भरीन तिन्ही लोक*
*जाईन गे माये तया पंढरपूरा*
*भेटेन माहेरा आपुलिया*
बाबांनी ह्या अगोदर संसार म्हणजे काय? हे सांगताना सांगितले आहेच की *संसार येणे नाम सगुणाचे सार*

*संत येणे स + अंत* जो कोणी सताचा येणे सद्गुरूंचा अंत लावण्या किंवा घेण्या गेला तो तेथेच शांत झाला. त्यांची *वाचा हे निमाली ते श्री गुरू*

सद्गुरूंचा अंत कुणीच लावू शकत नाही, लावणे शक्य नाही, लावणारही नाही, जोपर्यंत ते आपली जाण देऊ इच्छित नाही.

प्रपंचाबद्दलही असे म्हणता येईल की, पर + पंच येणे नाम प्रपंच.

*अहं ब्रह्मास्मी* मीच ब्रह्म आहे. हे निर्विवाद सत्य होय. पण कोणासाठी? कोण म्हणू शकतो असे? तर बाबाच ह्याची फोड करताना सांगतात, *आपल्या रूपाचे, आपली दृष्टी बंद करून जर कां आपण दर्शन घेण्यात यशस्वी झालो, म्हणजेच तो भक्त आपल्या स्वरूपात जातो, त्यावेळीच तो ब्रह्म होतो.*

बाबा पुढे किती साध्या आणि सोप्या शब्दात सांगतात, *आपल्या हृदयी जो अविनाशी आहे, त्याला ओळखले म्हणजेच संसार* *ज्यावेळी आपण आकाराची जाणीव घेऊ तेव्हाच निराकाराचा शोध लागेल.*

बाबा म्हणतात, *गरीब, श्रीमंत हे पूर्व संचित आहे* म्हणून भक्ती मार्गातील, त्यातही एकाच सद्गुरू माऊलींच्या सेवेक-यांमध्ये *गरीब, श्रीमंत* हा भेदभाव कुणी करू नये किंवा कुणी आणूही नये.

येथे *कृष्ण-सुदाम्याचे* उदाहरण बरेच काही सांगून जाते. ह्यापासून आपण बोध घेण्यास काहीच हरकत नाही.

तुकाराम महाराज म्हणतात, *सगुणाचे सार घेतल्यावर *सत् + चित् + आनंद = सच्छिदानंद* लांब नाही. म्हणजेच सताच्या चित्तात अर्थात सद्गुरू माऊलींच्या चिंतनात, सद्गुरू माऊलींच्या आठवणीत किंवा स्मरणात म्हणा आपण आपला अमूल्य असा वेळ जर कां कारणीभूत लावला तर तो *सच्छिदानंद* आपणास दूर नाही.

हे आहे, ते सर्व परमेश्वराचे आहे, आपण फक्त निमित्त मात्र आहोत, ही जाण जर आपणास सदोदित असेल, तरच बाबा म्हणतात, *संसार सुखाचा होईल.*

*जी ज्योत मनाने सुस्वरूपी असेल तीच सद्गुरूंना पाहू शकेल.*

एकनाथ महाराज म्हणतात, *काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल* जर आपण काया म्हणजे हे आपले पंचमहाभूतांचे शरीर हे जर कां पंढरपूर मानले, तर त्या शरीरात जो वास करून राहिलेला *आत्मा* आहे, तो म्हणजे विठ्ठल होय.* हे खरेच आहे, परंतु हा आत्मा रूपी विठ्ठल कोण? पंढरपूरात युगाने युगे उभा असलेला विठ्ठल की इतर कोणी?

 _तर तो हा विठ्ठल नव्हे. विठ्ठलांचा विठ्ठल जो आहे तो. तो कोण? तर ते म्हणजे ज्यांनी ह्या अगोदर 25 अवतार कार्ये नटविलीत ते, आपली श्री सद्गुरू माऊली, ज्यांनी ह्या कलियुगात 26 वे अवतार कार्य नुकतेच संपन्न केले, ते आपले बाबा._

बाबा म्हणतात, *तुकाराम* येणे *तुच का तो राम?*

बाबा पुढे म्हणतात, *ज्या ठिकाणी सत् आहे, त्या ठिकाणी भगवंत आहे.* आणि वेळ प्रसंगी अशा भक्ताचे संचितही ते स्थीर करतात. अशी कित्येक उदाहरणे बहुतेकानी *ह्याची देही, याची डोळा* प्रत्यक्षात अनुभवली आहेत.

शेवटी ती दयाघन श्री सद्गुरू माऊली समस्त भक्तगणांना आठवण करून देताना म्हणते, *जर भक्ती आपल्याकडून झाली नाही, तर जन्माला येऊन आपला उभा जन्म फुकट आहे.*

*तुम्ही या भवसागरी संसार करून, आणि करता करता तो तरून या भवसाग-याच्या पलीकडे चला.* _म्हणजेच त्या श्री सद्गुरू माऊलींच्या चरणी लीन होऊन, त्यांचे दर्शन मिळवून आयुष्याचे सार्थक साधा._

अवघाचि संसार.....

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

लोकसंग्रह हा अनेक कारणांसाठी केला जातोे; परंतु *संत लोकसंग्रह करतात ते आयुष्याची उंची वाढविण्यासाठी.*

व्यवहारी जगातला लोकसंग्रह हा संघर्षासाठी असतो किंवा व्यवहारी संपदेसाठी असतो. व्यवहारी सोहळे हे तत्कालीन असतात. सोहळा संपल्यानंतर हा लोकसंग्रह रिक्तता आणतो; *मात्र ईश्वरी सत्तेच्या भेटीसाठीचा लोकसंग्रह हा दिव्यत्वासाठी असतो. हा सोहळा संपला तरी त्यातून मिळालेला आनंद हा स्थायी असतो.* कारण या सोहळ्याचा हेतू "लेना देना बंद है, फिर भी आनंद है" या सूत्रावर चालणारा असतो. 

माउली या सुखाच्या सोहळ्यासाठी जाण्याचा हेतू स्पष्ट करताना म्हणतात,

*अवघाचि संसार सुखाचा करीन ।*
*आनंदे भरीन तिन्ही लोक ।।१।।*
*जाईन गे माये तया पंढरपुरा ।*
*भेटेन माहेरा आपुलिया ।।२।।*
*सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।*
*क्षेम मी देईन पांडुरंगी ।।३ ।।*
*बाप रखुमादेविवरू विठ्ठलेचे भेटी ।*
*आपुले संवसाटी करूनी राहे ।।४।।*

*हा माउलीचा अभंग निव्वळ अभंग नसून ती एक प्रतिज्ञा आहे. अवघ्या जगाला सुखी करण्यासाठी केलेली.* यामधून माउली दु:ख आणि दु:खीवृत्ती कवटाळून बसलेल्यांना दु:खाला खूप मोठं न समजता राहायला सांगून म्हणतात की, "मी अवघा संसार सुखाचा करीन, सर्वत्र आनंद भरीन. "माझं जे माहेर आहे पंढरपूर जिथे सर्व आनंदाचे भांडार आहे. पांडुरंग नावाचा जो आनंदाचा कंद आहे, त्याला मी भेटेन. मी जे काही पुण्य केलंय ते फलद्रुप करीन आणि माझ्या पांडुरंगाला मिठी मारीन आणि त्यावेळेला त्याला मिठी मारीन त्यावेळी मीही त्याच्याशी साम्यरूप होईन. *तो आनंदस्वरूप आहे. मग मीही आनंदस्वरूपच होऊन जाईन.*

व्यवहारी जगामध्ये आमची धावाधाव सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, मान, सौंदर्य यासाठी असते. लोकांची धावाधाव आनंदासाठी असते. जर सत्ता, संपत्तीमध्ये आनंद एकवटला असता तर लोकांनी पालख्या सत्ताधीशांच्या किंवा श्रीमंतांच्या उचलल्या असत्या, पण वास्तवता ही आहे की, सत्ता, संपत्ती हे क्षणभंगूर आहे. आजचा सत्ताधीश उद्या सामान्य होणार आहे. आजीचा माजी होणार आहे. आजचा संपत्तीचा मालक उद्या कपल्लकही होऊ शकतो. म्हणजे ते क्षणिक आनंद देतात. *जे माजी होणार आहेत त्यांच्या निघतात त्या मिरवणुका, पण जे शाश्वत आनंद देतात, विचारांची उंची देतात, चित्तशुद्धतेचा ध्यास घेऊन जीवनात निर्मलता आणतात, भेदाभेद संपवून मानवतेचा ध्यास घेऊन जगतात त्यांच्याच पालख्या उचलल्या जातात. त्यांचेच पाऊल डोक्यावर घेतात. जे कधीही माजी होत नाहीत.* 

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर कधीही माजी होत नाहीत. त्यांचे जीवन तत्त्वज्ञान आणि कार्य हे अवघ्यांच्याच कल्याणासाठी असते. म्हणून त्यांच्या पालख्या निघतात. कारण त्यांच्याजवळ जे असते तेच ते तो जगाला देतो. दु:खी माणूस दु:खच देतो. क्रोधी माणूस क्रोध पसरवतो, लोभी लोभ. पण संतांच्या हृदयात केवळ आनंदच असतो. त्यामुळे ते आनंदच देतात. म्हणून माउली म्हणतात, मी जो संसार करणार आहे सुखाचाच करणार आहे. यामध्ये दु:खाचा लवलेशही असणार नाही. सुखाचा करून मी एकटाच सुखी होणार नाही. तर अवघे जग मी सुखी करणार आहे. आनंदी करणार आहे. संतांच्या जगण्याचा हेतूच मुळामध्ये विशाल असतो. *डोक्याने मोठा तो संत आणि हृदयाने मोठा तो संत असे म्हणतात.* 

संत आपल्या ब्रीदावलीला जागतात. माझ्यासारख्यांची ब्रीदावली स्वार्थी असते. मी म्हणतो, अवघाचि संसार एकट्याचाच करीन बाकीच्यांची वाटच लावीन. माझा संसार एकट्याच्या सुखाचा विचार करतो; परंतु संतांचा संसार अवघ्यांचा असतो. माउलींच्या भाषेत सांगायचे झाले तर..

ते वाट कृपेची पुसतु ।
दिशाची स्नेहेची भरितु ।
जीवातळी अंथरितू ।
जीव आपुला ।

संत जिथे जातात तिथे स्नेह, प्रेम, मानवी जीवनाची उच्चतम मूल्ये घेऊन जातात. प्रेमाने जग बदलतात. दुसऱ्याच्या सुखासाठी आपल्या जिवालाही अर्पण करण्यासाठी उत्सुक असतात. आपली काया जगामध्ये आनंद निर्माण व्हावा यासाठी झिजवतात. आपल्या संवेदनशील करुणेच्या प्रेरणेने आर्तांची दु:खे संपवून त्याचे सोयरे बनून वाटचाल करतात. लौकिक आणि अलौकिकसाठी ते सोबती बनून बोटाला धरून मार्ग चालवतात आणि स्वत:ही चालतात.

(लेखक इंद्रजीत देशमुख हे संत साहित्याचे अभ्यासक आहेत)

हृदयातील सद्गुरुंशी संवाद

🙏👏🙏

*मधलं पान*

माझं हे मधलं पान मला खूप काही देतं असतं - शिकवीत असतं. काही वेळापूर्वी मला म्हणालं की, कुठंही लांबवर शोधायला जायची गरज नाही. शांत बस आणि डोळे मिटून घे. मनात येणारे विचार येवू देतं, रोखू नकोस विचारांना. जसे विचार येतील तसेच विचार विलीन होतील.

*आता हृदयातील सद्गुरुंशी संवाद साधायचा आहे. तुझे सद्गुरु तुझ्या हृदयात वास करून आहेत - निवास करून आहेत. त्यांना शोधायची तुला गरज नाही, तुलाच त्यांनी शोधलंय नी तुझ्या हृदयात वास करून आहेत.*

शिष्यानी सद्गुरु शोधत फिरायचं नसतं तर सद्गुरुच योग्य शिष्यांची निवड करीत असतात.

*हृदयस्थ सद्गुरुंशी संवाद साधण्याची वेळ आता आली आहे. बघ सद्गुरु तुझी आतुरतेने वाट पहात आहेत. विनम्र होवून त्यांच्या चरणावर अहंकार समर्पित करून लीन हो, एकरूप हो, सर्वकाही तुला देणार आहेत. एकरूपता प्राप्त होताच संवादही होईल सद्गुरुंशी. नामात राहून सद्गुरुंच्या चरणी रहा, मरणानंतरची मुक्ती अनुभवण्यापेक्षा जिवंतपणी मुक्तीची अनुभूती घे कारण सद्गुरुच ही अनुभूती देतात. लागता ओढ सद्गुरुंच्या भेटीची, जाणीव होतं असते हृदयस्थ सद्गुरुंची. एक लक्षात येतंय की सद्गुरुंविना जीवन नाही - आयुष्य नाही. खरं ना, पटतंय ना.*

*जय श्री सद्गुरू माऊली*

साभार: श्री. प्रदीप नरहरि केळकर

रागामुळे अनुसंधानास धक्का बसतो....

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

*रागामुळे अनुसंधानास धक्का बसतो हे तर आपल्याला माहीत आहेच. अहंकारात आग्रह असतो आणि त्या आग्रहीपणामुळे आपण संतापतो.* 

हे केव्हा होते? जेथे आपली सत्ता असते तेथेच मनाविरुद्ध घडले की राग येतो. परंतु, जेथे आपली सत्ता चालत नाही, आपल्याला कोणी विचारीत नाही, आपल्यापेक्षा वरचढ अथवा पूज्य माणसादेखत जेव्हा मनाविरुद्ध घडते, तेव्हा राग येत नाही आणि आला तरी आपण आवरतो. 

यावरून मला एक सुंदर कल्पना सुचली:- ज्या प्रसंगी मी रागावतो, तेथे जर श्रीसद्गुरू आले तर माझा राग एकदम उतरेल हे मला खरे खरे पटले. 

भगवंताला आपण विसरतो म्हणून विकार आपल्यावर अंमल गाजवतात. अर्थात भगवंताचे स्मरण राखले तर विकारांचा अंमल लोपून जाईल. यालाच *नामस्मरण* म्हणतात. 

*आपण नामस्मरण करतो म्हणजे भगवंत मला पाहतो, तो माझ्यापाशी आहे याचे स्मरण मनाला देत असतो.*

*नामस्मरणाचा हा अर्थ ज्या दिवशी माझ्या मनात उदय पावला त्या दिवशी साधनमार्गात माझी खरी वाढ झाली. नाम घेताना "ते आहेत, मला पाहत आहेत" ही भावना स्थिर ठेवण्याचा अभ्यास मी आरंभला आणि क्रोध मला स्वाधीन झाला!* 🙏 

*जय श्री सद्गुरू माऊली*
###############
साभार: नरेंद्र नवार 

ॐ कार !!!

👏👏👏

आपल्या श्री सद्गुरू माऊलीने म्हणजेच बाबानी *ॐ कारांची* फोड करून सांगताना संपूर्ण विश्वाची माहिती आपणा सगळ्यांसमोर प्रगट केली आहे.

*ॐ कार* म्हणजे काय?
*ॐ कार* म्हणजे सर्व त्रिभुवन व्यापून असणारे तत्व. त्रिभुवन म्हणजे तीन भुवने !! *ॐ कार* हे आकारी आहे. *ॐ कार* हे अक्षर आहे. *अक्षर* म्हणजेच *पंचमहाभूतें* हि *पंचमहाभूतें* - आप (जल), तेज, वायु, आकाश आणि पृथ्वी. 

(त्रिभुवन म्हणजे स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक. *[महाराष्ट्र राज्य शब्दकोश खंड चार]* )

आता महत्वाची गोष्ट ही की, *ओम* हे अक्षर *पूर्णत्व अक्षर* होत नाही व त्याचा उच्चारही करता येत नाही, जोपर्यंत त्यावर अर्ध चंद्राकृती कोर येत नाही, तसेच त्या अर्ध चंद्राकृती कोरीवर बिंदू जोडला जात नाही.

आता बाबा पुढे सांगतातच की, ही जी कोर आहे, ती कशाचे प्रतिक आहे? तर ती *मायाच* होय. या मायेमध्ये काय काय सामावलेले आहे? तर यामध्ये *आकार* आहे, *उकार* आहे आणि *मकार* देखील आहे.

हे *आकार, उकार, मकार* म्हणजेच क्रमाने *ब्रह्मा*, *विष्णू* आणि *महेश* होत.

जसे - *ब्रह्मा* मध्ये *आकार* आहे
*विष्णू* मध्ये *उकार* आहे तसे
*महेशा* मध्ये *मकार* आहेच.

पुढे बाबा म्हणतात, *पण त्यात बिंदू टाकल्यावर ॐ तयार झाला.* म्हणजेच बाबांच्या सांगण्यानुसार या पंचमहाभूतांमध्ये *माया* असून देखील उपयोगाची नाही, तर त्या ॐ ला पूर्णत्वता येण्यासाठी त्या अनंतांचा म्हणा, त्या परमेशाचा म्हणा तो बिंदू रूपी अंश टाकला गेला तरच तो ॐ कार पूर्ण होतो, पूर्णत्वास जातो.

(सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते. *[विकिपीडिआ]*) हीच ती पंचमहाभूतें होत.)

ह्याचाच अर्थ असा की, "आपले हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे, परंतु ते पूर्णत्व नाही. कारण ते माया रहीत आहे, त्याशिवाय त्यामध्ये तो बिंदू देखील नाही."

तर ते पूर्णत्वास कधी जाईल? तर ज्यावेळेस ते मायेने आपल्या ताब्यात घेतले जाऊन, त्यामध्ये अनंतांचा अंश म्हणजेच बिंदू प्रवेश घेईल, त्यावेळीच ते ख-या अर्थाने पूर्णत्व होईल.

या *ॐ* लाच, बाबा म्हणतात, *आम्ही समर्थ म्हणतो. तेच ते निर्गुण, निराकार."* हे निर्गुण, निराकार फक्त मानवासाठी आकार घेतात आणि येथेच न थांबता, ते मानवाना परम् गतीला घेऊन जातात. या मानवी देहाला ते इहलोक सोडून परलोकात देखील घेऊन जातात. अणू, रेणु, परमाणू आणि त्याच्याही पलीकडे ते घेऊन जाऊ शकतात. परंतु, त्यासाठी मानव सुद्धा त्या गतीचा, त्या पद्धतीचा, त्या पायरीचा पाहिजे. अशा भक्ताला कोणतीही उणीव पडणार नाही, असे ते स्वतः सांगतात.

पण हे सगळे मिळवण्यासाठी मानवाला सत् मार्गाने जाणे, हे त्याचे आद्य कर्तव्य आहे ह्याची जाणीवही करून देतात.

🙏💐🙏💐👏💐🙏💐🙏

अनगडवाणी