Saturday, September 13, 2014

ट्रेकर्स झाले ब्रेकर्स.........!!!

ट्रेकर्स झाले ब्रेकर्स.........!!!
(शरमले ट्रेकर्सचे बुरुज ! म टा दिनांक : १२ सप्टेम्बर १४ रोजी प्रसिद्द झालेल्या बातमीवर आधारित)

दारू पिऊन घालीत धिंगाणा,
म्हणू लागले चियर्स,
पायाखालची जमिन हलू लागली,
आणि झाले शेकर्स..........

सापडला त्यांना गड कोणता?
नावातच आहे सुधा,
हातातील पेला तोंडाला लागताच,
हरपू लागली ह्यांची बुधा...........

हरपलेल्या बुद्धीने,
एकत्र झाले ट्रेकर्स,
सुधा तोंडी लागताच,
नियमांचे झाले ब्रेकर्स..............

भान राहिले नाही त्यांना,
दारूच्या नशेत,
रात्रभर धिंगाणा केला,
सुधागडच्या कुशीत...............

शरमेने मान खाली घालावी,
असे होते त्यांचे कृत्य,
कसे म्हणावे महाराजांनी,
त्यांचे हे कृत्य स्तुत्य?............

सुधागडचे बुरुज शरमले,
त्यांच्या कृत्याने सगळे वरमले,
तरीही म्हणती ह्या अफवा असती,
नव्हती त्या रात्री तेथे आमची वसती................

काय म्हणावे ह्या बहाद्दरांना,
आणि अकलेच्या ह्या (कांद्यांना) सरदारांना,
आपल्या ह्या कृत्याचे समर्थन करता करता,
वेड्यातच काढती हे सगळ्यांना..........

...................................मयुर तोंडवळकर 

Sunday, July 13, 2014

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे......!!!

न टाकता कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,
गळफास लावून घेवून मात्र प्रवासी आरामात निजे......!!!
वापरता प्रवासात प्रवाशाने शक्कल हि बरवी,

गावावी का या प्रवाशाची सगळ्यांनी थोरवी?

Wednesday, July 9, 2014

आशेचे किरण कि निराशेचा ढग.......!!!

आशेचे किरण कि निराशेचा ढग.......!!!



पाहतो मी वाट चातकासारखी
आषाढ मासे प्रथम दिवसे,
परंतु कोणालाही चाहूल,
त्या पावसाची न दिसे..........

त्यातच आली जवळ आषाढी एकादशी,
वारीयांची वारी जवळ जात असे,
नामाचा गजर जोरदार झाला,
परंतु तो पाऊस तरीही न आला..........

पाऊस नाही येत म्हणून,
लागले डोळे आकाशाकडे,
अंधारून येताच प्रकटे,
त्यात एक आशेचा किरण कि निराशेचा ढग.........

शेतकरी हवालदिल झाला,
शहरातही लोक झाले वेडेपिसे,
पाण्यावाचून माशाला वाटेल,
जीवन कसे जगावेसे?............

निराशेच्या ढगामुळे,
लागेल कां हो सगळ्यांना धग?
पाऊस नाही बरसला तर,
पाणी कसे मिळेल मग?...............
.........................मयुर तोंडवळकर



Tuesday, April 15, 2014

ओळखा पाहू हे कोण?

तळे राखी
तो पाणी चाखी,
हि ह्यांची राजनीति,
हलाखीची करीती,
हे जनतेची परिस्थिती,

ओळखा पाहू हे कोण?

Saturday, January 11, 2014

“स्त्री” एक विचार......

“स्त्री” “महिला” “मुलगी” किंवा “तनया” हे सगळे शब्द “स्त्रीलिंगी” आहेत. “पृथ्वी” हा देखील शब्द “स्त्रीलिंगीच” आहे.

आज काय दिसून येते कि स्त्रियांवर, महिलांवर, मुलींवर अत्त्याचार होतोय, बलात्कार होतोय, त्यांची भर रस्त्यात अब्रू लुटली जातेय. अशा परिस्थितीत “पृथ्वी” देखील सुटली नाहीयेय. पृथ्वीवरदेखील मानवांकडून अन्याय, अत्त्याचार होतोय. पृथ्वीवरील वृक्षतोड, नैसर्गिक संपत्तीवर घाला घातला जातोय, यामुळे पृथ्वीवरील समतोल ढासळतोय. तिला आता ह्या विश्वभर होणाऱ्या अत्त्याचारांपासून परावृत्त करण्याची वेळ आलीय.

मग हे करणार कोण? तर आपणच. महिलांवरील अत्त्याचाराला आपणच कारणीभूत आहोत, तर पृथ्वीवरील अन्यायाला देखील आपणच कारणीभूत आहोत. अशा ह्या दुर्दैवी परिस्थितीत आपणच आपल्यावर बंधने घालून घेवून ह्या दोघांचे रक्षण करण्यास सरसावले पाहिजे. त्यासाठी अशी कृष्ण-कृत्ये करणाऱ्यांना वेळीच थांबविले पाहिजे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे. तरच आणि तरच आपल्या मुलींचे आपल्या माता-भगिनींचे, आपल्या पृथ्वीचे भवितव्य उज्ज्वल आहे अन्यथा ह्या दोघांचेही काही खरे नाही आणि त्याचबरोबर मानव समाजाचे देखील.


                                      मयुर तोंडवळकर  

अनगडवाणी