Saturday, April 28, 2012

खासदार सचिन .........!!! मयुरटीका .......!! हि नव्हे वात्रटिका....तर हि आहे वास्तविका......!!!




खासदार सचिन

सचिन तेंडूलकर
भारत रत्न आहे
की आहे
भारताची शान

ह्याचे स्पष्टीकरण
झाले नसताना
दिला त्याला
खासदारकीचा मान

खासदारकीचा मान मिळाला
राजकीय पक्षांचा तिळपापड झाला
सचिन काही बोलण्याअगोदरच
सगळीकडे त्याचा बोलबाला झाला..........


Friday, April 27, 2012

‘लेक टॅपिंग’चा प्रयोग.........!!! मयुरटीका .......वास्तविका....!!!




‘लेक टॅपिंग’चा प्रयोग

कोयना धरण
आहे महाराष्ट्राची शान
उद्योग आणि शेतीसाठी
ठरले आहे वरदान

वीजेची भासली
महाराष्ट्राला चणचण
‘लेक टॅपिंग’चा प्रयोग करून
मिटविली लोकांची वणवण

कोयनेत केला
जलकम्पाचा थरार
‘लेक टॅपिंग’चा प्रयोग
केला यशस्वीपणे पार........

Wednesday, April 25, 2012

अग्निची अग्निपरीक्षा........!!! हि नव्हे वात्रटिका ........तर हि आहे मयुरटीका .....हि आहे वास्तविका......!!!




अग्निची अग्निपरीक्षा

अग्निची झाली अग्निपरीक्षा
ओलांडली ५००० की.मी.ची कक्षा

अग्नि हवेत काय झेपावले
सारे जगतच थरारले

अर्धे जग मार्र्याच्या टप्प्यात आले
पाकिस्थान सकट चीन सुद्धा गडबडले

भारत देश झाला महाशक्तिमान
माझा भारत देश महान.......!!!
माझा भारत देश महान.......!!!   

Tuesday, April 24, 2012

ग्लोबल भरारी.......!!! मयुरटीका .......हि नव्हे वात्रटिका.....तर हि आहे वास्तविका .......!!! (समाजाचे वास्तव शब्दांकन)

ग्लोबल भरारी.......!!!

आय टी आयच्या मुलांनी
घेतली ग्लोबल भरारी,
तीन वर्षात २८३ जणांना
ऑस्ट्रेलियात मिळाली नोकरी.......

दहावीत अपेक्षेपेक्षा टक्के मिळाले कमी,
म्हणून इंजिनिअरिंगला नाही मिळाली हमी,
जरी इंजिनिअरिंगला प्रवेश नाही मिळाला,
जागतिक स्तरावर मात्र ‘ब्ल्यु कॉलर’ वाला जाहला.....!!!

Sunday, April 22, 2012

पराभवाचा वचपा......!!!........मयुरटीका......वास्तविका.......!!!

पराभवाचा वचपा......!!!

मुंबई ठाण्यात
कॉंग्रेसचा पराभव झाला,
जिल्हापरिषद निवडणुकांत
राष्ट्रवादीने झेंडा फडकाविला.......

भिवंडी, चंद्रपूर, मालेगावात
कॉंग्रेसने पहिला क्रमांक मिळवला,
लातूरमध्ये दोन तृतीयांश बहुमत घेवून
अगोदरच्या पराभवाचा वचपा काढला......!!!

Friday, April 20, 2012

एन सी टी सी .......!!! ही नव्हे वात्रटिका......तर ही आहे वास्तविका ......!!! (समाजाचे वास्तव शब्दांकन)




एन सी टी सी

एन सी टी सी विरोधात
विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री एकवटले,
मोदी, पटनाईक, जयललिता
एकमेकांना भेटले.......

दहशतवाद विरोधात त्यांनी,
सरकारला धारेवर धरले,
‘चिदम्बरांचे’ सुरक्षेवरील विवेचन
त्यांना अजिबात नाही रुचले.......!!!

Sunday, April 15, 2012

६०० रुपयात जगायचे कसे आणि ६०० रुपयात मरायचे कसे?.....!!!


६०० रुपयात जगायचे कसे आणि ६०० रुपयात मरायचे कसे?
मयुरटीका .........!!! वास्तविका.........!!!

६०० रुपयात ना जगू शकत,
६०० रुपयात ना मरू शकत,
जगायचे असेल तर खर्च १५०० लागतो,
मरायचे असेल तर खर्च १८०० रुपये येतो.

सामान्यांनी करायचे काय?
त्रिशंकू सारखे लटकायचे हाय,
हातात नाही त्यांच्या काही उपाय,
त्यासाठी करावे काय? – डू ऑर डाय.

कोठून आणले हे २८-३० रुपयांचे फॅड,
लोकं म्हणतात सरकार झाले आहे मॅड,
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष कोण देतो?
न्यायालयाला मात्र प्रश्न हा पडतो.

म्हणून न्यायालयाने प्रश्न हा केला,
सामान्य माणसाने ६०० रुपयात जगायचे कसे बोला?
न्यायलायाने केला न्यायिक सवाल,
सरकार दफ्तरी मात्र माजला मोठा बवाल.

मयुरटीका........मीटर डाऊन........!!! ही नव्हे वात्रटिका........तर ही आहे मयुरटीका.....!!!



आज काय तर मीटर डाऊन
उद्या काय तर शटर डाऊन

आम्ही करायचे तर करायचे काय?
आम्ही यांचे धरायचे काय पाय?

उन्मत नका होऊ
मुजोर नका होऊ

एक दिवस असा येईल,
सगळे चिडले की मग उत्तर देऊ ...........!!!

मयुर तोंडवळकर ...........9869704882

Friday, April 13, 2012

भूकंप....मयुरटीका....!!! ही नव्हे वात्रटिका......तर ही आहे वास्तविका .....!!! (समाजाचे वास्तव शब्दान्कन ....!!!


भूकंप


भूकंप काय जाहला,
सारा इंडोनेशिया हादरला,
त्सुनामीच्या भीतीने,
जगभरातील मानव शहारला.....!!

भूकंपाचा भयकंप,
उडविल सगळ्यांचा थरकंप,
त्सुनामीची लाट,
लावील सगळ्यांची वाट........!!

असे घडेल आक्रीत,
घडेल एका रात्रीत,
सगळ्यांचा जीव टांगणीला,
असे केले होते भाकीत........!!

अनगडवाणी