Saturday, February 15, 2020

शाहिर दत्ताराम ज्ञानदेव तोडकर

*_शाहिर दत्ताराम ज्ञानदेव तोडकर........एक उमदे व्यक्तीमत्व.... संपूर्ण रोमारोमात शाहिरी भरलेला अवलिया... आपल्या श्री सद्गुरू दरबार परिवारातील बाबांच्या वेळचे एक सक्रिय कार्यकर्ते._*

_आपली मिलमधील नोकरी सांभाळून, दरबारात सातत्याने येणे-जाणे करणारे व त्यातूनही आपला शाहिरीचा व्यासंग हृदयापासून जोपासणारे.......असे हे तोडकर भाऊ सर्वस्वांबरोबर खेळीमेळीने वावरायचे...... दरबारच्या कार्यात सहभागी असायचे._

*_त्यांची आपल्या श्री सद्गुरूंप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी होती.....त्यांची दरबारसंबंधीची आस्था निर्विवादपणे बोध घेण्यालायक होती...... आणि त्याच तळमळीतून, त्याच तन्मयतेने, त्याच सहृदयतेने, त्याच कळकळीने त्यांनी आपले मनोगत शब्दांशब्दांतून वेळोवेळी प्रगट केले...._*

_ते मनाने जसे श्री सद्गुरू माऊलींचे होऊन गेलेले होते, तसेच त्यांनी शाहिरी पेशाला देखील वाहून घेतले होते.... आणि त्याच पोटतिडकीतून, त्यांनी आपल्या बाबांचे गुणगान गायिण्यासाठी शाहिरी तालात, शाहिरी सुरांत एका पोवाड्याची निर्मिती केली होती, तो पोवाडा आपणां समस्तांसाठी पुढे सादर करु......_

_त्यांनी आपल्या भूतलावरील छोट्याशा आयुष्यात कांही कवणे निर्मिली..... त्यापैकी एक होते....._

 *_समर्थ गुण गायिण मी, जरी जाहला माझा अंत_*
             *_परि गात मरावे श्री सद्गुरू गीत_*
             
 *_महन मंगले माऊली गे भगवंता_*
 *_तुझ्या चरणाशी नीत लागो, माझे हे चित्त_*

*_अखंड गुण गायिण मी, जरी जाहला माझा अंत_*
             *_परि गात मरावे श्री सद्गुरू गीत_*

याचबरोबर त्यांनीच आपल्या शब्दांत लिहिल्याप्रमाणे त्यांच्या पुढील कवणाची दखल घेणे येथे ह्यावेळी संयुक्तिक ठरेल. ते आपल्या कवणांत म्हणतात......

*_पुण्यवान माता ती, महान सत्याची जननी_*
*_तिच्या पोटी जन्म घेतला, श्री समर्थ बाबांनी_*
*_अमर किर्ती तिची पसरली, सर्व जगतावरती_*
*_त्या मातेचे उपकार मोठे, आम्हां सर्वांवरती_*
*_पूर्व जन्माची पुण्याई अमुची, फळास हो आली_*
*_म्हणून भेटली आज आम्हांला, श्री सद्गुरू माऊली_*

असे हे आमचे वंदनीय, आंतून बाहेरुन निर्व्याज प्रेमाने ओतप्रोत भरलेले, आपल्या उतारवयात देखील आपले श्री सद्गुरू माऊलींचे उत्सव न चुकविणारे आमचे मार्गदर्शक 
गुरुबंधू शाहिर दत्ताराम ज्ञानदेव तोडकर, आज अनंतात विलीन झालेत. श्री सद्गुरू माऊली त्यांना आपल्या चरणाप्रत घेवोत हीच श्री सद्गुरू माऊली चरणी विनम्र प्रार्थना...........
*_अनगड_*


No comments:

अनगडवाणी