येरे येरे पावसा........!!!
नव्या संदर्भात
येरे येरे पावसा
तुला देतो डॉलर
डॉलर झाला मोठा
रुपया झाला छोटा
येरे येरे पावसा
तुला देतो डॉलर
डॉलर झाला मोठा
रुपया ठरला खोटा
येरे येरे पावसा
तुला देतो डॉलर
डॉलर झाला मोठा
खर्चाला नाही तोटा
येरे येरे पावसा
तुला देतो डॉलर
डॉलर झाला मोठा
पावसाला नाही तोटा
रुपयाचे झाले
अवमूल्यन
डॉलरचे झाले
मूल्यवर्धन
पाऊस म्हणतो, तुझा
रुपया
कां बरे मी घेऊ
तारण?
पावसाचे म्हणणे –
म्हणून मी येत नाही
म्हणून मी घेत नाही
त्यामुळे –
रुपयाची झाली कोंडी
लागली त्याला उतरंडी
रुपयाने घेतली
पाण्यात उडी
माणसांसाठी ठरली
जगबुडी
रुपया गेला तळाला
डॉलर मात्र वधारला.......
No comments:
Post a Comment