रेकॉर्ड ब्रेक .........!!!
मुंबईत थंडीने रेकॉर्ड ब्रेक काय केला,
राजकारण्यांच्या रथाला बंडखोरांनी बंड करून ब्रेकच लावला.....(१)
सगळेच जुने पक्ष झाले होते बंडाने बेजार,
त्यातच नव्या पक्षाने म्हटले मी मात्र नाही घेणार माघार.......(२)
हे सारे खोटे ठरविण्यासाठीच की काय,
बंडखोर नाराजानी त्यांना केले “बाय – बाय”.......(३)
बंडखोरीचे वारे (1)........!!!
नाराज बंडखोरांच्या बंडखोरीचे,
वाहू लागले बोचरे वारे.........
मी मी म्हणाणा–या राजकीय नेत्यांच्या
डोळ्यासमोर चमकून गेले तारे ......(१)
असंत्तुष्टांची नाराजी दूर कशी करावी हे समजेनासे झाले ............
त्यासाठी नेतेच काय, त्यांच्या घरादाराचे धाबे सुद्धा दणाणले.....(२)
बंडखोरीचे वारे (२)..........!!!
बंडखोरांच्या बंडखोरीचे वारे वाहू लागले,
निवडणुकीच्या रिंगणात आता रंग भरू लागले,
त्यातच राजकीय पक्षांचे तीन तेरा वाजले...........(१)
कोणाचे आहे घड्याळ......
तर कोणाचा तिरंगा हात.........
कोणाचे सुटले तीरकमान..........
तर कोणाचे सुटले इंजिन सुसाट..........(२)
मयुर तोंडवळकर ...........9869704882
No comments:
Post a Comment