गाव माझा, मी गावाचा, कोकण
माझा देश,
फणसा सारखा काटेरी वरून, हाच
असे माझा परिवेश.......!!!
आतून गरे बाहेर पडता, रसाळ
म्हणा किंवा बरका कापा,
विसरतो मी माझ्या रागाचा
अभिनिवेश.....!!!
काय वर्णावी गोडी ती
आंब्याची, असे तो देवगड रत्नागिरीचा,
सारे त्याची वाहव्वा करिती,
देश असो वा परदेश.....!!!
रस्ते जरी असले कोकणातले,
नागमोडी वळणाचे,
माणसे मात्र कोकणी, करिती हृदयात
प्रवेश.....!!!
No comments:
Post a Comment