(भोलानाथांची आणि कवीची माफी मागून खालील विडंबन गीत सादर
करीत आहे)
सांग सांग भोलानाथ,
खड्डे पडतील काय?
खड्ड्यांमध्ये जावून माझी
गाडी फसेल काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!
सांग सांग भोलानाथ,
रस्ते उखडतील काय?
रस्त्यांमधून चालताना,
त्यात माणसे पडतील काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!
सांग सांग भोलानाथ,
खाच-खळगे होतील काय?
खाच-खळगे पार करतांना,
नाकी नऊ येतील काय?
सांग सांग भोलानाथ S S S S..........!!!
...............मयुर तोंडवळकर-(०७-०८-२०१३)
No comments:
Post a Comment