Saturday, September 29, 2018

*समर्थ तेच, तेच सद्गुरू*

👏🙏👏

आजच्या प्रवचनातील विशेष बाब म्हणजे - बाबा म्हणतात,
*समर्थ तेच, तेच सद्गुरू*
भुलू नका, चुकू नका. सर्व काही करणारे, तेच समर्थ !
पुढे बाबा असेही म्हणतात," *पण (समर्थ) मी त्यातला नाहीच म्हणणार.*" हे आपण लक्षात घ्यावयास हवे.
पुढे बाबा म्हणतात, *समर्थ कसे असतात? तर स्थिर असतात.*

आता हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, *त्यांच्यात त्रिगुणात्मक नटविले, ते (त्रिगुण) - (समर्थ म्हणा, सद्गुरू म्हणा, किंवा अनंत म्हणा) हुकुमाशिवाय (या जगताचे कार्य) करीत नाही.*

आणि म्हणूनच बाबा म्हणतात, *करून अकर्ते असे ते सत् पद आहे.*

*हे नामस्मरण अत्यंत उच्च व श्रेष्ठ प्रतीचे आहे.* हे साधे आणि सुलभ देखील आहे. दुनियेच्या उचापती म्हणा, उठाठेवी म्हणा करण्यापेक्षा *नामस्मरण* करा.

बरे ते कसे करा, *तर एका तत्वावर दृढभाव ठेवून* म्हणजेच आपण आपल्या सद्गुरूंवर पुर्णत्वाने विश्वास ठेऊन, आपला जो मनामध्ये भाव आहे तो डळमळीत न ठेवता, अढळ भक्तीभावाने ते करा. इतकेच नव्हे तर *नामस्मरण* करताना आपल्या मायावी स्थितीचे विस्मरण होऊ द्या, मग ते घरदार का असेना?

*एका तत्वावर दृढभाव ठेवून, त्या गतीवर नामस्मरण करा.*

बाबा आपणा सर्वांस्वांना आठवण करून देताना म्हणतात, *आपण माया म्हणजे परब्रह्म मानतो.* परंतु हे खरे नाही. बाबा विचारणा करतात, *जर स्थूल आपले नाही,  तर माया आपली कशी म्हणावी?*

पण पुढे बाबा असेही म्हणतात, *माया रहीत तिन्ही जगाचा (स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताळ लोक) स्वामी अर्थात भगवंतही नाही.* हे असे का म्हणतात बाबा? कारण, भगवंत म्हणा किंवा सत् म्हणा यांची जी माया आहे, ती माया कोणती? तर ती *सत माया*

बाबांनीच म्हटल्याप्रमाणे, माया ही दोन प्रकारची असते - एक म्हणजे *सत माया* आणि दुसरी *असत माया.* म्हणून सद्गुरूंची म्हणा, भगवंताची म्हणा जी माया असते, ती सत माया.

*माया* मग ती कोणतीही असो. ती सताच्या चरणांची दास आहे.

संत म्हणतात, *एक तत्व नाम, दृढ: धरी मना ।*

*नामस्मरण कोठेही करा* नामस्मरणाला स्थळकाळाचे बंधन नाही.

👏💐🙏👏💐🙏👏💐🙏

वृत्ती शुद्ध असेल तर

💐👏💐

वृत्ती शुद्ध असेल तर
मन स्थिर राहिल
वृत्ती निर्भीड असेल तर
मनावर ताबा राहिल
वृत्ती शुद्ध असेल तर
कानानेही शुद्ध ऐकाल
वृत्ती शुद्ध असेल तर
मन शुद्ध राहिल.

वृत्तीच्या ठेवणीने पडदा फाकला जातो.

मन सूक्ष्माला सोडून नाही आणि सूक्ष्म ज्योतीला सोडून नाही.

*वृत्ती त्रिकुटाच्या अधिन असते. वृत्ती शुद्ध असली तरच त्रिकुटी स्थिर राहते. त्रिकुटी स्थिर झाली तरच मन स्थिर होते आणि ज्यावेळेस मन स्थिर होते, तेव्हाच आपण आपल्या श्री सद्गुरू माऊलींना म्हणजेच भगवंताला पाहू शकतो.*

*प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

काव्य



# *सद्गुरू सारीखा नसे कुणी दुजा,*

# *सद्गुरू सारीखा नसे कुणी दुजा,*
*समस्त प्राणीजात त्यांच्यासमोर असतो खुजा* #

*सद्गुरूंच्या मनी येता अभिलाषा*
*अपुल्या भक्तांची ते, पुरवतील आशा*

*कोण घेणार मग भक्तांची परीक्षा*
*त्यानांच घ्यावी लागेल, सद्गुरूंची दिक्षा*

*नतमस्तक होता, सद्गुरूंच्या पुढे*
*लयाला जातील पापे, नाही घेणार ते आढेवेढे*

*अनगड म्हणे बा सद्गुरू नाथा*
*तुझ्याच चरणी ठेवितो मी माथा*

*माफ करा समस्त अज्ञ जीवा*
*घडू द्या अमुच्याकडून, अपुल्या चरणांची सेवा*

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

*स्थुल रूप आणि सूक्ष्म रूप*

👏👏👏

*स्थुल रूप आणि सूक्ष्म रूप*

"त्याचप्रकारे संपूर्ण विश्वात व्याप्त असलेला परिपूर्ण परमात्मा म्हणजेच *आकार* आणि तोच परिपूर्ण परमात्मा जेव्हा सूक्ष्म रूपात भेटतो तेव्हा तो *निराकार* स्वरूपात असतो. तसेच सूक्ष्म, अतिसूक्ष्म - अणू, रेणू, परमाणू यामध्ये असूनही अलिप्त असणारे तत्व देखील हेच *निराकार* तत्व होय. अर्थात आपले सद्गुरू परब्रह्म तत्व होय.

आपण *आकारातून* *निराकारात* कधी जाऊ शकतो?

जेव्हा आपण आपल्यातील *स्वः* ला विसरून *नामस्मरण* करीतो तेव्हाच.

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

Tuesday, September 18, 2018

तुकोबांचे अभंग

🙏👏💐🙏👏💐🙏👏💐🙏

*आतां माझ्या भावा ।*
   *अंतराय नको देवा ॥1॥*

येथे तुकाराम महाराज म्हणतात, "आता माझ्या भावा" म्हणजे माझी जी भगवंता तुझ्याप्रत भावना आहे, ती तशीच तुझ्याप्रत प्रेमाची राहू दे. तिच्यात अंतर पडू देऊ नकोस. ती अधिकाधीक वृद्धींगत होऊ दे.

*आलें भागा तें करितों ।*
    *तुझें नाम उच्चारितों ॥2॥*

पुढे ते म्हणतात,"जे माझ्या भाग्यात आले ते मी करीत राहीन, ते म्हणजे सदासदैव तुझेच नाम उच्चारीत राहीन. तुझ्या नामाचा मला विसर पडू देऊ नकोस, हीच तुझीया चरणी नम्र विनंती.

*दृढ माझें मन।*
     *येथें राखावें बांधोन ॥3॥*

त्यासाठी माझे हे उच्छृंखल मन आहे, जे सदानकदा इथे तिथे भरकटत असते, त्याला तुच तुझ्या शक्तीने तुझ्याच चरण कमलाशी असे बांधोनी ठेव की त्याला इकडे तिकडे धावता येणार नाही.

*तुका म्हणे वाटे ।*
   *नको फुटों देऊं फांटे॥4॥*

शेवटी तुकोबा राय म्हणतात,"हा भक्तीमार्ग अनुसरताना माझ्या मनात शुद्ध भाव निर्माण कर. त्यात तर्क वितर्कांचे फाटे फुटू देऊ नकोस. सदोदित माझे मन आपल्या चरणांवर रत राहू दे."

........................अनगड बुवा.............................

🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

सतवचने

🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

बाबा म्हणतात, *"आजकाल सेवेकरी का फसतात?*
बाबाच पुढे उत्तर देतात, *"कारण सेवेकरी आपले कान हलके ठेवतात* *शक्तीशी तुल्यबळता करतात*

बाबा पुढे म्हणतात, *सद्गुरू ज्या सान्निध्यात आहेत त्याठिकाणी अपयश येणे शक्य नाही.*

*तत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ*

*भगवंत उपासना सोडून दैवत उपासक बनू नका.*

*भक्ती आपुलकीने करा, प्रेमाने करा.*

🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

*अनन्य चिन्तयन्तो माम, ये जनः पर्युपासते,*

🙏💐🙏👏🙏💐🙏👏🙏

*अनन्य चिन्तयन्तो माम, ये जनः पर्युपासते,*
*तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्*
............... *श्री भगवत गीता* .............

जे निष्काम व पूर्ण ज्ञानी आहे व *जे अनन्य भावयुक्त मला आत्मरूपाने जाणतात व माझे निरंतर चिन्तन करतात, स्मरण करतात* व सर्व उपासनेत श्रेष्ठ अशी निष्काम उपासना करतात, अशा माझ्या त्या परमार्थ ज्ञानी भक्तांचा *योगक्षेम* मी चालवितो. *अप्राप्य वस्तूची प्राप्ती येणे नाम योग व प्राप्य वस्तूचे रक्षण येणे नाम क्षेम होय.*  *योग आणि क्षेम* ही दोन्ही कामें मी स्वतः करीत असतो, असे श्रीकृष्ण म्हणतात. ह्याचे कारण ज्ञानीयाला मी माझ्या आत्मास्वरूपा सारखाच आहे आणि ते मला प्रिय असल्यामुळें असे भक्त माझ्या आत्मरूपा सारखेच आहेत.

तद्वतच ह्या भक्तांव्यतिरिक्त इतर भक्तांचे योगक्षेमही भगवंतच चालवित असतात. परंतु ह्यामध्ये एक भेद आहे तो म्हणजे काही भक्त आहेत ते असे समजतात की त्यांचा योगक्षेम ते स्वतःच चालवितात. परंतु जे अनन्य साधारण भक्त आहेत ते असे म्हणत नाहीत. कारण ते *जीवन आणि मरण* ह्या वासनेत लिप्त होऊन राहत नाहीत. अशांचा योगक्षेमही भगवंतच करीत असतो.
🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

सतवचने

👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏

बाबा म्हणतात, *सुसंगत म्हणजे सज्जनांची संगत असेल तर चांगलीच वाक्ये आपल्या कानी पडणार.* 

*विचाराने वागतात ते सुजन किंवा सज्जन. ते अगदी शांत असतात. त्यांचे वागणे व विचार देखील चांगले असतात.*

*पवित्र विचार व वासना ठेवणारा स्वतः पवित्र असतो.*

*सत् पद हे नेहमी निर्भिड असते.*

*मनाची ठेवण पवित्र असेल तर भावना शुद्ध असेल तरच तो सत् बनेल.*

*अनीतीने जाणारी ज्योत नेहमी कमी दर्जाची असते.*

*नीतिमत्तेने जाणा-या भक्ताचे कधीही अकल्याण होणार नाही.*

*सद्गुरू बंधुत्वाचे नाते हे उच्च दर्जाचे आहे.*

*गुरूबंधु आणि भगिनी यांचे नाते फार श्रेष्ठ आहे. याच्या विरूद्ध जाणारी ज्योत महत् पापी होय.*

👏 *परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज* 👏

🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏

Monday, September 10, 2018

सत वचने

👏🌷👏

*卐卐||ॐ प.पूज्य श्री भगवान महाराज परिवार ||卐卐*

*|| जय श्री सद्गुरू माऊली ||*

👏 सद्गुरू माऊलींचे वर्णन अवर्णनीय 👏

सद्गुरू माऊलीचा सहवास लाभणे हे दुरापास्तच. पण तो जर का आपल्याला लाभला तर तो टिकविणे फारच आवश्यक असते. त्यासाठी शाब्दिक कसरती न करता, मनोभावे, मनोमन शरण जाऊन त्यांनाच विनंती करावी की *हे भगवंता ! हे दयाघना मला आपण आपल्या चरणांशी तर घेतले आहेच, तरी ते तसेच अबाधित ठेवा व मला आपल्या सेवेत व नामात सतत राहू द्यात.*

सद्गुरूंचे मनापासून होऊन रहावे आणि त्यांनी दिलेले नाम सतत घ्यावे.

👏🌷👏🌷👏🌷👏🌷👏

सत वचने

👏🌷👏

*प.पूज्य भगवान महाराज परिवार*

*卐卐 || जय श्री सद्गुरू माऊली || 卐卐*

श्री सद्गुरू सांगतात, *"माझी इच्छा मी नाहीशी केली आणि भगवत इच्छेने सर्व होते ही जाण ठेवली तर मनाला स्वास्थ्य लाभेल आणि आनंदाची प्राप्ती होईल."*

*कर्तेपणाचा अभिमान सोडल्याने, हव्यास टाकल्याने मनाला स्वास्थ्य लाभते.*

*होते ते सर्व भगवंताच्या इच्छेनेच होते हे मनाने पक्के ठरविल्यावर मग काळजीचे कारणच उरत नाही.*

सद्गुरू सांगतात, *"सतत भगवंताच्या नामात राहून देहाचे विस्मरण होऊ द्या.*

*भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली असता भगवंत भेटतो.*

*भगवंताचे नाम कधीही सोडू नये.*

*आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेनेच चालतो ही जाणीव सतत आपल्या मनाजवळ ठेवावी आणि जगात वावरावे आणि वागावे.*

*जगात शाश्वत सत्य एकच आहे, ते म्हणजे नाम*

*नामात राहिल्यानेच मुक्ती लाभेल*

*मुक्ती आणि मोक्ष म्हणजे काय?*
मुक्ती आणि मोक्ष म्हणजे आपल्या सद्गुरू माऊलींचे चरण प्राप्त होणे येणे नाम मुक्ती आणि मोक्ष. एवढेच नव्हे तर ते चरण प्राप्त झाल्यानंतर नामस्मरणाच्या गतीने जाऊन ते टिकविणे येणे नाम मुक्ती आणि मोक्ष.

*सत्संगांमध्ये आपल्याला आपले दोष कळतात आणि चित्त शुद्ध होण्यास मदत होते.*

👏🌷👏💐👏🌷👏💐👏

सत वचने

👏👏👏

...म्हणून समर्थ सांगतात *"माझा जो सेवेकरी आहे, त्याने कोणत्याही त-हेची काळजी वाहू नये. त्यांचा मी त्राता आहे.* 
*सद्गुरू मारक नसून तारक असतात.*

*नारायणाचा नारायण - अशा तत्वाचे आपण सेवेकरी आहात* - 

आपण कसे असावयास पाहिजे? तर *नीतीने परिपूर्ण असणारे, शुद्ध विचार, आचार व भावना पाहिजे.*

*मी तुमच्यातलीच एक ज्योत आहे* पण त्या बाहेर जर काही आतबाहेर झाले तर *दोषात्मक* आहे. त्यांचे संधान परमेश्वराशी आहे. ते सर्व व्यापक असणारे तत्व चालू देणार नाही.

🌷👏🌷👏🌷👏🌷👏🌷

अनगडवाणी