Wednesday, June 27, 2012

साक्षी – यशाची साक्षीदार ....!!!


साक्षी – यशाची साक्षीदार ....!!!

साक्षीची जिद्द पहा किती
तिने मारली विजयाची बाजी मोठी 

        घर नाही, दार नाही
        इतर कोणाची तिला साथ नाही

अशाही प्रतिकूल परिस्थितीत
९० टक्के मिळविले परिस्थितीवर करीत मात 

        साथीला फक्त माता आहे
        दैव देणारा दाता आहे

स्वयंप्रेरणेने अभ्यास करून
यशस्वी होण्याची ही गाथा आहे........!!!

(संदर्भ : मटा दिनांक: २६-०६-२०१२,
आवाहन:  समस्त वाचक वर्गाला कळकळीचे आवाहन, ज्या कोणाला साक्षीला आर्थिक मदत करावयाची असेल त्यांनी मटा किंवा मटा  हेल्प लाईनशी संपर्क साधावा)

Tuesday, June 26, 2012

प्रतिभेशी फारकत.....!!!




(photo courtesy: Maharashtra Times)

नावात काय आहे?.......
प्रतिभेशी फारकत.....!!!

काय ह्यांची “प्रतिभा”
काय ह्यांची “पाटीलगिरी”
ह्यांच्या विक्रमात आहे
सर्वाधिक परदेशांची वारी

३५ जणांना दाखविली दया
ज्यांच्यामध्ये आहे गुन्हेगारीची छाया
५ वर्षाच्या कालावधीत
जमविली आहे भरपूर माया........!!!  

(संदर्भ : मटा मधील बातमी) 
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14336868.cms

Friday, June 22, 2012

आग लागली आग.........!!! (ही नव्हे वात्रटिका, तर ही आहे मयुरटीका......ही आहे वास्तविका) (समाजाचे वास्तव शब्दांकन)

















आग लागली आग.........!!!
(ही नव्हे वात्रटिका, तर ही आहे मयुरटीका......ही आहे वास्तविका)
(समाजाचे वास्तव शब्दांकन)

आग लागली आग
त्यात महत्वाच्या फायली झाल्या खाख
लोकांच्या दर्शनासाठी फक्त
उरली त्यांची राख........१

     एक मंत्री म्हणे
     हे झाले नैसर्गिक आपत्तीमुळे
     काय हो समजतात हे आम्हाला
     आम्ही आहोत का हो खुळे ?............२

स्वत:ची चामडी वाचविताना
उदाहरणादाखल देतात काहीही दाखले,
लव्हासा, आदर्श प्रकरणांचे
तीन तेरा मात्र वाजले की वाजवले?...........३

     ज्याने राखावी माहिती
     त्याचीच झाली फटफजिती
     आय टी म्हणविना-या विभागाची
     सगळी झाली माती ..............४

मंत्रालयातील ही आग
आहे अपघात की घातपात?
यावरच चर्चा रंगली
सा-या उभ्या जनमाणसात .........५

Thursday, June 14, 2012

“टोल धाड”.......मयुरटीका.....वास्तविका !!!















टोल धाड

मनसेची पडली,
टोल (वर) धाड
कोणी म्हणे हा
हल्ला आहे भ्याड !!

     नाही लक्ष दिल
     तर असेच चालू राहील
     ह्यांच्याकडे मग
     कोण बर पाहिल?

टोल धाड

टोलवाले म्हणती
आली टोळधाड
आंदोलकांना पोलीस ठेवती
टोलच्या सीमे पल्याड

     वरून आले आदेश
     करू देऊ नका टोल शिवाय प्रवेश
     पैसे जरी वसूल झाले
     तरी भरीत रहा तुम्ही पैशाचे थैले  



टोलवर कमाई
............चारोळी.......!!!

करोडो रुपये वसूल झाले
तरीही चालू आहे टोलवाल्यांची वरकमाई
कोणी ह्यांना रोखेल का हो
की होईल ह्यांची दिलजमाई?

Tuesday, June 12, 2012

डॉ. मुंडे सांगा कुणाचे?


डॉ. मुंडे सांगा कुणाचे?

मुंडे सांगा कुणाचे?
मुंडे भ्रुणहत्त्या करणा-यांचे

     मुंडे सगळ्यांनाच प्रिय होता,
     मुंडे सगळ्यांचाच स्वीय होता,

मुंडेची सर्वत्र उठबस होती,
त्याच्या हातात भ्रुणहत्त्येची नस होती,

     समाजाला दाखविले आपले वजन,
     राजकीय नेत्यांशी सलगी वाढवून,

तसेच गोपीनाथ मुंडेच्या वैद्यनाथ सहकारी बँकेत
पत्नीला संचालक पदाचा बहुमान देऊन

     कोण ह्याच्या भानगडीत पडेल,
     पडेल त्याला तो नडेल,

ही भीती वाटली म्हणून,
सगळे बसले चुप्पी साधून.......!!!

Sunday, June 10, 2012

खासदारकीची जबाबदारी.........!!!


खासदारकीची जबाबदारी.........!!!

(ही नव्हे वात्रटिका......तर ही आहे मयुरटीका ..........ही आहे वास्तविका)
(समाजाच्या वास्तवाचे शब्दांकन)

खास (उघडले) दार खासदारकीचे
नव्या नवलाईच्या जबाबदारीचे

     लोकं मात्र थकली विचार करून करून
     सुरुवात केली सचिनने खासदारकीचा बंगला नाकारून

खासदारकीच्या सोयी-सुविधा नम्रपणे नको म्हणाला सचिन
मी आपला आपण हॉटेलातच राहीन

     अनेकांनी दिलेल्या सल्ल्यांवर नाराज झाला नाही सचिन
     राज्यसभेत विचार मांडण्याचे म्हणाला स्वातंत्र्य मी घेईन

विचार मांडण्याच्या प्रक्रियेतून सामाजिक विषयांना वाट करून देईन
त्याचबरोबर खेळ क्षेत्रातील विचारांना देखील राज्यसभेचे व्यासपीठ मिळवून देईन

     खासदारकीच्या जबाबदारीचे भान सदा ठेवीन
     अशाप्रकारे समाजाचे ऋण फेडीत राहीन..........!!!

Friday, June 8, 2012

पेपरफुटी















पेपरफुटी 

पेपरफुटी रोखणार कशी?
का करतात हे लोक स्वत: खुद्कुशी?

     जशी वर्ष सरत आहेत
     पेपरफुटीचे प्रकार वाढतच आहेत

कोण आहे ह्याला कारण
आहे आमच्यातच ह्याचे बीजारोपण

     कोण पैसे देतो, कोण पैसे घेतो,
     विद्यार्थ्यांचा मात्र खेळखंडोबा करतो,

वरपासून खालपर्यंत माजला आहे भ्रष्टाचार
पेपरफुटी हा काही नविन नाही आहे प्रकार.........!!!

अनगडवाणी