आग लागली आग.........!!!
(ही नव्हे
वात्रटिका, तर ही आहे मयुरटीका......ही आहे वास्तविका)
(समाजाचे वास्तव शब्दांकन)
आग लागली आग
त्यात महत्वाच्या
फायली झाल्या खाख
लोकांच्या
दर्शनासाठी फक्त
उरली त्यांची
राख........१
एक मंत्री म्हणे
हे झाले नैसर्गिक आपत्तीमुळे
काय हो समजतात हे आम्हाला
आम्ही आहोत का हो खुळे ?............२
स्वत:ची चामडी
वाचविताना
उदाहरणादाखल देतात
काहीही दाखले,
लव्हासा, आदर्श
प्रकरणांचे
तीन तेरा मात्र
वाजले की वाजवले?...........३
ज्याने राखावी माहिती
त्याचीच झाली फटफजिती
“आय टी” म्हणविना-या विभागाची
सगळी झाली माती ..............४
मंत्रालयातील ही आग
आहे अपघात की
घातपात?
यावरच चर्चा रंगली
सा-या उभ्या
जनमाणसात .........५
1 comment:
khare aahe agadi barobar aahe aapale mhanane....
Post a Comment