Tuesday, May 1, 2012

राज्यसभेचे जंतर-मंतर.........!!! मयुरटीका ..........हि नव्हे वात्रटिका ........तर हि आहे वास्तविका.......!!!




राज्यसभेचे जंतर-मंतर

राज्यसभा आहे
सभागृह श्रेष्ठांचे
वडिलकीच्या भूमिकेतून
मार्गदर्शन हवे आहे जेष्ठांचे

धीरगंभीर भाषणांमधून सरकारला
     मौलिक सूचना कराव्यात
अशा आशा नविन पिढीने
     नाही कां धराव्यात?

परंतु असे काही होताना येथे
     दिसत तर नाही
उलटपक्षी सभागृहाचे स्वरूप
     शुष्क वाळवंटासारखे होई 

जया बच्चनने राज्यसभा सदत्वाची
     पुन्हा शपथ घेतली
मुलायमसिंगानी अमरसिंगांच्या नाकावर टिच्चून
     तिला राज्यसभेत पाठविली

पत्रकारांशी बोलताना ती
     आता मोजकीच विधाने करते
काँग्रेसवाले आणि सोनिया समोर दिसली की
     तिचे मस्तकच भडकते 

काँग्रेसवाले महाचतुर,
त्यांनी खेळली एक खेळी
जया बच्चनला चिडविण्यासाठी
त्यांनी रेखाला सभागृहात आणले

राज्यसभेत दोघी जेव्हा
     समोरा-समोर येतील
बहुधा त्याचवेळेला
     सिलसिला २ सुरु होईल........२ सुरु होईल !!!

No comments:

अनगडवाणी