Monday, February 24, 2020
Monday, February 17, 2020
साधना
साधना या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. हे सत्य होय. यापैकी च एक म्हणजे *साधना* हा संधीयुक्त शब्द.
*साधन* + *अ* = साधना (यामध्ये न+अ जोडला की ना होतो)
आता आपण हे लक्षात घेतले पाहिजे की *अ* हा *_अनंतामधील अ_* असे समजूया व त्यांच्याप्रत जाण्याचे जे *_साधन_* आहे ते समजूया *_अनंतांचे नाम_* म्हणजेच जे आपण _अनंतांचे म्हणा, आपल्या श्री सद्गुरू माऊलींचे जे नाम_ घेत असतो, ते असते, त्या _अनंताप्रत किंवा श्री सद्गुरू माऊलींप्रत पोहचण्याचे साधन_ आणि ह्या दोहोंचा जेव्हा व्याकरणातील संधी तयार होतो, त्यावेळेस आपण त्या संधीला *_साधना_* ह्या नामाभिधानाने संबोधतो. _आहे की नाही गंमत._ याचाच अर्थ असा की *_साधना_* ह्याचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ अर्थ आहे *_अनंताप्रत जाण्याचे जे साधन आहे, ते आहे, त्यांचे नाम_* आणि हेच *_नाम_* आपण ज्यावेळेस सातत्याने घेत असतो, त्यावेळेस आपल्याकडून होते ते *_नामस्मरण._*
_अशाप्रकारे जर आपण *_साधना_* केली तर मग *_अनंत किंवा सद्गुरू माऊली आपणांपासून दूर राहू शकेल कां?_*
_म्हणून आपल्याला आयुष्यात काय "साधायचे" आहे हे ठरविणे, आणि ते प्राप्त होईपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच एका अर्थी साधना करने, हे आपले *_आद्य_* कर्तव्य ठरते._
*_अनगडाची ही बडबड,_*
*_आठवा मनोमनी सत्वर_*
*_कास धरुनीया नामाची_*
*_कापूया दोघांमधील अंतर_*
*_अंतराला देता अंतर_*
*_दिसो लागतील सद्गुरू चरण_*
*_चरणांत लिन होता_*
*_एकरुप होती सकलजण_*
*_द्वैत भाव मिटता ठायी_*
*_अद्वैत भाव जागे मनी_*
*_अनगडाचे चित्त लागे_*
*_सद्गुरु माऊलींच्या चरणी_*
*_सद्गुरु माऊलींच्या चरणी_*
Sunday, February 16, 2020
दर्शन
*_दर्शन_*
*जय राम श्री राम जय जय राम*
*रामापरते अन्य नाही नाम*
*नामातच भरला आहे राम*
*मनी जपा सदा रामची नाम*
*नाम जरी असले राम*
*वेगळा नाही तो घनश्याम*
*श्याम म्हणा अथवा म्हणा राम*
*अखेर अनंतांचे अनेकची नाम*
*नामापरते नाही कोणते साधन*
*पूर्णत्वास जाईल अनुसंधान*
*मनोमनी धरता जाण*
*राम श्यामचे घडेल दर्शन........*
......... *_अनगड_* ..........
Saturday, February 15, 2020
देवाचा देव....
*🙏🏻" देव "🙏🏻*
कीती पुजला देव तरी,
देव अजुन पावला नाही...
.....मनी नाही भाव
.....आणि म्हने देवा मला पाव.......
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||
......देव माझ्यातच आहे
......हे मजला कळलेच नाही
.....देव आपल्यातच आहे
.....हेच मला समजले नाही.....
मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला,
अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र,
कधी चोरामागे धावला नाही
कुठं राहतो कुणांस ठाऊक
अजुनपर्यंत घावला नाही...||१||
......देव जरी मीच असलो
......माझ्यातच देव वसला
......उगाच वेड्यापरी मी
......आस लावून बसलो देवाला
.......देव काही बाहेर नाही
.......देव आपल्यातच आहे वसलेला
.......संस्कार माझ्यावर झाले नाहीत
.......मी कवटाळले सैतानाला
सगळं काही तोच देतो,
तोच पुरवतो सगळ्यांची हौस...
शेतक़री बघतो आभाळांकडं,
मग गेला कुठं पाऊस...
.......पाऊस कुठं गेला नाही
.......हौसही माझी फिटत नाही
.......आभाळाकडं डोळे लावण्याऐवजी
.......कर्तव्यावर लक्ष देई
.......कर्म करने आपल्या हाती आहे
.......हातावर हात धरुन बसणे
.......आपला धर्म नाही
खुप केलं हरी हरी तरी,
मुखांत कधी मावला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही...||२||
.......खुप करुन हरी हरी
.......मुखांत तो मावणार नाही
.......मुखी फक्त नाम
.......कर्तव्यापासून लांब
.......अशाला तो पावणार नाही
.......अशाला तो घावणार नाही
कधी स्वत: राहून उपाशी,
भुक त्याची भागवली...
हा म्हणे नैवद्यावर थोडी,
साखर का नाही मागवली...
आहार त्याचा वाढतं गेला,
कधी एका बक-यावर भागला नाही...
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही...||३||
.........फक्त उपास तापास करून
.........देव काही घावणार नाही
.........नैवेद्यावर साखर चढवून
.........देव काही पावणार नाही
.........देव बकरा काही मागत नाही
.........देव कोंबडा काही मागत नाही
.........ही सारी थेरं करुन
.........देव काही पावणार नाही
........तुच आहेस देव
........तुला सोडून नाही देव
........बाहेर काही तो घावणार नाही
आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या...
........गाई असो किंवा माई
........कुणाला तो सोडून नाही
तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या...
पाप-पुण्याचा हीशोब कधी,
त्यानं दावला नाही...
.........पुण्य आणि पापाच्या घागरी
.........आपणच आपल्या भरीत असतो
.........पाप पुण्याचा हिशेब
........आपणच आपला घडवित असतो
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत मला घावला नाही...||४||
........कसा बरे सापडेल तो
........इथे तिथे भटकून
........मलाच माझी जाण नाही
........माझ्यातच आहे तो सामावून
कसे बरे सापडेल मला?
देव माझा मला सोडून
जाण नाही मजला तयाची
तोच आहे माझ्यात सामावून........
......अनगड म्हणे,
.......मी कोणी नाही
.......मी नाही संत
......घ्यावयाचा असेल मजला
.......अंत तयाचा
.......तर घ्यावा लागेल एकच मंत्र
........राम नाम घेता घेता
........करावे लागेल करतब (कर्तव्य)
*सौजन्य: संत गाडगे महाराज*
शाहिर दत्ताराम ज्ञानदेव तोडकर
*_शाहिर दत्ताराम ज्ञानदेव तोडकर........एक उमदे व्यक्तीमत्व.... संपूर्ण रोमारोमात शाहिरी भरलेला अवलिया... आपल्या श्री सद्गुरू दरबार परिवारातील बाबांच्या वेळचे एक सक्रिय कार्यकर्ते._*
_आपली मिलमधील नोकरी सांभाळून, दरबारात सातत्याने येणे-जाणे करणारे व त्यातूनही आपला शाहिरीचा व्यासंग हृदयापासून जोपासणारे.......असे हे तोडकर भाऊ सर्वस्वांबरोबर खेळीमेळीने वावरायचे...... दरबारच्या कार्यात सहभागी असायचे._
*_त्यांची आपल्या श्री सद्गुरूंप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी होती.....त्यांची दरबारसंबंधीची आस्था निर्विवादपणे बोध घेण्यालायक होती...... आणि त्याच तळमळीतून, त्याच तन्मयतेने, त्याच सहृदयतेने, त्याच कळकळीने त्यांनी आपले मनोगत शब्दांशब्दांतून वेळोवेळी प्रगट केले...._*
_ते मनाने जसे श्री सद्गुरू माऊलींचे होऊन गेलेले होते, तसेच त्यांनी शाहिरी पेशाला देखील वाहून घेतले होते.... आणि त्याच पोटतिडकीतून, त्यांनी आपल्या बाबांचे गुणगान गायिण्यासाठी शाहिरी तालात, शाहिरी सुरांत एका पोवाड्याची निर्मिती केली होती, तो पोवाडा आपणां समस्तांसाठी पुढे सादर करु......_
_त्यांनी आपल्या भूतलावरील छोट्याशा आयुष्यात कांही कवणे निर्मिली..... त्यापैकी एक होते....._
*_समर्थ गुण गायिण मी, जरी जाहला माझा अंत_*
*_परि गात मरावे श्री सद्गुरू गीत_*
*_महन मंगले माऊली गे भगवंता_*
*_तुझ्या चरणाशी नीत लागो, माझे हे चित्त_*
*_अखंड गुण गायिण मी, जरी जाहला माझा अंत_*
*_परि गात मरावे श्री सद्गुरू गीत_*
याचबरोबर त्यांनीच आपल्या शब्दांत लिहिल्याप्रमाणे त्यांच्या पुढील कवणाची दखल घेणे येथे ह्यावेळी संयुक्तिक ठरेल. ते आपल्या कवणांत म्हणतात......
*_पुण्यवान माता ती, महान सत्याची जननी_*
*_तिच्या पोटी जन्म घेतला, श्री समर्थ बाबांनी_*
*_अमर किर्ती तिची पसरली, सर्व जगतावरती_*
*_त्या मातेचे उपकार मोठे, आम्हां सर्वांवरती_*
*_पूर्व जन्माची पुण्याई अमुची, फळास हो आली_*
*_म्हणून भेटली आज आम्हांला, श्री सद्गुरू माऊली_*
असे हे आमचे वंदनीय, आंतून बाहेरुन निर्व्याज प्रेमाने ओतप्रोत भरलेले, आपल्या उतारवयात देखील आपले श्री सद्गुरू माऊलींचे उत्सव न चुकविणारे आमचे मार्गदर्शक
गुरुबंधू शाहिर दत्ताराम ज्ञानदेव तोडकर, आज अनंतात विलीन झालेत. श्री सद्गुरू माऊली त्यांना आपल्या चरणाप्रत घेवोत हीच श्री सद्गुरू माऊली चरणी विनम्र प्रार्थना...........
*_अनगड_*
भाग्यवान आम्ही......
*_खरोखरच आपण आणि आपली पिढी ही खूप खूप भाग्यवान आहे, कारण आपणांस आपले सद्गुरू लाभले._*
*_इतकेच नव्हे तर आपल्या श्री सद्गुरू माऊलीने ह्याच वेळेस आणि काळात आपले सव्विसावे अवतारकार्य संपन्न करून आणि आपणा समस्त बंधु-भगिनींस आपल्या जवळ घेऊन, आपले नाम देऊन त्यांच्या प्रत जाण्याचा मार्ग प्रवचन रुपाने समजावून सांगून उपकृत केले._*
_खरोखरच आपण भाग्यवान नाही कां?_
*_उजळले भाग्य अमुचे,_*
*_उजळल्या अमुच्या ज्योती_*
*_चरणी घेता सामाऊनी_*
*_मनी गवसले मोती_*
*_मोतीयांचा हार करुनी_*
*_घातला तो गळा_*
*_सद्गुरु प्रसन्न होता_*
*_लाविला नामाचा हो टिळा_*
*_टिळा लाविता नामाचा_*
*_प्रकाश पसरे सारा_*
*_प्रकाशाच्या कल्लोळात_*
*_नजारा दिसे तो न्यारा_*
*_हरवूनी जातो मीपणा त्यात_*
*_उरतो फक्त ओंकार_*
*_ओंकार ध्वनी आळविता_*
*_एकलय होतो अपार_*
*_अनगडाची ही दुनिया सारी_*
*_ज्यास कुणा ती सापडे_*
*_कधीच मागे फिरून न पाही_*
*_लागे मनापासोनी ती आवडे_*
Subscribe to:
Posts (Atom)
-
👏👏👏 *चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली बाबा जेव्हा म्हणतात चारही म...
-
*प. पू. श्री सद्गुरु स्वामी* *भगवान महाराज यांची* *अमृतवाणी* *सदा सर्वदा योग तुझा घडावा ।* *तुझे कारणी देह मा...
-
👏🙏👏 येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे. *अवघाची संसार सुखाचा करीन* *आनंदे भरीन तिन्ही लोक* *जाईन गे मा...