Friday, August 23, 2013

गाव माझा, मी गावाचा.......!!!

गाव माझा, मी गावाचा, कोकण माझा देश,
फणसा सारखा काटेरी वरून, हाच असे माझा परिवेश.......!!!

आतून गरे बाहेर पडता, रसाळ म्हणा किंवा बरका कापा,
विसरतो मी माझ्या रागाचा अभिनिवेश.....!!!

काय वर्णावी गोडी ती आंब्याची, असे तो देवगड रत्नागिरीचा,
सारे त्याची वाहव्वा करिती, देश असो वा परदेश.....!!!

रस्ते जरी असले कोकणातले, नागमोडी वळणाचे,

माणसे मात्र कोकणी, करिती हृदयात प्रवेश.....!!!

उडविली त्यांची टोपी...!!!!

कांदा येतो आहे जाग्यावर,
रुपया जातो आहे झोपी,
त्रस्त झाली सारी जनता,

त्याने उडविली त्यांची टोपी...!!!!

Sunday, August 18, 2013

आम्ही शांततेचे पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
नाही करणार दुनियादारी,
आम्ही शांततेचे पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
जरी आणलीत तुम्ही दुधारी,
आम्ही शांततेचे पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
जरी कापलात माना भारी,
आम्ही शांततेचेच पुजारी.........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
मौनाची केली आम्ही तयारी,
आम्ही शांततेचे पुजारी..........!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
घेरलात जरी दिशा चारी,
आम्ही अपुले शांततेचे पुजारी.....!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
हल्ला केलात अमुच्या वरी,
तरी आम्ही शांततेचेच पुजारी....!!!

आम्ही शांततेचे पुजारी,
कत्तल केली अमुच्या दारी,
तरी आम्ही अपुले शांततेचेच पुजारी......!!!



Wednesday, August 7, 2013

सांग सांग भोलानाथ......!!!

(भोलानाथांची आणि कवीची माफी मागून खालील विडंबन गीत सादर करीत आहे)

सांग सांग भोलानाथ,
खड्डे पडतील काय?
खड्ड्यांमध्ये जावून माझी
गाडी फसेल काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!

सांग सांग भोलानाथ,
रस्ते उखडतील काय?
रस्त्यांमधून चालताना,
त्यात माणसे पडतील काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!

सांग सांग भोलानाथ,
खाच-खळगे होतील काय?
खाच-खळगे पार करतांना,
नाकी नऊ येतील काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!


...............मयुर तोंडवळकर-(०७-०८-२०१३)

Friday, August 2, 2013

कुठे ती दुर्गा........!!!

कुठे ती दुर्गा,
कुठे कुणाची वाचाळता,
एकीचे कार्य मोठे,
तर एकीची गचाळता.........!
एकीने घेतली नाराजी,
लोकांचे कार्य करताना,
तर एकीने घेतली नाराजी,
नको ते बोलताना...........!!
अस्मितेचा प्रश्न असे हा,
मराठी आणि महाराष्ट्राचा,
म्हणून सगळ्यांनी सावध रहावे,

वाचाळता करताना............!!!

अनगडवाणी