“टोल धाड” – १
मनसेची पडली,
“टोल” (वर) “धाड”
कोणी म्हणे हा
हल्ला आहे भ्याड !!
नाही लक्ष दिल
तर असेच चालू राहील
ह्यांच्याकडे मग
कोण बर पाहिल?
“टोल धाड” – २
टोलवाले म्हणती
आली “टोळधाड”
आंदोलकांना पोलीस
ठेवती
टोलच्या सीमे पल्याड
वरून आले आदेश
करू देऊ नका “टोल” शिवाय प्रवेश
पैसे जरी वसूल झाले
तरी भरीत रहा तुम्ही पैशाचे थैले
“टोल” वर “कमाई”
............चारोळी.......!!!
करोडो रुपये वसूल
झाले
तरीही चालू आहे टोलवाल्यांची
“वरकमाई”
कोणी ह्यांना रोखेल
का हो
की होईल ह्यांची “दिलजमाई?”
No comments:
Post a Comment