चोरात चोर “भूखंड” चोर,
“भूखंड” लाटून झाले हे
शिरजोर.....!!
भूखंडाच्या
श्रीखंडावर,
मारला ह्यांनी ताव,
सर्व-सामान्य
जनतेला,
केले ह्यांनी
चलेजाव......!!
एक नाही दोन नाही,
हे आहेत दहा,
भूखंडाचा श्रीखंड,
केला ह्यांनी स्वाहा......!!
कॅगच्या अहवालाने,
केला ह्यांचा गौप
स्फोट,
भूखंडांच्या नोंदीत
खंड पाडून,
दशननानी केला
नोंदींचा विस्कोट....!!
मुंबई, पुणे,
नागपुरातील
झाले सत्य उजागर,
भूखंडांचा श्रीखंड
खावून
झाले मंत्री
गबर......!!
कोणी काढल्या शिक्षण
संस्था,
तर कोणी काढलीत
विद्यापीठं,
शिक्षणाच्या
नावाखाली,
वाढून घेतलीत आपली
ताटं.....!!
मॅनेजमेंट सीटसाठी,
गोळा केले हप्ते,
तुम्हा आम्हा
सामान्यांना
हे मात्र
खुपते........!!
विध्यार्थी आणि
पालकांनी
कोठून आणायचे पैसे,
डोनेशन दिले नसता
अॅडमिशन मात्र मिळत
नसे......!!
डोनेशनच्या पेट्या
भरून दिले गेले अडमिशन,
अडमिशन करता करता
पैसे कमावण्याच्या
ध्येयाचे
पूर्ण झाले
कंप्लीशन........ पूर्ण झाले कंप्लीशन !!!!
No comments:
Post a Comment