Saturday, March 31, 2012
Thursday, March 29, 2012
काय आहे हे हवाला रॅकेट ......!!!
काय आहे हे हवाला रॅकेट ......!!!
“ए” ला पाठवायचे आहेत “बी” कडे पैसे,
हवाला ऑपरेटर त्यामध्ये असे,
ऑपरेटर मग आपल्या कॉनटॅक्टला फोन करीतसे,
“बी” चे नाव/गाव/पत्ता देत असे,
हा सोपस्कार पूर्ण झाल्यावर
“ए” व “बी” ला कोड मिळत असे,
ज्यावेळेला फोनवर “ए” व “बी” चा कोड जुळत असे,
त्याचवेळेला “बी” ला मिळत असत पैसे
“हवाला रॅकेट” ह्यालाच म्हणत असे.........!!!
मयुर तोंडवळकर .............9869704882
Wednesday, March 28, 2012
यश.......!!!
यश
यश हे शेवटी यशच असत,
यशासारख दुसर काहीही नसत......!!
अपयश ही यशाची पहिली पायरी असत,
अपयशाच्या पायरीच अपयश रीचवायचं असत.....!!
अशा अनेक अपयशातून पुढे पुढे सरकायच असत,
सरकत सरकत यश पदरात पाडून घ्यायचं असत.....!!
अपयशाने माघारी न फिरता, नव्या उमेदीन पुढे चालायचं असत,
प्रयत्नांती परमेश्वर न म्हणता, प्रयत्नांनी यशस्वी व्हायचं असत.....!!
अनेक अपयश पचवता पचवता, एक यश गाठायचं असत,
यश मिळवून झाल असता, जीवनाच सार्थक झाल अस म्हणायचं असत.....!!
यश हे शेवटी यशच असत,
यशासारख दुसर काहीही नसत......!!
मयुर तोंडवळकर .............9869704882
Saturday, March 24, 2012
प्रेम हे प्रेम असतं.......!!!
प्रेम हे प्रेम असतं.......!!!
प्रेम हे प्रेम असतं,
दिल्या घेतल्याचं काही नसतं......
अंतरंगात न्हाऊन निघतं,
तेच मुळात खरं प्रेम असतं......!!१!!
प्रेमाला नसते कसलीही जात,
प्रेमाला नसते विशेषणांची पात.....
तरीही होतात प्रेमामध्ये अपघात,
कारण प्रेम हे शेवटी प्रेम असतं....!!२!!
प्रेम हे आईच असतं,
तसेच प्रेम हे ताईच देखील असतं.....
प्रेम हे भाईच असतं,
तसेच प्रेम हे सईच देखील असतं......!!३!!
कधी कधी प्रेमाच काही खर नसतं,
कधी कधी प्रेम हे आंधळ देखील असतं.....
कधी कधी ते चांगल असतं.
तर कधी कधी ते टांगलं देखील जातं,
शेवटी प्रेम हे प्रेम असतं......!!४!!
मयुर तोंडवळकर – 9869704882
ह्याच विषयावरील प्राणीमात्रांचे प्रेम पाहण्यासारखे आहे........त्यासाठी खालील लिंकवर क्लिक केल्यास आपणास प्रेम हे प्रेम असत, कावळ्यांच देखील सेम असत.......हा विडीओ पाहता येईल....................
http://www.youtube.com/watch?v=k3Kg26ApNjQ&context=C35c5a20ADOEgsToPDskL22TM1QkhgkPWDFBzqO3SA
Tuesday, March 20, 2012
चिऊताई चिऊताई दार उघड........!!!
चिऊताई चिऊताई दार उघड........!!!
खालील प्रसंग हे सद्य: स्थिती/काळामध्ये घडत आहेत असे गृहीत धरून त्यावर माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
चिऊताई चिऊताई दार उघड.......मध्ये कावळे दादा ज्यावेळेस चिऊ ताईच्या घरी येतात व दार उघडण्यास सांगतात त्यावेळेस चिऊताई हि हरातच असते. ती झोपलेलीही नसते. तिच्या मनात आलेले विचार हे खालील प्रमाणे असावेत ---
१) चिऊताई हि स्त्री वर्गाची प्रतिनिधी आहे असे समजूया. त्यामुळे आपल्या दारावर एक पुरुष वर्गाचा प्रतिनिधी म्हणून जो कावळेदादा आला आहे, तो खरोखरीच दादा आहे कि दा s s दा आहे?
त्यामुळे तिच्या मनात आलेला विचार हा दादा (भाऊ) आला असेल म्हणून नकारात्मक भावना नक्कीच नसावी. तर तिची भावना हि व्यवध्यानतेची होती. म्हणजेच तिला असे वाटले असावे कि तो दा s s दा (भाई/उपरा) असावा व तिने जर का हे दार उघडले तर तिची काही धडगत नाही. ह्याचे कारण समाजाची सद्य:स्थीती. स्त्री एकटी घरात आहे हे पाहून तिचा गैर फायदा घ्यावा असे तर दारात येणा-या दा s s दा चा तर विचार नाही ना? त्यामुळे तिने प्रथमत: दार उघडले नसावे.
२) दुसरे असे कि ती स्त्री असल्यामुळे – तिची स्त्री सुलभ भावना होती – ती म्हणजे सावधानता. “सावध तो सुखी” या उक्तीला अनुसरून तिने त्यावेळेस दार उघडले नसावे. त्यामध्ये पुरुषाला घरात घेणे हि भावना नक्कीच नव्हती. कारण तिला हे हि माहित होते कि – स्त्री हि कधीही एकटी नसते. तिच्या सोबत नेहमी पुरुषही असतो. कारण हा निसर्गाचा नियम आहे.
स्त्री आहे तेथे पुरुष आहे, नर आहे तेथे मादी आहे, भाऊ आहे तेथे बहीणही असावी लागते, डावा आहे तेथे उजवाहि आहे, खरे आहे तेथे खोटेही आहे, सत आहे तेथे असतहि आहे इत्यादी.
३) तिसरे असे कि पराधीनता. स्त्री हि नेहमी पराधीन म्हणजेच दुस-यावर अवलंबून असते असे मानण्यात येत असते. अशा स्तिथीत ती घरात एकटीच असल्यामुळे म्हणजेच परावलंबी असल्यामुळे पुरुष प्रधान कावळेदादा दारात आले आहेत ते कशावरून हिताच्या गोष्ठी करण्यासाठी आले असावेत? हा विचारही तिच्या मनात डोकावून गेला असावा.
एकंदरीत उपरोल्लेखित – व्यवधानता, सावधानता आणि पराधीनता – या त्रीसुत्रींमुळे तिने त्यावेळेस दार उघडले नसावे.
ह्यावूलट कावळेदादा हे पुरुष प्रधान संस्कृतीचे निदर्शक मानल्यास त्यांनी आपले कर्तव्य पार पाडल्याचेच दिसून येते. त्यांनी पुरुषार्थ धर्म निभावला व स्त्री प्रधान चिऊताईस आपली खरोखरीची ताई असे समजून घरात प्रवेश दिला. इतकेच नव्हे तर दुसरा असाही विचार त्यांच्या मनात आला असावा कि मी जर माझे पुरुषार्थाचे कर्तव्य पार पाडले नाही तर जनमानसात आपली निर्भस्तना होईल आणि जे खरोखरीच पुरुषाच्या जातीला लांच्छन असेल. त्याचबरोबर त्यांच्या मनात असाही विचार चमकून गेला असेल कि स्त्री हि जन्मोजन्मीची माता असल्यामुळे मातेला घरात घेणे हे मला क्रमप्राप्तच आहे. मी जर हे केले नाही तर माझा जन्म हा व्यर्थच होय.
व्यर्थ, निरर्थक पुरुषार्थ करून मी काय मिळविणार? त्यापेक्षा मी माझे कर्तव्य पार पाडतो. आणि त्यामुळे त्यांनी चिऊताईस घरात घेतले असावे. जेणेकरून त्यांना त्यांचे कर्तव्य पार पाडल्याचे समाधान तर मिळालेच व त्याचबरोबर स्त्रीची पुरुषांकडून जी अपेक्षा असते ती हि पुरी करता आली. म्हणजेच पुरुषाने निभावयाचा त्याचा धर्म म्हणजे स्त्री हि मातेसमान आहे असे मानने, स्त्री हि पुरुषाची सहधर्मचारिणी ह्याचे भान ठेवणे, स्त्रीचे पुरुषावर असलेले अवलंबित्व मान्य करणे, स्त्री हि देवीचे रूप आहे ह्याची जान घेणे, स्त्री हे रथाचे दुसरे चाक आहे ह्याची जाणीव आपल्या मनात बाळगणे, स्त्री हि एकाच नाण्याची दुसरी बाजू आहे हे ओळखणे आणि सरतेशेवटी हे हि आपल्या मनात ठसविणे कि स्त्री शिवाय पुरुषाला दुसरा पर्याय नाही.
या संपूर्ण विवेचनावरून असे दिसून येते कि चिऊताइंचा दार न उघडण्याचा निर्णय तर कावळेदादांचा दार उघडण्याचा निर्णय हा आपापल्या परीने योग्यच होता.
इति कथा सफल संपूर्ण.............!!! मयूर तोंडवळकर – ९१९८६९७०४८८२

Monday, March 19, 2012
मयूरटीका ...........!!! तटस्थता .........!!! हि नव्हे वात्रटिका........तर हि आहे मयूरटीका...!!!
महायुतीचा धर्म तुम्ही नाही पाळला,
रिपाईच्या मनसुभ्याचा तोल मात्र ढळला......!!!
नाही दिले राज्यसभेच्या उमेदवारीचे ताट,
थांबाच तुम्ही, तुमची मी आता लावतो वाट......!!!
त्यामुळे रीपाईने राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली,
तिकडे भाजपची मनसेशी “दिलजमाई” झाली.....!!!
नाशिकमध्ये उपाय काही नाही उरला,
सेनेसारखा स्वाभिमानी पक्ष तटस्थ उभा राहिला....!!!
नाशिकमध्ये महापौरपदी मनसेची कोंडी काय केली,
मनसेला शिवसेनेची रुचली नाही ही खेळी......!!!
त्याचा वचपा ठाण्यात काढण्याची तयारी सुरु झाली,
राष्ट्रवादीसोबत विरोधी पक्षाच्या बाकावर मनसे विराजमान झाली.......!!!
या खेळीचा परिणाम असा काय झाला,
स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा मान सेनेच्या हातून निसटला.....!!!
“विराट”च्या “विराट” खेळीचा “विराट” विजय.........!!!
“विराट”च्या “विराट” खेळीने “विराट” विजय मिळवला,
साथीला “शतकांचा” “शतकवीर” सचिनसुद्धा गरजला,
सहा विकेटच्या माऱ्याने पाकिस्तानचा “धुव्वा” उडवला.......!!!
अशाप्रकारे “भारताने” गमावलेला मान परत मिळवला.......!!!
मयुर तोंडवळकर ............9869704882
Subscribe to:
Posts (Atom)
-
👏👏👏 *चारही मुक्ती म्हणजे, सद्गुरूमय होऊन त्यांचे (सद्गुरूंचे) दर्शन मिळविणे* इति श्री सद्गुरू माऊली बाबा जेव्हा म्हणतात चारही म...
-
*प. पू. श्री सद्गुरु स्वामी* *भगवान महाराज यांची* *अमृतवाणी* *सदा सर्वदा योग तुझा घडावा ।* *तुझे कारणी देह मा...
-
👏🙏👏 येथे बाबांना श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग अभिप्रेत आहे. *अवघाची संसार सुखाचा करीन* *आनंदे भरीन तिन्ही लोक* *जाईन गे मा...