Friday, October 5, 2018

*ॐ कार* म्हणजे काय?

👏👏👏

आपल्या श्री सद्गुरू माऊलीने म्हणजेच बाबानी *ॐ कारांची* फोड करून सांगताना संपूर्ण विश्वाची माहिती आपणा सगळ्यांसमोर प्रगट केली आहे.

*ॐ कार* म्हणजे काय?
*ॐ कार* म्हणजे सर्व त्रिभुवन व्यापून असणारे तत्व. त्रिभुवन म्हणजे तीन भुवने !! *ॐ कार* हे आकारी आहे. *ॐ कार* हे अक्षर आहे. *अक्षर* म्हणजेच *पंचमहाभूतें* हि *पंचमहाभूतें* - आप (जल), तेज, वायु, आकाश आणि पृथ्वी. 

(त्रिभुवन म्हणजे स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तीन लोक. *[महाराष्ट्र राज्य शब्दकोश खंड चार]* )

आता महत्वाची गोष्ट ही की, *ओम* हे अक्षर *पूर्णत्व अक्षर* होत नाही व त्याचा उच्चारही करता येत नाही, जोपर्यंत त्यावर अर्ध चंद्राकृती कोर येत नाही, तसेच त्या अर्ध चंद्राकृती कोरीवर बिंदू जोडला जात नाही.

आता बाबा पुढे सांगतातच की, ही जी कोर आहे, ती कशाचे प्रतिक आहे? तर ती *मायाच* होय. या मायेमध्ये काय काय सामावलेले आहे? तर यामध्ये *आकार* आहे, *उकार* आहे आणि *मकार* देखील आहे.

हे *आकार, उकार, मकार* म्हणजेच क्रमाने *ब्रह्मा*, *विष्णू* आणि *महेश* होत.

जसे - *ब्रह्मा* मध्ये *आकार* आहे
*विष्णू* मध्ये *उकार* आहे तसे
*महेशा* मध्ये *मकार* आहेच.

पुढे बाबा म्हणतात, *पण त्यात बिंदू टाकल्यावर ॐ तयार झाला.* म्हणजेच बाबांच्या सांगण्यानुसार या पंचमहाभूतांमध्ये *माया* असून देखील उपयोगाची नाही, तर त्या ॐ ला पूर्णत्वता येण्यासाठी त्या अनंतांचा म्हणा, त्या परमेशाचा म्हणा तो बिंदू रूपी अंश टाकला गेला तरच तो ॐ कार पूर्ण होतो, पूर्णत्वास जातो.

(सर्व भौतिक जग (दृश्य विश्व), सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर हे पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानले जाते. *[विकिपीडिआ]*) हीच ती पंचमहाभूतें होत.)

ह्याचाच अर्थ असा की, "आपले हे शरीर पंचमहाभूतांनी बनलेले आहे, परंतु ते पूर्णत्व नाही. कारण ते माया रहीत आहे, त्याशिवाय त्यामध्ये तो बिंदू देखील नाही."

तर ते पूर्णत्वास कधी जाईल? तर ज्यावेळेस ते मायेने आपल्या ताब्यात घेतले जाऊन, त्यामध्ये अनंतांचा अंश म्हणजेच बिंदू प्रवेश घेईल, त्यावेळीच ते ख-या अर्थाने पूर्णत्व होईल.

या *ॐ* लाच, बाबा म्हणतात, *आम्ही समर्थ म्हणतो. तेच ते निर्गुण, निराकार."* हे निर्गुण, निराकार फक्त मानवासाठी आकार घेतात आणि येथेच न थांबता, ते मानवाना परम् गतीला घेऊन जातात. या मानवी देहाला ते इहलोक सोडून परलोकात देखील घेऊन जातात. अणू, रेणु, परमाणू आणि त्याच्याही पलीकडे ते घेऊन जाऊ शकतात. परंतु, त्यासाठी मानव सुद्धा त्या गतीचा, त्या पद्धतीचा, त्या पायरीचा पाहिजे. अशा भक्ताला कोणतीही उणीव पडणार नाही, असे ते स्वतः सांगतात.

पण हे सगळे मिळवण्यासाठी मानवाला सत् मार्गाने जाणे, हे त्याचे आद्य कर्तव्य आहे ह्याची जाणीवही करून देतात.

🙏💐🙏💐👏💐🙏💐🙏

No comments:

अनगडवाणी