मयुरटीका........वास्तविका.....!!!
ही नव्हे वात्रटिका,
तर ही आहे वास्तविका......!!!
(समाजाचे वास्तव
शब्दांकन)
पर्दाफाश
‘ऑफर’ मागचं,
काय आहे गौडबंगाल?
सारेच जण निघाले,
कराया अपुला देश
कंगाल.....!!
कोण देतो लाच,
कोण घेतो लाच,
सामान्य माणसांच्या ढुंगणावर,
मागून मारतात टाच ........!!
कोणी करी आरोप,
कोणी देई निरोप,
निगरगट्ट सरकार
मात्र,
सर्वांचा करी
समारोप......!!
नाही निर्णय,
नाही पर्याय,
नाही संवाद,
नाही लवाद,
कोर्टामध्ये जाता होई,
सगळ्यांचा पर्दाफाश.......!!!!
No comments:
Post a Comment