Friday, March 2, 2012

तुमच्या स्वयंपाक घरातील औषधे .......!!!


(१) स्नायूंच्या वेदना आल्याच्या उपयोगाने पळवा :
डेनिश संशोधकांना असे आढळून आले की ज्यांना काही दुखणी होती त्यांना त्यांनी आल्याचा समावेश असलेला आहार घेण्यास सांगितले. त्यामुळे झाले काय की सांधे दुखी, सूज, आणि ताठरपणा आलेल्या ६३ टक्के रुग्णांमधील हे प्रकार २ महिन्याच्या अवधीत बरे होताना दिसू लागले. आल्यामध्ये जीन्जररोल्स नावाचे घटक असतात, ज्याच्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या वेदना निर्माण होणारे स्त्राव उत्पन्न होण्याचे थांबते. यासाठी संशोधन म्हणते की, तुमच्या रोजच्या आहारात १ चमचा सुकवलेले आले म्हणजेच सुंठ किंवा २ चमचे बारीक बारीक तुकडे केलेले आले वापरा.  

No comments:

अनगडवाणी